ADVERTISEMENT
home / फॅशन
बॉलीवूडमधील आई-लेकीच्या स्टायलिश जोड्या

बॉलीवूडमधील आई-लेकीच्या स्टायलिश जोड्या

लहानपणापासून प्रत्येक लेक ही आपल्या आईच्या वॉर्डरोबवर डोळा ठेवून असते, असं म्हणायला हरकत नाही. कारण लहानपणापासूनच आपण आईच्या साड्या, आईचं मेकअप किट आणि आईची ज्वेलरी अशी प्रत्येक गोष्ट हळूहळू वापरायला सुरूवात करतोच आणि आईलाही त्यात आनंद मिळतो. मग याला बॉलीवूडमधील आई-लेकीच्या जोड्या कशा अपवाद असतील. या मदर्स डे च्या शुभेच्छा यानिमित्ताने पाहूया बॉलीवूडमधील स्टायलिश माय-लेकींच्या जोड्या.

गौरी आणि सुहाना खान

Instagram

बॉलीवूडमधील मॉस्ट स्टायलिश मायलेकींची जोडी म्हणजे गौरी आणि सुहाना खान आहे. किंग खानची पत्नी आणि व्यवसायाने डिझाईनर असणारी गौरी खान नेहमीच तिच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्याप्रमाणेच सुहाना खानसुद्धा तिच्या लुक्समुळे सतत चर्चेत असते. बॉलीवूडमध्ये येण्याआधीच तिच्या फॅशनमुळे ती अनेकांची आवडती झाली आहे.

सुनीता कपूर आणि सोनम-रिया कपूर

Instagram

ADVERTISEMENT

स्टाईल आणि कपूर कुटुंबाचं नाव जणू एकच आहे. अभिनेता अनिल कपूर यांची पत्नी सुनिता कपूर या स्वतः ज्वेलरी डिझाईनर असल्यामुळे दोन्ही मुलींमध्ये ते गुण उतरणं साहजिकच आहे. सोनम कपूरच्या वेडिंग लुकने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. तिच्या चित्रपटातही तिने नेहमीच स्टाईल स्टेटमेंट दाखवून दिलं आहे.

श्वेता बच्चन आणि नव्या नंदा नवेली

Instagram

बॉलीवूडचे प्रथितयश बच्चन कुटुंबातील श्वेता बच्चन हिचं स्वतः अशी पर्सनल स्टाईल आहे. ज्यासाठी ती बॉलीवूडमध्येही ओळखली जाते. त्याप्रमाणेच श्वेताची मुलगी नव्या नंदा नवेलीसुद्धा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. या दोघी सतत कॅमेरा समोर नसल्यातरी अनेक डिझाईनर्सच्या यादीत त्यांचं नावं आवर्जून असतं.

सोनी राझदान आणि आलिया भट

Instagram

ADVERTISEMENT

आलिया भट ही आज बॉलीवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. वडील महेश भट दिग्दर्शक-निर्मात तर आई सोनी राझदान ही बॉलीवूड अभिनेत्री असल्यामुळे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आलियाही बॉलीवूडमध्ये आली. या माय-लेकींनी चित्रपटातही आईमुलीची भूमिका साकारली आहे. देशभक्तीवरील चित्रपट राजीमध्ये या दोघींनी उत्तम भूमिका वठवल्या होत्या. तसंच रिअल लाईफमध्येही या दोघी बरेचदा स्टायलिश लुक्समध्ये एकत्र दिसतात.

अमृता सिंग आणि सारा अली खान

Instagram

सारा अली खान बॉलीवूडमध्ये आल्यापासून तिच्या स्टाईल सेन्समुळे सतत चर्चेत असते. खासकरून ती भारतीय वेशभूषेला पसंती देताना दिसते. तिचा प्रत्येक लुक छानच असतो असं म्हणायला हरकत नाही. आई आणि अभिनेत्री अमृता सिंगसोबत सारा बरेचदा ट्वीनिंग करताना दिसते. खासकरून भारतीय सणवाराला या दोघी छान पारंपारिक वेषभूषेत छान नटतात.

नीना गुप्ता आणि मसाबा गुप्ता

Instagram

ADVERTISEMENT

नीना आणि मसाबा या मायलेकींबद्दल जेवढं लिहावं तेवढं थोडं आहे. एक अभिनेत्री म्हणून उत्तमोत्तम भूमिकांनी बॉलीवूड गाजवलेली आई आणि तिच्या एक पाऊल पुढे फॅशन जगतात आपला ब्रँड निर्माण करणारी मुलगी अशी ही जोडी आहे. दोघींच्याही स्टाईल्स या स्टेटमेंट करणाऱ्या असतात.

श्रीदेवी आणि जान्हवी-खुशी कपूर

Instagram

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी ही तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध होतीच. तिच्या मुलीही आईप्रमाणेच नेहमीच स्टाईलिश अवतारात दिसतात. एकीकडे जान्हवी बरेचदा साध्या आणि सोप्या पंजाबी ड्रेसेसमध्ये वावरताना दिसते तर खुशीचं स्टाईल स्टेटमेंट हे नेहमी ग्लॅमरस असतं.

पूजा बेदी आणि अलाया एफ

Instagram

ADVERTISEMENT

हॉटनेस हा या कुटुंबाच्या रक्तातच आहे, असं म्हणायला हरकत नाही. पूजा बेदी ही तिच्या फॅशन आणि आयुष्यातील निर्णयांमुळे सतत चर्चेत असायचीच. तर अलायाने ही तिच्या पहिल्या चित्रपटातच तिच्यातील स्पार्क दाखवला आहे.

शर्मिला टागोर आणि सोहा अली खान

Instagram

अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक बोल्ड निर्णय घेतल्याचं तुम्हाला माहीत असेलच. 80 च्या दशकात शर्मिला या बॉलीवूडच्या फॅशन आयकॉन होत्या. तर सोहा अली खान बॉलीवूडमध्ये जरी खास कामगिरी करू शकली नसली तरी तिचा ड्रेसिंग सेन्स नक्कीच रॉयल आहे.

महीप कपूर आणि शनाया कपूर

Instagram

ADVERTISEMENT

शनाया कपूरने बॉलीवूडमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून पदार्पण केलं असलं तरी ती तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे सतत चर्चेत असते. आश्चर्य नाही की, शनाया लवकरच अभिनेत्री म्हणूनही झळकणार आहे. आई महीप कपूरकडून शनायाला फॅशनची आवड मिळाली आहे. कारण महीप कपूर ही स्वतः एक डिझाईनर आहे.

हेमामालिनी आणि ईशा-आहना

Instagram

बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमामालिनी फार आधीपासून बॉलीवूडमध्ये फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाते. तिच्या दोन्ही मुली बॉलीवूडमध्ये काही खास करू शकल्या नाहीत. पण जेव्हा जेव्हा एखाद्या फॅमिली फंक्शन किंवा सेलिब्रिटी इव्हेंटची गोष्ट असते तेव्हा या तिघीही त्यांच्या स्टाईलने लक्ष वेधून घेतातच.

बबिता आणि करिश्मा-करिना कपूर

ADVERTISEMENT

लोलो आणि बेबोच्या स्टाईलबद्दल वेगळं सांगायची गरज नाहीच. त्यांची आई म्हणजेच अभिनेत्री बबिताचं नाव स्टाईलसाठी ओळखलं जात नसलं तरी दोन्ही मुली मात्र फॅशनच्या बाबतीत अव्वलच आहेत.

07 May 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT