दी कपिल शर्मा शो (The kapil sharma show) चे अनेक चाहते आहेत. दिवसेंदिवस या शोची लोकप्रियता वाढतच आहे. या शोच्या लोकप्रियतेमागे कपिल शर्माप्रमाणेच या शोचा महत्त्वाचा भाग असलेले इतर अनेक कलाकार कारणीभूत आहेत. 2016 साली या शोमध्ये सुंगधा शर्मा ही कॉमेडी अभिनेत्रीदेखील होती. मात्र नंतर नव्याने बदल झालेल्या दी कपिल शर्मा शोमध्ये ती कधीच दिसली नाही. आता तब्बल तीन ते चार वर्षांनी सुंगधाने या शोबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. ज्यावरून ती पुन्हा या शोमध्ये येण्यास इच्छुक आहे का असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
काय झालं होतं तेव्हा…
2017 हे साल कपिल शर्मा शोसाठी समस्यांनी भरलेलं होतं. ज्या काळात कपिल आणि सुनिल ग्रोव्हरचा विमान प्रवास दरम्यान झालेलं भांडण चव्हाट्यावर आलं. याच काळात सुनिलने हा शो सोडल्याबरोबर लगेच त्याच्या मागोमाग अली अजगर, उपासना सिंह, सुंगधा मिश्रा, संकेत भोसले असे लोकप्रिय कलाकारही या शोपासून दूरावले गेले. त्या वादानंतर कपिलच्याही लोकप्रियतेला उतरती कळा लागली. मात्र तो पुन्हा नव्याने उभा राहिला आणि त्याने नंतर दी कपिल शर्मा शो लोकांच्या मनात रूजवला. पुन्हा नव्याने सुरु झालेल्या या शोमध्ये त्याचे जुने साथीदार मात्र नव्हते. याबाबत अनेक अफवा पसवण्यात आल्या होत्या. कारण नव्या शोमध्ये कपिलसोबत होते भारती सिंह, कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवती. आज या सर्व कलाकारांमुळे दी कपिल शर्मा शो सुपरहिट ठरला आहे. मात्र चाहते आजही जुने कलाकार पुन्हा या शोमध्ये सहभागी होतील अशी आशा बाळगून आहेत.
काय म्हणाली सुंगधा मिश्रा –
कधी काळी कॉमेडिअन सुंगधा मिश्रा कपिल शर्मा शोचा एक महत्त्वाचा भाग होती. मात्र आता तीन ते चार वर्षांनी कॉमेडिअन सुंगधा मिश्राने कपिल शर्मा शो सोडण्यामागचं धक्कादायक कारण जाहीर केलं आहे. ज्यावरून ती पुन्हा या शोमध्ये सहभागी होणार नाही असंच दिसत आहे. सुंगधाला ती कपिल शर्मा शोमध्ये परत येणार का असं विचारलं असता तिने उत्तर दिलं की, सध्या तरी तिचा असा कोणताही प्लॅन नाही. कारण ती सध्या तिच्या नव्या शोमध्ये बिझी आहे. सुंगधा तारे जमिन पर या शोला होस्ट करत आहे. हा शो डेली शो असल्यामुळे ती सध्या या शोच्या शूटिंगमध्ये इतकी व्यस्त आहे की जरी तिला कपिल शर्मा शोमधून ऑफर आली तरी ती त्यासाठी वेळ देऊ शकत नाही. सध्या एका शोच्या कॉन्ट्रक्टमध्ये बांधली गेली असल्यामुळे दुसरी जबाबदारी स्वीकारणं तिला सध्या तरी शक्य नाही. यासोबतच सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुंगधाने हा शो सोडण्यामागचं कारणही उघड केलं आहे. जेव्हा सुनिल ग्रोव्हरला कपिल शर्मा शोमधुन बाहेर पडला त्यानंतर शोचा पूर्ण फॉरमॅट अचानक चेंज करण्यात आला होता. या सर्व वादाचा परिणाम इतर कलाकारांवरही पडू लागला होता. त्या सर्वांची मेहनत यामुळे वाया जात होती. शोमध्ये बदल केल्यानंतर काही कलाकारांना बोलवण्यातच आलं नाही. माझ्या कॉमेडीचा एक छान प्रवास सुरू होता मात्र तो अचानक तिथेच थांबला. सुंगधाला सुनिल ग्रोव्हरसोबत काम करणं जास्त सोयीचं आणि सुरक्षित वाटत होतं. मात्र पुढे तो प्रवास थांबल्यामुळे तिला शो सोडावा लागला होता. तिच्या मते काही शोचा एक प्रवास असतो. तिचा प्रवास तिथपर्यंतच होता. त्यामुळे आता पुढे पुन्हा एकदा त्या प्रवासाला जाण्याची सुंगधाची सध्यातरी मुळीच इच्छा नाही.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
2021 मध्ये या जोड्यांनी थाटावा संसार, चाहत्यांची इच्छा
एकेकाळी बॉलीवूडमध्ये खूप चर्चा झाली होती या लव्ह ट्रॅंगल्सची
#2020 मध्ये या सेलिब्रिटीजच्या घरी आले लहान पाहुणे, पहिल्यांदाच झाले आई-वडील