ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सोनम कपूरचं प्रेगनन्सी फोटोशूट, पतीसोबत रोमॅंटिक अंदाजमध्ये शेअर केले फोटो

सोनम कपूरचं प्रेगनन्सी फोटोशूट, पतीसोबत रोमॅंटिक अंदाजमध्ये शेअर केले फोटो

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या गरोदरपणाच्या टप्प्याचा मनसोक्त आनंद घेत आहे. कारण प्रत्येक स्त्रीसाठी मग ती एखादी सामान्य स्त्री असो वा सेलिब्रेटी… आई होणं नेहमीच खास असतं. सोनमने मार्चमध्ये ही आनंदाची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली होती. लग्नानंतर सोनम आनंदसोबत लंडनमध्ये शिफ्ट झाली होती. मात्र आता गरोदरपणासाठी ती खास मुंबईत आलेली असून तिच्या माहेरी म्हणजेच अनिल कपूरच्या घरी राहात आहे. सोनमचं सासरदेखील मुंबईतच आहे. शिवाय गरोदरपणात प्रत्येक स्त्रीला जास्त काळजी आणि प्रेमाची गरज असते. अशा काळात लंडनमध्ये राहण्यापेक्षा जवळच्या लोकांसोबत राहणं सोनमने निवडलं आहे. मात्र असं असलं तरी ती या काळातही तिचं नवनवं प्रेगनन्सी फोटोशूट तिच्या चाहत्यांसोबत शेअर करतेय. नुकतंच तिने पती आनंद सोबत  काही फोटो शूट केले आहेत. ज्यामध्ये सोनमने रोमॅंटिक अंदाजमध्ये बेबी बम्प फ्लॉंट केलं आहे. 

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचा रोमॅंटिक अंदाज

सोनमने नुकतंच तिच्या इन्स्टा अकाउंटवर प्रेगनन्सीचे नवे फोटो अपडेट केले आहेत. ज्यामध्ये तिचा पती आनंद आहुजादेखील आहे. आनंदच्या मिठीत विसावलेली गरोदर सोनम आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरील आईबाबा होणार असल्याचा आनंद स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे या दिवसांमध्ये सोनमच्या चेहऱ्यावरही एक अनोखं तेज दिसून येत आहे. साधारणपणा गरोदर स्त्रियांच्या चेहऱ्यावर गर्भातील बाळामुळे असं तेज येतं. सोनमदेखील या तेजामुळे अधिक सुंदर दिसत आहे. सोनमने या फोटोशूटसाठी हलक्या गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे तर आनंद आहुजाने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले आहेत. चेहऱ्यावरील समाधान आणि मनातील आनंद या फोटोमधून व्यक्त होत आहे.

सोनमचं प्रेगनन्सी फोटोशूट व्हायरल

सोनम कपूर फॅशनेबल अभिनेत्री आहे. ज्यामुळे तिची स्टाईल चाहते नेहमीच फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. सोनमचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. सोनम आई होणार ही बातमी तिच्या कुटुंबाप्रमाणेच चाहत्यांसाठीही नक्कीच खास आहे. सोनमने 21 मार्चला ती गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. सोनम त्यानंतर नेहमीच तिच्या प्रेगनन्सी फेसमधील निरनिराळे फोटो शेअर करत असते. आता नुकतेच आनंद आहुजासोबत शेअर केलेले फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत. ज्यामुळे पाहता पाहता हे फोटो व्हायरल झाले. चाहत्यांनी या फोटोजवर लाईक्स आणि कंमेटचा पाऊस पाडला आहे. सोनमची आई सुनिता कपूर, सेलिब्रेटीज, मित्रमंडळी आणि कुटुंबियांनी या फोटोजवर इनमोशनल इमोजीच शेअर केल्या आहेत. 

13 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT