योग्यरित्या नियोजन करूनही मूल न होणे ही एक धोक्याची घंटा असू शकते. मूल न होण्याशी संबंधित सामाजिक कलंक आजच्या काळातही तितकाच जास्त आहे. ‘वंध्यत्व’ ही संज्ञा अशी गोष्ट आहे जी कोणत्याही जोडप्याला किंवा कुटुंबाला एक मोठा धक्का देतेकारण ती ‘अक्षमता’ दर्शवत असल्याचे मानले जाते. भारतातील 10 ते 15% जोडप्यांना प्रजननासंबंधी समस्या असल्याचे ज्ञात आहे. आणि हा केवळ एक ढोबळ अंदाज आहे कारण सर्वजण अशा समस्यांची तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत किंवा त्या विषयी खुलेपणाने बोलत नाहीत. याबाबत डॉ. प्रदीप महाजन, रिजनरेटिव्ह मेडीसिन एक्स्पर्ट,मुंबई यांच्याकडून घेतली अधिक माहिती
वंध्यत्वाची कारणे
वंध्यत्वाची कारणे वेगवेगळी आहेत. पूर्वी स्त्रीचे वाढते वय हे गर्भधारणा न होण्याचे प्रमुख कारण मानले जात असे. तसेच क्षयरोग, ट्यूमर, पुनरुत्पादक अवयवांसंबंधी समस्या, संप्रेरकांचे असंतुलन, जीवनशैलीच्या सवयी इ. यांसारख्या विविध कारणांमुळे स्त्री आणि पुरुष दोघांनाही वंध्यत्व येते. तसंच वंध्यत्व आणि मानसिक आरोग्याचाही संबंध आहे.
वंध्यत्वाच्या उपचारात प्रगती
वर्षानुवर्षे वंध्यत्वाच्या उपचारात लक्षणीय प्रगती झाली असली तरी, बऱ्याचदा वंध्यत्वास कारणीभूत परिस्थितीवर केवळ सहाय्यकपुनरुत्पादक तंत्रांनी मात करता येत नाही. वैद्यकीय शास्त्रातील दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहता आता आपल्याला आपल्या शरीरातीलसंसाधनांचा वापर करुन वंध्यत्वावर मात करता येते. सेल-आधारित थेरपी ही अशीच एक उदयोन्मुख पद्धत आहे जी पुरुष आणि महिला वंध्यत्वासह अनेक परिस्थितींच्या उपचारांमध्ये आशेचा किरण निर्माण करते.
सेल-आधारित थेरपी आणि वंध्यत्व
सेल-आधारित थेरपीमागील तत्त्व हे आहे की आपल्या शरीरात स्टेम पेशी आणि वाढीचे घटक असतात, जे सूज आणि डाग कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास, इतर पेशींचे कार्य वाढविण्यासाठी, नवीन पेशींचा तयार करण्यासाठी मदत करतात. अशा प्रकारे, प्रजनन, तसेच इतर प्रणालीगत समस्या, सेल-आधारित थेरपीद्वारे संबोधित केले जाऊ शकतात.
पूर्वी, असे मानले जात होते की एक स्त्री निश्चित संख्येने अंडी घेऊन जन्माला येते जी वयानुसार कमी होते. तथापि, आता हे ज्ञात आहेकी अंडाशयात स्टेम पेशी आहेत, ज्याचा वापर अंडी वाढविण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे, पुरुषांच्या अंडकोषांमध्ये स्टेमपेशी असतात ज्या शुक्राणू तयार करू शकतात, ज्याचा उपयोग ऑलिगोस्पर्मिया/अझोस्पर्मिया सारख्या समस्या सोडवण्यासाठी केलाजाऊ शकतो. शिवाय, विशिष्ट प्रकारचे स्टेम पेशी फॉलिकल उत्तेजक हार्मोन रिसेप्टर व्यक्त करतात, जे विशिष्ट पुनरुत्पादक प्रक्रियांचेनियमन करणारे हार्मोन आहे. स्टेम पेशी एंडोमेट्रिओसिस सारख्या परिस्थितीत फायदेशीर ठरू शकतात आणि एंडोमेट्रियल जाडीवाढविण्यात मदत करू शकतात. एकंदरीत, वंध्यत्वाच्या विविध कारणांवर एकट्या सेल-आधारित थेरपीने किंवा सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रांच्या संयोगाने त्यांचे परिणामवाढवता येतात. वंध्यत्वाच्या प्रत्येक प्रकरणाचे कारण शोधणे आणि वैयक्तिक उपचारांची योजना करणे आवश्यक आहे ज्यामुळे जोडप्यांना त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करता येईल. आजकाल ही समस्या अनेक जोडप्यांना सतावते. त्यामुळे याविषयी खुलेपणाने बोलायलाही हवे. जेणेकरून पुढील उपचार करणे अत्यंत सोपे होईल आणि ही समस्या सोडवता येऊ शकेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक