ADVERTISEMENT
home / मनोरंजन
sonu sood

सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत, बिहारमधील एका दिव्यांग मुलीची केली मदत

सध्या बिहारच्या जमुई येथील सीमा नावाच्या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका गरीब कुटुंबातील या 10 वर्षीय मुलीला अपघातात एक पाय गमवावा लागला आहे, त्यामुळे ती एकाच पायावर कशीबशी पायी चालत शाळेत जाते. एका पायावर एक किलोमीटर चालण्याचा तिचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जण तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये अभिनेता सोनू सूदचा देखील समावेश आहे. सोनू सूदने सीमाला योग्य उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

सोनू सूद सीमाच्या उपचारांसाठी मदत करणार 

सोनू सूदने त्याच्या ट्विटर हॅन्डलवर सीमाचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका पायावर शाळेत कशी जाते हे सांगितले आहे. हे शेअर करत सोनू सूदने लिहिले आहे की, “आता ती एका नव्हे तर दोन्ही पायांवर उड्या मारत शाळेत जाईल. मी तिकीट पाठवत आहे, दोन्ही पायांवर चालण्याची वेळ आली आहे.” सीमाचा एक व्हिडिओ अनेक दिवसांपासून खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ही मुलगी एका पायाने शाळेत जाताना दिसत आहे. एका दुर्दैवी अपघातात दुखापत झाल्याने सीमाचा एक पाय कापावा लागला. असे असूनही तिची शिक्षणाची आवड कमी झालेली नाही, ती एकाच पायावर दररोज एक किलोमीटर पायी चालत पूर्ण उत्साहाने शाळेत जाते. तिचे वडील गरीब आहेत, त्यामुळे त्यांना वाहन खरेदी करता येत नाही. सीमाचे हे धैर्य आणि शिक्षणाची जिद्द पाहता स्थानिक प्रशासन आणि काही संस्थांनीही तिच्या उपचारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

सोनू सूदने याआधी देखील केली आहे गरजूंना मदत 

गरजूंना मदत करण्याची सोनू सूदची ही पहिलीच वेळ नव्हे. याआधी देखील त्याने अनेक गोरगरीब व गरजवंतांना अडल्या नडल्या वेळेला मदत केली आहे. सोनू सूदने देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित मजूर आणि इतर शहरांमध्ये अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी ज्या प्रकारे मदत केली ते संपूर्ण देशाने बघितले होते. त्याचे हे वर्तन अत्यंत कौतुकास्पद होते. सोनूच्या या मदतीचे सर्वांनी कौतुक केले होते. या कामानंतर सोनू रील लाइफमधून रिअल लाइफ हिरो बनला. अनेकांनी त्यांच्या मंदिरात त्याचा फोटो लावला आणि त्याची पूजा सुरू केली.

काही काळापूर्वी त्याने बिहार मधीलच एका स्त्रीला उदबत्ती बनवण्याची मशीन पाठवून तिच्या उत्पन्नाचा प्रश्न सोडवण्यास मदत केली होती. तसेच पंजाबमध्ये असताना एका अपघातग्रस्त मुलाची देखील मदत केली होती. या मुलाला त्याने स्वतः अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढून वेळेत वैद्यकीय मदत मिळवून दिली होती. तसेच यापूर्वी नालंदाच्या व्हायरल सोनूलाही सोनू सूदने शिक्षणासाठी मदत केली होती. 

ADVERTISEMENT

आता त्याने सीमाच्या प्रश्नाची दखल घेऊन पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. चवथ्या इयत्तेत शिकणारी सीमा दिव्यांग आहे, पण तिची अभ्यासाची आवड एवढी आहे की ती एका पायावर उडी मारून शाळेपर्यंतचा एक किलोमीटरचा टप्पा पार करते.

सीमाला पुढे शिकून शिक्षिका व्हायचे आहे 

बिहारच्या जमुई जिल्ह्यातील खैरा ब्लॉकमधील फतेहपूर गावात राहणारी सीमा गावातीलच सरकारी शाळेत शिकते. रस्ता अपघातात तिला तिचा एक पाय गमवावा लागला आहे. सीमाचे वडील खीरण मांझी दुसऱ्या शहरात मजूर म्हणून काम करतात आणि आई वीटभट्टीवर काम करते. सीमाला भविष्यात शिक्षिका व्हायचे आहे. तिला पाच भावंडे आहेत.

शाळेत उडी मारून जातानाचा एक पाय गमावलेल्या सीमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर अनेक लोक त्याच्या मदतीसाठी पुढे येऊ लागले. त्यावेळी सगळ्यात आधी सोनू सूदने मदतीचा हात पुढे केला. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT