ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sonalee kulkarni

नव्या हाथी मोर खण साडीतील सोनालीच्या लुकने चाहते घायाळ

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) अर्थात ‘अप्सरा’ आपल्या सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपले वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. विशेषतः वेगवेगळ्या साडी आणि ब्रँडसाठीही सोनाली काम करते. लग्न झाल्यानंतर सोनाली पुन्हा एकदा कामाला लागली आहे. नुकताच तिने ‘तमाशा’चे पोस्टरही प्रदर्शित केले असून आता लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काम सुरू करणार असल्याचेही घोषित केले आहे. तर काही दिवसांपूर्वीच आपल्या नवऱ्याचा वाढदिवस तिने मालदिव्जमध्ये साजरा केला. त्याचेही व्हिडिओ आणि फोटो सोनालीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते. पण सध्या चाहते घायाळ आहेत ते तिच्या नव्या लुकवर.

अधिक वाचा – शमिताच्या वयावरून अक्षरा आणि ऊर्फीने घेतली फिरकी, म्हटले ‘मावशी’

हाथी मोर खणाच्या साडीत ग्लॅमरस अंदाज

कोणतीही फॅशन सोनाली नेहमीच अप्रतिम कॅरी करते. सोनालीने मीरा – द लूम अफेरची हाथी मोर साडी नेसून फोटोशूट केले आहे आणि या साडीमध्ये चाहत्यांना तिच्या अदांनी नक्कीच घायाळ केले आहे असे म्हणावे लागेल. साडीमध्येही ग्लॅमरस दिसता येते हे सोनालीने दाखवून दिले आहे.  मुळात ही साडी स्वदेशी असल्याचेही सोनालीने आपल्या सोशल मीडियावर सांगितले आहे. अप्रतिम अशा डिझाईन्सच्या या साडीमधील सोनालीचा लुक चाहत्यांना घायाळ करत आहे आणि अनेकांनी तिच्या या फोटोंवर अक्षरशः कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोनालीने नेसलेली ही साडी तिचा रंग अधिक खुलवत आहे. त्यातही तिला करण्यात आलेला मेकअप आणि तिची अदा हे सर्व काही अप्रतिम जुळून आले आहे. गडद हिरवा आणि काळा असे कॉम्बिनेशन आणि त्यावर हत्ती आणि मोराची प्रिंट असणारी ही हाथी मोर साडी सोनालीचे सौंदर्य अधिक खुलवून आणत आहे. तसंच सोनालीचा मेकअप यामध्ये अधिक ग्लॅमरस असल्याने तिच्या फोटोकडे पाहातच राहावे असे वाटत आहे. केवळ चाहतेच नाही तर सोनालीच्या इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींनीही तिच्या या फोटोंवर कमेंट्स दिल्या आहेत. 

अधिक वाचा – Bigg Boss OTT: शमिता दिव्याची तुटली मैत्री, करणने केली दिव्याची कानउघडणी

ADVERTISEMENT

कमाल ट्रान्सफॉर्मेशन

सोनाली गेले काही महिने अत्यंत गंभीरतेने वर्कआऊट करत आहे. त्याचे व्हिडिओदेखील तिने पोस्ट केले आहेत. त्यामुळे सध्याच्या तिच्या फोटोंमध्ये तिच्यात कमालीचे ट्रान्सफॉर्मेशन दिसून आले आहे. तिच्या या फोटोंवर कमेंट्समध्येही तिला याबाबत अनेकांनी सांगितले आहे. तर तिच्या लुकबद्दल ती फॉरेनर दिसत असल्याचेही म्हणण्यात आले आहे. सोनाली गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. तिचे अनेक लुक आतापर्यंत तिच्या चाहत्यांनी पाहिले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षात हिरकणी पासून सोनालीमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास आणि एक वेगळी सोनाली चाहत्यांना दिसून येत आहे. आता लवकरच तिचा तमाशा हा चित्रपटही येईल. सोनाली नेहमीच जीव ओतून काम करते. त्यामुळे आता या चित्रपटाच्या नावावरून तमाशावर आधारीत हा चित्रपट असणारी याची नक्कीच कल्पना चाहत्यांना आणि प्रेक्षकांनी आली आहे. मात्र यामध्ये नक्की सोनाली कोणती भूमिका करणार आणि याची कथा कशी असेल याबाबतही सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. लवकरच सोनाली याबाबत खुलासा करेल अशी सर्वांना आशा आहे. सोनालीला अनेकांनी तिच्या या नव्या प्रोजेक्टसाठीही भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा – राणू मंडल इज बॅक, बचपन का प्यार व्हिडिओ व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT