ADVERTISEMENT
home / Diet
sugar detox

शुगर डिटॉक्स करताय, मग साखरेबद्दल असलेले हे गैरसमज आधी दूर करा

आपल्या सर्वांना माहित आहे की जास्त साखर खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. हे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांचे कारण असू शकते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी साखरेचे सेवन कमी करावे असा सल्ला दिला जातो. इतकंच नाही तर काही लोक पूर्णपणे शुगर डिटॉक्स करण्याचा विचारही करतात. शुगर डिटॉक्स केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हल्ली शुगर डिटॉक्सबद्दल ऑनलाईन भरपूर माहिती उपलब्ध आहे पण त्यापैकी काय खरे, काय खोटे हे शोधणे खूप कठीण होते. कधीकधी त्यामुळे आपला गोंधळ उडतो. सहजपणे उपलब्ध असलेल्या भरमसाठ माहितीमुळे आपण अनेक मिथकांवर विश्वास ठेवू लागतो. तर आज या लेखात जाणून घेऊया शुगर डिटॉक्सशी संबंधित मिथक आणि त्यांचे सत्य- 

साखरेत काय असते   

साखर ही कर्बोदके आहेत आणि ती आपल्या उर्जेचा स्रोत आहेत. शर्करेचे अनेक भिन्न प्रकार असतात. ही विविध प्रकारची शर्करा  फळे आणि दुग्धजन्य पदार्थांसारख्या विशिष्ट पदार्थांमध्ये नैसर्गिकरित्या आढळते तर शर्करेचे काही प्रकार मानवनिर्मित आहेत. साधी शर्करा किंवा मोनोसॅकराइड्समध्ये ग्लुकोज आणि फ्रक्टोजचा समावेश होतो. तर, पांढरी दाणेदार साखर ही एक मिश्रित साखर किंवा सुक्रोज म्हणून ओळखले जाणारे disaccharide आहे. 

गैरसमज 1: साखरेमुळे मधुमेह होतो 

Sugar Detox Myths
Sugar Detox Myths

खरं तर टाईप-2 मधुमेह ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ खूप जास्त राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असल्यास, अंधत्वापासून ते हृदयरोगापर्यंत अनेक रोग होण्याची शक्यता वाढते. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे जास्त साखर खाल्ल्याने मधुमेह होतो, असा सर्वसामान्य समज आहे. इंसुलिन तुमच्या यकृत, स्नायू आणि चरबीच्या पेशींमध्ये साखर किंवा ग्लुकोजला प्रवेश करू देते. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण इन्सुलिन हार्मोनच्या कमतरतेमुळे किंवा इन्सुलिन नसल्यामुळे  वाढते. आपण हे देखील समजून घेणे आवश्यक आहे की लठ्ठपणा आणि मधुमेहाचा जवळचा संबंध आहे कारण टाइप-2 मधुमेह असलेले 90 टक्के लोक लठ्ठ आहेत. लठ्ठपणामुळे शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो त्यामुळे शरीराला रक्तातील साखर नियंत्रित करणे कठीण होते. याशिवाय, बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी काही लाइफस्टाइल चेंजेस करावे लागतात. त्यामुळे साखरेचे सेवन नेहमी योग्य प्रमाणात करा. पण, केवळ साखरेमुळेच मधुमेह होतो, असे म्हणणे चुकीचे आहे.

गैरसमज 2: साखरेचे सेवन टाळणे सोपे आहे 

लोकांना असे वाटते की आहारातील साखरेचे स्त्रोत म्हणजे केवळ शीतपेये आणि गोड पदार्थ होत. परंतु हे पूर्णपणे सत्य नाही. कारण साखर अनेकी पदार्थांत लपलेली असू शकते जी आपल्याला सहज कळणार नाही. जेव्हा लोक शुगर डिटॉक्स करतात, तेव्हा ते कँडी, कुकीज आणि इतर गोड पदार्थ खाणे टाळतात. परंतु काहीवेळा हेल्दी म्हणवल्या जाणार्‍या फ्लेवर्ड दही, ग्रॅनोला, एनर्जी बार, ब्रेड, सॉसेस किंवा नट बटर या पॅक्ड पदार्थांमध्येही साखर असू शकते. म्हणूनच पदार्थामध्ये नेमकी साखर किती आहे हे जाणून घेण्यासाठी त्यावरील लेबल काळजीपूर्वक वाचले पाहिजे. 

ADVERTISEMENT

गैरसमज 3: आहारातील साखर कमी करण्यासाठी आपण फळे देखील कमी केली पाहिजेत 

Sugar Detox Myths
Sugar Detox Myths

जेव्हा लोक शुगर डिटॉक्स करतात तेव्हा ते फळे खाणे देखील कमी करतात कारण त्यात काही प्रमाणात साखर असते. परंतु हे जाणून घ्या की फळे खाणे सुरक्षित आहे. फळांमध्ये साखर असते, परंतु ते फ्रक्टोज असते, ते शरीरात सहजपणे पचवले जाते. फळांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात जे शरीरासाठी आवश्यक आहेत. 

म्हणून इंटरनेटवरची माहिती वाचून आपल्या मनाने शुगर डिटॉक्स करण्यापेक्षा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच डाएट तयार करा.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

06 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT