बॉलीवूड

साऊथ स्टार धनुष करणार ‘अंधाधुन’ चित्रपटाचा रिमेक

Leenal GawadeLeenal Gawade  |  Jun 6, 2019
साऊथ स्टार धनुष करणार ‘अंधाधुन’ चित्रपटाचा रिमेक

जर तुम्ही आयुष्यमान खुरानाचा अंधाधुन हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही एक चांगला चित्रपट मिस केला आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी इतकी वाढली आहे की, आता या चित्रपटाचा रिमेक तयार करण्यात येणार आहे. हा रिमेक साऊथमध्ये होणार असून धनुष या चित्रपटाचा रिमेक तयार करणार आहे. एरव्ही साऊथमधून हिंदी रिमेक असे अनेक चित्रपट होत होते. पण आणखी एका चित्रपटाने साऊथला भुरळ घातली असेच म्हणायला हवे.

सारा या व्यक्तीपासून दूर राहूच शकत नाही, सांगितले लग्नाचे देखील प्लॅन्स

या चित्रपटाचे लवकरच घेणार राईट्स

andhadhun

अंधाधुन या चित्रपटाची प्रसिद्धी पाहता धनुषने हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट करण्यासाठी लागणारे संबंधित राईट्स तो लवकरच घेणार असल्याचे त्याने एका कार्यक्रमादरम्यान सांगितले आहे. नुकतात अंधाधुन हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चीनमध्ये या चित्रपटाने कमालच केली. तब्बल  100 कोटीची कमाई या चित्रपटाने चीनमध्ये केली. त्यामुळे परदेशातही चाललेल्या या चित्रपटाची पुर्ननिर्मिती करण्याची इच्छा कोणाला झाली नसती तर आश्चर्य वाटले असते.

चित्रपट होता एकदम धमाका

आतापर्यंत पाहिलेल्या सस्पेंन्स, थ्रीलर या चित्रपटापेक्षा हा चित्रपट फारच वेगळा होता. शेवटपर्यंत या चित्रपटात काय होईल याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे हा चित्रपट खिळवून ठेवतो. आयुष्यमान खुराना, तबू, राधिका आपटे यांचा अभिनय या चित्रपटात इतका दमदार आहे की, हाच या चित्रपटाचा युएसबी आहे. त्यामुळे जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्ही हा चित्रपट पाहायलाच हवा.

सूर्यवंशीमध्ये बॅडमॅन साकारणार व्हिलनची भूमिका

सध्या वेगळ्या चित्रपटात आहे व्यग्र

fakir

साऊथमध्ये धनुषचा चांगलाच बोलबाला आहे. त्याने चित्रपटही चांगले केले आहेत. हल्ली तो चित्रपटांची निर्मिती करताना दिसतो. सध्या तो त्याच्या आणखी एका महत्वाकांक्षी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. एक्सट्रा ऑड्रिनरी जर्नी ऑफ फकीर या चित्रपटामध्ये तो सध्या व्यग्र आहे. हा चित्रपटही खूप मोठा प्रोजेक्ट असून सध्या त्याची या चित्रपटाची तयारी सुरु आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची खास स्क्रिनिंग देखील करण्यात आली.या चित्रपटाचे शुटींग फ्रान्स, इटली, लिबिया आणि मुंबईत करण्यात आले आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिगनंतर हा चित्रपट अनेकांना आवडला अशी प्रतिक्रिया देखील लोकांनी दिली. त्यामुळे सध्या या चित्रपटाच्या मागे धनुष आहे. आणि लवकरच तो हा नवी चित्रपटही सुरु करणार आहे.

अंधाधुन करणार का साऊथमध्ये कमाल?

आता प्रश्न असा आहे की, अंधाधुनचा साऊथमध्ये रिमेक आल्यानंतर नेमकं तिथे हा चित्रपट काय कमाल करणार शिवाय आयुष्यमानने साकारलेली भूमिका नेमकी कोण साकारणार ? या चित्रपटात तब्बूची भूमिका कोण करेल आणि बाकी सगळे कसे असेल ?  या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी थोडे दिवस तरी वाट पाहावी लागेल.

‘काफिर’मधून दिया मिर्झा करतेय वेबसिरिजमध्ये पदार्पण

सध्या येतोय साऊथचा रिमेक कबीर सिंह

तर सध्या बी टाऊनमध्ये चर्चा आहे शाहीदच्या कबीर सिंह या चित्रपटाची.  अर्जुन रेड्डी या चित्रपटाचा हा चित्रपट हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात शाहीद कपूर आणि कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 21 जून रोजी दिलीज होणार आहे.

(सौजन्य- Instagram)