काही वर्षांंपूर्वी चांगली मालिका म्हटलं की, झी मराठी हे नाव नेहमीच डोक्यात असायचं. पण सध्याचं चित्र काही वेगळचं आहे. या आठवड्याच्या टीआरपी रेटिंगनुसार पहिल्या पाचामध्ये सर्वच्या सर्व मालिका या स्टार प्रवाह वाहिनीवरील असल्याचं दिसून येत आहे. स्टार प्रवाहने या दोन वर्षात अशा मालिका आणि तगडे विषय आणि कलाकार आणले की, प्रेक्षकांनी इतर वाहिन्यांकडे चक्क पाठ फिरवली आहे असं म्हणावं लागेल. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने या आठवड्यात पहिला क्रमांक मिळवत टीआरपी रेटिंगवर आपले वर्चस्व ठेवले आहे. तर इतर चारही मालिकांचे टीआरपी रेटिंग चांगले असून या चारही मालिका याचा वाहिनीवरील आहेत.
‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये 1 जूनपासून दिसणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाह सोहळा
टीआरपीची रेस
https://www.mtwikiblog.com/2020/03/Marathi-TV-Serials-BARC-TRP-Ratings-Weekly.html
मालिकांचे विषय, कलाकार आणि टीआरपीची रेस हे काही नवीन नाही. बार्कच्या रेटिंगनुसार कोणत्या मालिकेचा सध्या गाजावाजा आहे हे प्रेक्षकांनाही कळून येतं. दर आठवड्याला हे रेटिंग्ज बार्कच्या संकेतस्थळावर दाखविण्यात येतात. 15 मे ते 21 मे या आठवड्याच्या कालावधीसाठी मराठी मालिकांचे टीआरपी रेटिंग पाहता स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेने 6537 पॉईंट्स मिळवत आपली जागा कायम केली आहे. गेल्या काही आठवड्यांमध्ये ही मालिका कायम टॉप 5 मध्ये आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने आपले स्थान पक्के केले आहे. या दोन्ही मालिकांमध्ये वेगवेगळे कलाकार आणि मुळात यातील मुख्य जोड्याही घराघरात प्रसिद्ध आहेत. शुभम – कीर्ती आणि गौरी – जयदीप या दोन्ही जोड्यांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. या मालिकेवरील प्रत्येक मालिकेत वेगळा विषय हाताळला गेल्यामुळेच या मालिकांना प्रेक्षक पसंती देत असल्याचं दिसून आलं आहे. चौथ्या क्रमांकावर ‘सांग तू आहेस’ का ही थ्रिलर आणि वेगळ्या बाजाची मालिका टीआरपी रेटिंग्जमुळे वर आली आहे. सिद्धार्थ चांदेकरची प्रमुख भूमिका असणारी ही मालिका खूपच लक्षवेधक आहे. तर पाचव्या क्रमांकावर स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा ही मालिका टीआरपी रेटिंग्जमध्ये दिसून येत आहे. एकंदरीतच कलर्स मराठी, झी मराठी यांना तगडी स्पर्धा देत पाचही मालिका या स्टार प्रवाहच्या असून आपण इथे टिकायला आलो आहोत हेच सिद्ध करत आहेत.
रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र ‘चा आता निर्माता झाला अयान मुखर्जी
झी मराठीची एकही मालिका नाही
झी मराठीच्या मालिकांचा दर्जा खालावत चालला आहे अशी गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांमध्ये नाराजी उमटत आहे. दोन ते तीन आठवड्यांपूर्वी केवळ ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही एकच मराठी मालिका टीआरपी रेटिंग्जमध्ये पुढे होती. मात्र आता या आठवड्यात पुन्हा ती मागे पडली आहे. तर कलर्स मराठीच्या मालिकांना कुठेच पसंती दिसून येत नाही. पसंती असली तरीही अजूनही टीआरपी रेटिंग्जमध्ये कोणतीही मालिका स्थान मिळवू शकलेली नाही. त्यामुळे आता टीआरपीच्या रेसमध्ये इतर मालिका आणि इतर वाहिन्या नक्की कोणते पाऊल उचलणार आणि मालिकांना कोणते नवे मनोरंजक वळण देणार हेदेखील पाहणे आता औत्सुक्याचे होईल. कारण प्रेक्षकांनी तर काही मालिकांकडे नक्कीच पाठ फिरवली असल्याचं दिसून येत आहे. तर स्टार प्रवाहची घोडदौड चांगली चालू असल्याचं दिसून येत आहे.
राहुल वैद्यच्या ‘अली’ गाण्याने केले सगळ्यांना मंत्रमुग्ध, फॅन्सही झाले आनंदी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक