ADVERTISEMENT
home / आरोग्य
उन्हाळ्यातील आहार

उन्हाळ्यातील आहार | Food For Summer Days In Marathi

वातावरणात उष्मा वाढला की, काहीही खावेसे वाटत नाही. आपला रोजचा आहार अगदी नकोसा होऊ लागतो. वातावरणात बदल झाल्यावर ज्याप्रमाणे आपण कपड्यांमध्ये बदल करतो. अगदी त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील आहार हा देखील बदलायला हवा. आहारात हे बदल केले तर उन्हाळ्यात थंडावा मिळण्यास मदत मिळते. उन्हाळ्यातील आहार  नेमका कसा असायला हवा. अगदी पेयापासून ते तुमच्या मेनकोर्सपर्यंत तुम्ही काय काय घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल हे आज आपण जाणून घेऊया. एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिना हा अधिक त्रासदायक असतो. अशा या तापमानात काय खावे यासाठी ही खास माहिती.

उन्हाळ्यातील पेयं – Summer Drinks To Keep You Cool

उन्हाळ्यातील पेयं
Summer drinks to keep you cool

उन्हाळ्यात काहीही खावेसे वाटत नाही. सतत काही ना काही प्यायची इच्छा होते. तुम्ही या दिवसात खालील गोष्टी प्यायल्या की त्याचा फायदा मिळण्यास तुम्हाला मदत मिळते. 

ताक

दही मोडून तयार करण्यात आलेले ताक हे या उन्हाळ्यातील आहार यामधील उत्तम असे पेय आहे.  या दिवसात ताक प्यायल्याने पचनाला मदत मिळते. जेवणानंतर किंवा जेवताना तुम्ही थोडे थोडे ताक प्याल तर पचनशक्ती चांगली होते. ताकामध्ये थोडीशी जीरापूड किंवा चाट मसाला घातला की, त्याचा फायदा तुम्हाला होण्यास मदत मिळेल. उन्हाळ्यातील आहार यामध्ये याचा अगदी हमखास समावेश करायला हवा. ताकाचे फायदे मिळण्यास ताकाचे सेवन महत्वपूर्ण ठरते

कोकम सरबत

कोकम सरबत हे देखील शरीराला कमालीचा थंडावा देण्यासाठी फारच चांगले असे पेय आहे. तुम्ही कोकम सरबत प्यायले तर तुमच्या शरीरातील हिट कमी होईल. तुमची पचनशक्ती वाढले. अपचनाचा त्रास होत असेल तर तो देखील कमी होण्यास मदत होईल. अनेकदा खाल्ल्यानंतर पोटामध्ये आग आग होते अशावेळी थंडावा देण्याचे काम कोकम सरबत करते. 

ADVERTISEMENT

कैरीचे पन्हे

उन्हाळ्याच्या दिवसातील अगदी चांगली गोष्ट म्हणजे कैरी आणि आंबा. या दोन्ही गोष्टी तुमच्या आहारात असायला हव्यात. कैरीपासून तयार करण्यात आलेले कैरी पन्हे हे फारच लाभदायची असते. त्यामुळे पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. कैरीच्या पन्ह्यामध्ये असलेला कैरीचा अर्क हा तुमची भूकही वाढवतो. 

लस्सी

दह्यापासून तयार झालेले ताक तुम्हाला आवडत नसेल  आणि काहीतरी गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही लस्सी देखील तयार करु शकता. लस्सी ही तहान वाढवत असली तरी पोटाला थंडावा देण्याचे काम लस्सी करते. त्यामुळे या दिवसात तुम्ही लस्सी ही ट्राय करायला हवी.

लिंबू सरबत

लिंबू उन्हाळ्याच्या दिवसातील वरदान आहे. उन्हाळ्यात तुम्ही लिंबाचा रस घेतला तर शरीराला उर्जा मिळते. त्यामुळे तुम्ही लिंब असल्यास लिंबाचा रस प्यायला काहीच हरकत नाही. 

उन्हाळ्यातील धान्य/डाळी – Summer Pulses

उन्हाळ्यातील धान्य/डाळी
उन्हाळ्यातील धान्य/डाळी

उन्हाळ्यातील आहारात धान्य आणि डाळी यांचा समावेश करणे देखील तितकेच गरजेचे असते. डाळी नसतील तर तुम्हाला पूर्ण पोषण मिळणार नाही. पण धान्यांमधील काही घटक हे उष्णता वाढवणारे असतात. 

ADVERTISEMENT
  • नाचणी, मूग, ज्वारी अशा थंड प्रवृत्तीच्या घटकांचा समावेश तुम्ही करायला हवा. यापासून तुम्ही डाळ, भाकरी, डोसे असे पदार्थ नक्की बनवू शकता.

उन्हाळ्यातील भाज्या | Summer Vegetables

उन्हाळ्यामध्ये खास अशा भाज्या येत नाहीत. तसंही हल्ली वर्षभर आपल्याला वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध असतात. त्यात उन्हाळ्यात पूर्ण जेवण करायचा कंटाळाच येतो. 

  • तुम्ही भाजी करणार असाल तर पालेभाजी (पालक,मेथी, मुळा, माठ) अशा भाज्या खा. इतकेच नाही तर या दिवतास कडधान्यांनाही चांगले मोड येतात. त्यामुळे याचा देखील समावेश करा. तुम्ही गरम मसाल्याची भाजी करण्यापेक्षा कमीत कमी मसाले घालून अशा भाज्या बनवा. 

उन्हाळ्यातील सुकामेवा – Dry Fruits For Summer

उन्हाळ्यातील सुकामेवा
उन्हाळ्यातील सुकामेवा

उन्हाळ्यात सुकामेवा खाताना थोडा जपून खावा लागतो. कारण सुकामेव्यातून  उष्णता जास्त मिळते. ही उष्णता उन्हाळ्यात चांगली नाही. त्यामुळे याचे सेवन बेताने करायला हवे. उन्हाळ्यात तुम्ही मनुके, बदाम खायला हरकत नाही. पण ते खाताना तुम्ही जपून खावे

उन्हाळ्यासाठी मिड टाईम स्नॅक – Mid Time Snack For Summer

उन्हाळ्यासाठी मिड टाईम स्नॅक
उन्हाळ्यासाठी मिड टाईम स्नॅक

खूप जणांना मधल्या वेळात काहीतरी असे खायला हवे असते. अशावेळी उन्हाळ्यातील आहारामध्ये काय समाविष्ट करावे ते जाणून घेऊया

इन्फ्युज्ड वॉटर

शरीराची उष्णता कमी  करायची असेल तर तुम्ही इन्फ्युज्ड वॉटर हे देखील प्यायला हरकत नाही. पाण्यामध्ये लिंबू, पुदीना, जीरे असे घालून ते पाणी तसेच ठेवून द्या. दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पाणी प्या.

ADVERTISEMENT

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी हे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी फायद्याचे असते. सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही नारळाचे पाणी प्या. हे नारळाचे पाणी या दिवसात नक्की प्या. 

काकडीचे सलाद

समर कुलर म्हणून प्रसिद्ध असलेली काकडी देखील तुम्ही अगदी आवर्जून खायला हवी. काकडीची कोशिंबीर, दही आणि शेंगदाण्याचा कूट घालून करु शकता. ही काकडीची कोशिंबीर खाल्ली तरी देखील तुम्हाला आराम मिळेल. खिचडीचे प्रकार केल्यानंतर ही तुम्हाला काकडीचे सलाद खाता येते

मिश्र भाज्या

चांगला आहार पोटात जावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊन त्या छान टॉस करुन त्यामध्ये चाट मसाला आणि इतर काही मसाले घालूनही खाऊ शकता. या अशा भाज्या देखील खायला बऱ्या वाटतात.

कडधान्यांचे चाट

संध्याकाळच्या वेळी काहीतरी खायची इच्छा होत असेल तर तुम्ही कडधान्यांचे चाट करुन खाऊ शकता. कडधान्य ही शरीराला प्रोटीन पुरवण्याचे काम करतात. त्यामुळे उन्हाळ्याताच नाही तर तुम्ही इतरवेळी देखील अशा प्रकारे कडधान्यांचे चाट करुन खाऊ शकता. कडधान्यांचे चाट करताना तुम्ही त्यामध्ये मस्त कांदा- टोमॅटो देखील घालू शकता. त्यामुळे याची चव अधिक वाढते

ADVERTISEMENT

उन्हाळ्यासाठी योग्य आहार – Main Course For Summer

उन्हाळ्यासाठी योग्य आहार
उन्हाळ्यासाठी योग्य आहार

उन्हाळ्याच्या दिवसात काहीही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी काहीतरी मस्त लाईट पण तितकेच पोटभरीचे खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यातील आहार लाईट असावा म्हणजे नेमका कसा ते जाणून घेऊया. 

मिक्स व्हेज सँडवीच

काहीतरी पोटभरीचे पण खाण्याचा कंटाळा येणार नाही. असे पदार्थ खाण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही छान मिक्स व्हेज सँडवीच करुन खाऊ शकता. तुमच्या आवडीचा ब्रेड घेऊन त्यामध्ये काकडी, बटाटा, बीट, टोमॅटो असे घालून खाल्ले तरी देखील तुम्हाला रिफ्रेश वाटेल.

मुंग डोसा 

उन्हाळ्याच्या या दिवसात काहीही गरम खाण्याची इच्छा होत नाही. रोजचा डाळ- भात खायचाही कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही मस्त मुंग डाळ डोसा खायला हवा. मुंगडाळीपासून तयार करण्यात आलेला डोसा हा पौष्टिक आणि तुम्हाला वेगळी चव देणारा असा आहे. हा तुम्ही चटणी किंवा सांबारसोबत खाऊ शकता. 

दही वडा

शरीराला थंडाव्याची गरज असेल आणि पोट भरण्याची देखील अशावेळी तुम्ही दही वडा खाऊ शकता. दही वडा हा चटपटीत असतो. त्यामुळे तुमचे पोट भरते. शिवाय तुम्हाला एकदम थंड आणि शांत वाटते. तुम्हाला ॲसिडीटी झाली असेल आणि अशावेळी तुम्ही दहीवडा खाल्ला तर तुम्हाला थोडासा आराम नक्की मिळेल.

ADVERTISEMENT

ताकाची कढी

ताकाची कढी ही देखील उन्हाळ्यातील आहार यामधील बेस्ट असा पूर्ण आहार आहे. तुम्ही ताकाला फोडणी दिली आणि ती पोळी, भातासोबत खाल्ली तरी देखील त्याची चव उत्तम लागते. शिवाय असे जेवण जेवल्यावर पोटसुद्धा जड होत नाही.घरच्या घरी सोलकढी करणे देखील फारच सोपे आहे

सोलकढी

कोकम, नारळाचे दूध यापासून तयार केेलेली सोलकढी ही देखील खूप पौष्टिक असते. कोकमामुळे शरीराला थंडावा मिळतो. सोलकढीसोबत मऊ भात छान लागतो. पोटाला थंडावा मिळतो. पचन चांगले होते. त्यामुळे तुम्ही हमखास याचे सेवन करायला हवे. या शिवाय कलिंगड खाण्याचे फायदे मिळवू शकता

FAQ’S – Food For Summer Days In Marathi

प्रश्न : उन्हाळ्यात कोणते पदार्थ खाणे टाळावे ? (What Food Avoid During Summer )

उत्तर:  शरीरात हिट वाढवणारे पदार्थ म्हणजे तीळ, चिकन, अंडी आणि मसाले युक्त अशा पदार्थांचे सेवन या दिवसात करु नये. या दिवसात शरीराची पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे हे पदार्थ पचण्यास बराच वेळ जात. अशावेळी तुम्ही असे हिट वाढवणारे पदार्थ टाळलेले बरे. 

प्रश्न: उन्हाळ्यात भूक कमी लागणे हे सर्वसाधारण आहे का? (Is It Common To Feel Less Hungry During The Summer)

त्तर: हो, उन्हाळ्यात वातावरणातील उष्मा हा अधिक त्रासदायक असतो. अशावेळी शरीराला उर्जा मिळण्यासाठी जेवणापेक्षा सतत काहीतरी प्यावे असे वाटत राहते. भूक मंदावलेली असते. शरीराच्या हालचाली मंदावल्याचा परिणाम हा पचनावर होतो. त्यामुळेच की काय उन्हाळ्यात भूक कमी लागते

ADVERTISEMENT

प्रश्न : उन्हाळ्यात काय खाणे अधिक पौष्टिक आहे ? (Which Summer Foods Are Healthy?)

उत्तर : उन्हाळ्यात ताडगोळे, नारळाचे पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, ताक, सब्जा, मुगाची डाळ, खिचडी असे पदार्थ खाणे जास्त सोयीचे आणि शरीरासाठी फायद्याचे ठरते.

उन्हाळ्यात काय खायचे किंवा खाण्याचा कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यातील आहार असू द्या असा.

21 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT