सध्या सोशल मीडियावर कोणाच्या हॉट फोटोजची चर्चा होत असेल तर ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या फोटोजची. तिच्या इन्स्टाग्रामवर सध्या तिच्या बिकिनीमधील फोटोजची गर्दी झाली आहे. ज्या दिवसापासून तिने तिचे वजन कमी केले आहे. त्या दिवसापासून तिच्यात असलेला ग्रेस अधिक जास्त दिसू लागला आहे. आता तिचा हा असा बोल्ड अंदाज पाहता अप्सरा सोनाली इज बॅक असेच म्हणावे लागेल. सोनालीचे हे फोटो तिच्या खास वेकेशनदरम्यानचे आहेत. चला पाहूयात तिचा हा सोशल मीडियावर हॉट अंदाज
सोनाली आणि बिकिनी
सोनालीने तिच्या सोशल मीडियावर काही फोटोज शेअर केले आहेत. हनिमून असा हॅशटॅग वापरुन तिने हे फोटो शेअर केले आहे. सोनाली आपल्या हनिमूनसाठी मेक्सिकोत गेलेली दिसतेय. मेक्सिकोमधील सुंदर बीचेसवर तिने आपले फोटोज काढले आहेत. तिने घातलेल्या बिकिनी ट्रेंडी आणि स्टायलिश आहेत. प्रत्येक बिकिनी सूटमध्ये तिची फिगर खूपच उठून दिसत आहे. खास याच दिवसांसाठी आणि परफेक्ट फिगरसाठी तिने वजन कमी केले असाव असे यातून दिसत आहे. तिचे बिकिनी शूट तके परफेक्ट झाले आहे की,ते तिच्या फोटोतील हास्यातून चांगलेच उठून दिसत आहे. सोनालीचे हे फोटो तुम्हालाही नक्कीच सूपर हॉट वाटले असतील यात काही शंका नाही.
वजन केले कमी
लॉकडॉऊनच्या आधी तिचे वजन बरेच वाढले होते. पण तिने कंबर कसली आणि वजन कमी करण्यासाठी वर्कआऊट आणि डाएट सुरु केला. त्यानंतर तिचे वजन इतके कमी झाले की, आता तिने केलेली मेहनत तिच्या फोटोमधून दिसत आहे. याच लॉकडॉऊनमध्ये तिने लग्नगाठ देखील बांधली. कुणाल बेनोडेकरसोबत तिने दुबईमध्ये लग्न केले. अत्यंत साधेपणाने हे लग्न केले. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी नातेवाईकांसोबत हा आनंद शेअर केला.सोनालीच्या लग्नाला आता वर्ष पूर्ण होईल. या वर्षपूर्तीच्या आधी ती खास हनिमूनला गेली असे दिसत आहे. पण सोनालीने जे हॅशटॅग वापरले आहेत ते पाहता तिने हे जुने फोटोज शेअर केले आहेत की ती आता मेक्सिकोमध्ये आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.
पांडूमध्ये दिसली हॉट
कामाचा विचार केला तर सोनालीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. नुकतीच ती भाऊ कदम यांच्यासोबत ती या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातही ती सुंदर दिसली होती. तिने या चित्रपटासाठी खास वजन कमी केले अशी देखील चर्चा होती. पण काहीही असले तरी देखील सोनालीचा लुक हा या चित्रपटात अधिक चांगला दिसला होता. पांडू हा तिचा शेवटचा चित्रपट होता. तमाशा लाईव्ह हा तिचा चित्रपट येत्या जून महिन्यात प्रदर्शित होणार आहे. याचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
दरम्यान तुम्हाला सोनालीचे हे बिकिनी फोटो कसे वाटले आम्हाला नक्की सांगा.