ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Tips For Summer Makeup In Marathi

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi

आता उन्हाळा सुरु झाला आहे आणि सूर्य चांगलाच तापतोय. उन्हाळा म्हटलं की भयंकर उकाडा आणि या उकाड्याने लगेच घाम येतो. ज्या क्षणी आपण मेकअप करतो, तेव्हा जर आपण काही मिनिटेही विना पंख्याचे किंवा एसीचे राहिलो की घामाघूम होतो आणि आपली मेकअपची सगळी मेहेनत व वेळ वाया जातो. उन्हाळ्यातील मेकअपच्या काही प्रमुख समस्या म्हणजे केकी फाउंडेशन, अस्ताव्यस्त पसरलेला मस्करा, चिकट झालेले लिपस्टिक, चिकट तेलकट झालेले कपाळ आणि इतर अनेक समस्या येतात. खराब झालेला मेकअप आणि घामाने भिजलेले चेहरा हा उन्हाळ्याचा एक नकोसा भाग आहे. अर्थात यावर उन्हाळ्यात मेकअप न करणे हे उत्तर नाही. कुठेही प्रेझेंटेबल दिसायचं म्हटलं की मेकअप करण्यावाचून पर्याय नाही. अशा वेळी उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न पडतो. यावर उत्तर आहे की उन्हाळ्यात आपल्याला स्वेट-प्रूफ मेकअप करण्याची गरज असते. म्हणजे आर्द्रता कितीही वाढली तरीही आपला चेहरा नैसर्गिकरित्या, ताजातवाना आणि सुंदर दिसू शकेल. 

उन्हाळ्यात मेकअप करताना फॉलो करा या टिप्स – Summer Makeup Step By Step In Marathi

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा
उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

उन्हाळ्यात आर्द्रता आणि गरम हवामानात आपला मेकअप एक तासापेक्षा जास्त काळ टिकून राहणे कठीण असते. हल्ली तर आपण फेस मास्क लावतो त्यामुळे मेकअप केल्यावर घाम येण्याची शक्यता आणखीनच वाढलेली आहे. या दोन्हीचे संयोजन करणे फारच कठीण आहे आणि त्यामुळे अनेकांनी मेकअप करणे पूर्णपणे बंदच केले आहे. आपण हवामानावर नियंत्रण ठेवू शकत नसलो तरी तुम्ही थोडे सावध राहून उन्हाळा आणि आर्द्रतेवर मात करू शकतो. उन्हाळ्यात मेकअप कसा करावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या मेकअप टिप्स फॉलो करा आणि उन्हाळ्यातही छान ताजा तवाना लूक मिळवा. 

क्लिंजिंग 

मेकअप करताना चेहरा स्वच्छ करणे ही पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. उन्हाळ्यात आपला चेहेरा तसाही चिकट व तेलकट होतो त्यामुळे उन्हाळ्यात ऑइल फ्री फेस वॉश वापरला तर त्वचा टवटवीत आणि फ्रेश होते. याशिवाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चिकट ,घामट व तेलकट होण्याऱ्या त्वचेसाठी आपण घरगुती उपाय करु शकतो. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती, बेसन, कडुलिंब, मसूर डाळीचे पीठ यांसारखे घरगुती पदार्थ वापरून आपण फेसपॅक बनवू शकतो. मेकअप करण्याआधी चेहरा स्वच्छ करण्यासाठी कोमट किंवा साध्या पाण्याने चेहरा ओला करा. नंतर बोटांवर फेसवॉश घ्या आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा व गोलाकार मसाज करा. काही सेकंद थांबा आणि मग चेहेरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. 

ADVERTISEMENT

बर्फ लावणे 

उन्हाळ्यात मेकअप करताना बर्फ वापरण्याचा पर्यायही सोपा आणि प्रभावी ठरू शकतो. चेहेऱ्याला मेकअपच्या आधी बर्फ लावल्याने केवळ घामाची समस्या कमी होत नाही तर त्वचेला थंडपणा आणि आरामही मिळतो. चेहरा धुतल्यानंतर किंवा मेकअप करण्याच्या काही मिनिटे आधी तुम्ही चेहेऱ्यावर बर्फाचा खडा फिरवू शकता. असे केल्याने घाम येणे कमी होईल आणि मेकअपही बराच वेळ टिकून राहील.

वाचा – घरगुती सोप्या ब्युटी टिप्स मराठी

टोनिंग 

ADVERTISEMENT

टोनिंग हा स्किन केअर रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु अनेकदा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. टोनरमुळे त्वचेतील अशुद्धता निघून जाते आणि मुरुमांच्या समस्या देखील कमी होतात. तसेच त्वचेचे पोअर्स सुद्धा लहान होतात. स्वतःसाठी टोनरची निवड करताना आपली त्वचा कोरडी आहे की तेलकट किंवा कॉम्बिनेशन स्किन आहे की सेन्सिटिव्ह हे बघून त्याप्रमाणे टोनरची निवड करा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर पेरूचा अर्क असलेले टोनर उपयुक्त ठरू शकतो, कारण त्यात अँटी-सेबम गुणधर्म असतात. तसेच सॅलिसिलिक ऍसिड असलेले टोनर देखील उपयुक्त ठरतात. तर कोरड्या त्वचेसाठी कोरफडअसलेले टोनर वापरले जाऊ शकते. कोरफड चेहेऱ्याला  मॉइश्चराइझ करते व त्वचेला हायड्रेट करते. ज्यांना ऍक्ने किंवा पिम्पल्सची समस्या आहे त्यांनी अल्फा-हायड्रॉक्सी ऍसिड असलेल्या टोनरची निवड करावी. ऍक्ने असलेल्या त्वचेसाठी विच हेझेल असलेले टोनर देखील फायदेशीर ठरू शकते.तुम्हाला जर घरगुती टोनर बनवायचे असेल तर तुम्ही काकडीचा रस, कोरफडीचा गर व  गुलाबपाणी घालून तुम्ही घरच्या घरी टोनर बनवू शकता. नुसतेच गुलाबपाणीही टोनर म्हणून वापरता येऊ शकते. 

गुलाब पाण्यामुळे त्वचा तेलकट होण्यास प्रतिबंध होतो आणि त्वचेतील आर्द्रता टिकून राहते. त्यामुळे उन्हाळ्यात तर तुम्ही गुलाबपाण्याचा टोनर म्हणून नक्कीच वापर करू शकता. मेकअपच्या वेळेला आधी त्वचा फेस वॉश किंवा क्लिन्जरने स्वच्छ करून मग कापसाच्या बोळ्याने चेहेऱ्यावर व मानेवर टोनर लावून घ्या. पुढील मेकअप करण्याआधी टोनर त्वचेमध्ये शोषले जाईपर्यंत थांबा. 

सनस्क्रीन लावणे 

तुम्ही घरात असा किंवा बाहेर, प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येकानेच सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करते. सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेवर बारीक रेषा, अकाली सुरकुत्या, डाग/फ्रिकल्स, सनटॅन आणि सनबर्न होऊ शकतात. जर तुम्हाला उन्हाळ्यात घराबाहेर जायचे असेल तर घराबाहेर पडण्यापूर्वी 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे.

ADVERTISEMENT

आपल्यासाठी सनस्क्रीन लोशन निवडताना आपली त्वचा कोणत्या प्रकारात मोडते हे लक्षात घेऊनच सनस्क्रीनची निवड करा.  जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जेल आधारित किंवा वॉटर बेस्ड लोशन घ्या. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर आधारित सनस्क्रीन लोशनची निवड करा. मेकअप करताना चेहेरा स्वच्छ करून घेतल्यावर मग बोटाने चेहरा आणि मानेवर सनस्क्रीन लावा व हाताने त्वचेवर मसाज करत सनस्क्रीन त्वचेत मुरवा. यासाठी  तुम्ही मेकअप ब्लेंडचाही वापर करू शकता. 

योग्य प्राइमर वापरा

तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग केल्यानंतर लगेच चेहेऱ्यावर चांगला प्राइमर लावा. प्राइमरमुळे मेकअप जास्त काळ टिकून राहतो व चेहऱ्याच्या मेकअपसाठी एक बेस तयार करतो. मॅटिफायिंग प्राइमर वापरणे हा तेल-मुक्त आणि उष्णतारोधक मेकअप करण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे कारण प्राइमर त्वचेवरील दोष लपवतो व चेहेऱ्यावर अतिरिक्त चमक आणण्यास मदत करतो. 

लाइट बेस लावा

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात जितका कमी मेकअप, जितक्या कमी लेअर्स तितकी तो खराब होण्याची भीती कमी असते. उन्हाळ्यात घामामुळे मेकअप लगेच खराब होऊ शकतो अशावेळी स्वेट-प्रूफ मेकअपचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमचा बेस मेकअप मर्यादित ठेवणे, जेव्हा चेहेऱ्यावर घाम येतो तेव्हा तुमचे बेस लेयर केकी दिसू शकतात. तसेच जाड बेसमुळे त्वचेची रंध्रे बंद होऊ शकतात. म्हणूनच उन्हाळ्यात शक्यतोवर फाउंडेशन लावू नये आणि नैसर्गिक फिनिशसाठी थेट कन्सीलर लावावे. शक्य असल्यास, फक्त बीबी क्रीम आणि कन्सीलरची कागदाइतकी पातळ लियर लावा. जर तुम्हाला फाउंडेशन लावायचेच असेल तर मॅट टेक्सचर आणि फिनिश असलेल्या फाउंडेशनची निवड करा. बेस लावल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरने तो लॉक करा. कॉम्पॅक्ट पावडर तुमच्या चेहऱ्यावर तेल, चमक आणि सीबम नियंत्रित करण्यास मदत करेल.

पावडर ब्लश वापरू नका 

ब्लश कोणत्याही लूकमध्ये संतुलन  आणते आणि त्वचा निरोगी व टवटवीत दिसण्यात मदत करते. परंतु पावडर ब्लश वापरल्याने तुमचा चेहरा गुळगुळीत होऊ शकतो. तुमचा स्वेट -प्रूफ मेकअप आणखी चांगला होण्यासाठी तुम्ही जेल किंवा ब्लश टिंट वापरा आणि नंतर गाल गुलाबी दिसण्यासाठी क्रीमी लिपस्टिकचा वापर करा. 

हायलाइटर लावण्यास विसरू नका 

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात प्रत्येकाला चांगला, नैसर्गिक ग्लो आवडतो परंतु बरेच स्वेट-प्रूफ मेकअप उत्पादने ही मॅट स्वरूपात असल्याने मेकअप थोडा डल वाटू शकतो. अशावेळी हायलाइटर तुमचा स्वेट-प्रूफ मेकअप चमकवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.तुमचा रंग उजळ करण्यासाठी आणि चेहेऱ्यावर ग्लो आणण्यासाठी नाक, हनुवटी, कपाळावर हायलायटर नक्की लावा. 

आयशॅडोसाठी शिअर आणि पेस्टल शेड्सचा वापर करा 

रिच आणि डीप आयशॅडो सुंदरच दिसतात. परंतु उन्हाळ्यात मात्र या शेड्स जड वाटू शकतात. तुमचा समर प्रूफ मेकअप लुक लाईट ठेवण्यासाठी शिअर, पेस्टल शेड्सची निवड करा. हलक्या शेड्स उन्हाळ्याच्या वातावरणाशी जुळतात आणि घाम आला तरीही छान दिसतात. 

वॉटरप्रूफ मस्कारा निवडा

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात डोळ्यांचा मेकअप टिकून राहावा म्हणून घाम येण्यापासून संरक्षण करण्यासाठी लॉन्ग वेअर फॉर्म्युले असतात. उन्हाळ्यात मस्कारा पसरू नये म्हणून तुमच्या पापण्यांसाठी वॉटरप्रूफ मस्काराची निवड करा. 

मॅट लिपस्टिकची निवड करा 

तुमच्या ओठांच्या नाजूक त्वचेला सूर्याच्या उष्णतेचा आणि अतिनील किरणांचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे ओठांचा मेकअप करण्याआधी ओठांना पौष्टिक लिप बाम लावा. व त्यानंतर उत्तम कव्हरेज देणारे,  दीर्घकाळ टिकणारे, जलरोधक लिक्विड मॅट लिपस्टिक लावा. अशाप्रकारे स्वतःसाठी एक परफेक्ट लिपस्टिक शेड निवडा.

मेकअपच्या शेवटी सेटिंग स्प्रे वापरा 

ADVERTISEMENT

तुमचा मेकअप किती काळ टिकेल हे मेकअपच्या उत्पादनांवर नाही तर तुम्ही कश्या पद्धतीने मेकअप करता यावर अवलंबून आहे. म्हणूनच मेकअप झाल्यावर सेटिंग स्प्रे मारणे आवश्यक आहे. सेटिंग स्प्रे तुम्ही वापरलेल्या सर्व हीटप्रूफ मेकअप उत्पादनांना सील करण्यात मदत करेल आणि तुमचा मेकअप तुम्ही मेकअप रिमूव्हरने काढेपर्यंत टिकून राहील.  खरं तर उन्हाळ्यात भारंभार मेकअप कशाला हवाय, या वातावरणात तुम्ही ‘न्यूड’ मेकअपनेही सुंदर दिसाल.

उन्हाळ्यात आय मेकअपसाठी टिप्स – Eye Makeup In Summer In Marathi

डोळ्यांचा मेकअप जर उत्तम झाला असेल तर त्याने कोणत्याही स्त्रीचे सौंदर्य अधिक वाढते. पण आयमेकअप जर चांगला नसेल तर त्यामुळे संपूर्ण चेहेऱ्याचाच लूक बिघडतो. त्यात तर उन्हाळ्यात आयमेकअप टिकणे फार कठीण असते. काजळ, आयलायनर, मस्कारा किंवा इतर कोणताही मेकअप जास्त काळ टिकू शकत नाही. अशावेळी वॉटरप्रूफ आणि स्मजप्रूफ उत्पादने वापरणे शहाणपणाचे ठरते जेणे करून घामामुळे काजळ, आयलायनर पसरणार नाही. तुमचे डोळे अधिक चांगले डिफाइन करण्यासाठी आणि डोळ्यांच्या मेकअपमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून उन्हाळ्यात कोहल वापरा. ते जास्त काळ टिकून राहील. 

  • तुमच्या कपाळाच्या खाली न्यूट्रल टोनमध्ये हलकी चमकणारी आयशॅडो तुमच्या डोळ्यांकडे लक्ष वेधून घेईल. 
  • पापण्यांना मस्कारा लावताना तो लाइट स्ट्रोकमध्ये लावा आणि उन्हाळ्यात तर शक्यतोवर वॉटरप्रूफ मस्काराच वापरा. खालच्या पापण्यांवर मस्कारा लावणे टाळा. 
  • जर खूपच गरम व दमट वातावरण असेल तर फक्त काजल आणि मस्करा लावणे चांगले.
  • शक्यतोवर काजल, मस्कारा किंवा लायनर लावण्याऐवजी तिन्हीपैकी एकच काहीतरी लावा. 
  • काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांखालील भागावर कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित लावून घ्या. 
  • जर तुम्ही फक्त काजळ किंवा आयलायनरचा पर्याय निवडत असाल तर तुम्ही तुमच्या ड्रेसला मॅचिंग शेडचे लाइनर किंवा काजळ देखील लावू शकता. यासाठी तुम्ही इंडिगो ब्लू आणि ब्राऊन या सारख्या शेड्स वापरून डोळे हायलाइट करू शकता.
  • डोळे अधिक आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही विंग्ड लुक किंवा कॅट आय लूक ट्राय करू शकता. 
  • उन्हाळ्यात आयमेकअप करताना शिमर वापरू नका व डोळ्यांजवळ जास्त पावडर लावणे टाळा.
  • डोळ्यांच्या वॉटरलाइन भागात लिक्विड आयलाइनर लावू नका.

उन्हाळ्यात डोळ्यांचा मेकअप करताना मिनिमम लूक ठेवणे चांगले. भुवया डार्क करा आणि पापण्यांवर एकच मेटॅलिक आयशॅडो लावा. यामुळे तुमचा लूक बॅलन्स होईल. 

उन्हाळात असा करा लिप मेकअप – Lip Makeup In Summer

तुम्हाला उन्हाळ्यात मेकअप करताना मिनिमम पण फ्रेश लूक हवा असेल तर लीप टिंट तुम्हाला हा लूक देण्यात मदत करेल.लीप टिंट तुमच्या ओठांना नैसर्गिक रंग देईल. तुमच्याकडे जर लीप टिंट नसेल तर तुम्ही ते घरच्या घरीही बनवू शकता. ओठांचा मेकअप करताना मिक्सिंग प्लेटवर फक्त थोडासा लिप बाम घ्या. त्यात थोडासा पावडर ब्लश घाला आणि दोन्ही चांगले मिसळा. हे तुम्हाला एक सुंदर रंग देईल! जर तुमच्याकडे ब्लश नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुमचे लिप लाइनर किंवा क्रीमी लिपस्टिक देखील वापरू शकता. ते चांगले मिसळून आपल्या ओठांवर थोडेसे लावा. उन्हाळ्यात त्वचेप्रमाणेच ओठांना देखील संरक्षण आवश्यक आहे. त्यामुळे 15 किंवा त्याहून अधिक एसपीएफ असलेले लिपग्लॉस किंवा लिप बाम लावणे चांगले. यामुळे तुमचे ओठ हायड्रेटेड तसेच सुरक्षित राहतील.

ADVERTISEMENT

उन्हाळ्यात तुमच्या ओठांना उष्णतेपासून ते थंड आईस्क्रीमपर्यंत अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा वेळी जर तुम्हाला तुमचा ओठांचा मेकअप जास्त काळ टिकवायचा असेल तर या टिप्स वापरून बघा. 

  • लिपस्टिक लावताना ओठांवर आधी हलका प्राइमर किंवा फाउंडेशन लावा जेणेकरून लिपस्टिक जास्त काळ टिकेल.
  • कोणतीही लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप बाम लावा.
  • उन्हाळ्यात हलक्या शेडच्या लिपस्टिकची निवड करा. 
  • उन्हाळ्यात ग्लॉसी पेक्षा मॅट लिपस्टिक लावणे फायदेशीर आहे. तसेच लिपस्टिकबरोबर लिप लाइनर लावायला कधीही विसरू नका.
  • उन्हाळ्यात शक्यतोवर डार्क शेडची लिपस्टिक लावू नका.

उन्हाळ्याच्या दिवसात मेकअप जास्तीत जास्त काळ टिकवण्यासाठी टिप्स – How To Keep Your Makeup Long Lasting

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा
उन्हाळ्यात मेकअप कसा करावा

उष्ण हवामान असले की काहीही उपाय केले तरी घाम येणारच. अशावेळी जास्त वेळ मेकअप टिकवून ठेवणं फारच अवघड असतं. तुम्ही खालील टिप्स वापरून तुमचा मेकअप देखील दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता आणि कोणतीही चिंता न करता तुमची पार्टी, ऑफिस, पिकनिकचा आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात मेकअप दीर्घकाळ टिकण्यासाठी काही टिप्स.

  • दूध, ग्रीन टी किंवा काकडी यांसारख्या घरगुती घटक मिसळलेले बर्फाचे तुकडे उन्हाळ्यात त्वचेला शांत करतात. चेहऱ्याला बर्फ लावल्याने त्वचेची सूज तसेच जळजळ कमी होते, रक्ताभिसरण वाढते, त्वचा शांत होते आणि ती सैल पडत नाही. या सर्वांमुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते आणि तुमचा मेकअप अखंड दिसण्यास मदत होते.
  • तुमचा मेकअप वितळण्यापासून आणि तुमची त्वचा खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्हाला तुमची त्वचा स्वच्छ ठेवावी लागेल. म्हणजेच तुम्हाला तुमच्या उन्हाळ्याच्या स्किन केअर रुटीनमध्ये एक्सफोलिएशनची भर घालणे आवश्यक आहे. मेकअप सुरू करण्यापूर्वी चेहेरा एक्सफोलिएट करून चेहेऱ्यावरील त्वचेच्या मृतपेशी आणि बंद झालेले पोअर्स काढून टाका.  तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुरूप असा स्क्रब वापरून एक्सफोलिएट करा. यासाठी तुम्ही होममेड स्क्रब देखील निवडू शकता. टोमॅटो, साखर, मीठ आणि ओटमील असलेले स्क्रब उन्हाळ्यात वापरणे फायदेशीर आहे. 
  • तुम्ही उन्हाळ्यातील मेकअपसाठी कितीही वॉटरप्रूफ उत्पादने घेतलीत तरी उन्हाळ्यात तुम्ही तुमची त्वचा चांगली ठेवली नाही, तर चेहेऱ्यावर मेकअप चांगला बसणार नाही. त्यामुळे तुमच्या उन्हाळ्याच्या मेकअप रुटीनचा भाग म्हणून कायम प्राइमरने सुरुवात करा. मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर प्राइमरचा पातळ थर क्रिझ टाळण्यास मदत करतो आणि उन्हाळ्याच्या मेकअपसाठी एक बेस म्हणून काम करतो. उन्हाळ्यात सनस्क्रीन लावणेही तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे सनस्क्रीन प्राइमरमध्ये मिसळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर लावा. हे आपल्या उन्हाळ्यात मेकअप दीर्घकाळ टिकण्यास मदत करेल आणि चेहेऱ्याला चांगला फिनिशिंग टच देईल. 
  • उन्हाळयात आपण हेवी कव्हरेज फाउंडेशन न वापरता त्याऐवजी हलके बी बी क्रीम लावले पाहिजे. BB क्रीम एकसारखा टोन आणि संपूर्ण कव्हरेज देते आणि फाउंडेशनमुळे येणारा जड केकी लूक देत नाही. तुम्ही फाऊंडनेशन ऐवजी कन्सिलरचाही वापर करू शकता. 
  • तुमच्‍या उन्हाळ्यात मेकअप करताना आणखी एक महत्‍त्‍वाची पायरी आहे, ती म्हणजे मेकअप झाल्यावर फेस मिस्‍ट वापरणे. एकदा तुम्ही तुमच्या मेकअपला फिनिशिंग टच दिल्यानंतर, काही सेटिंग स्प्रे उर्फ ​​फेस मिस्टचा स्प्रे करा किंवा तुमचा मेकअप लॉक करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर लावा. फेस मिस्ट आणि कॉम्पॅक्ट केवळ तुमचा मेकअप टिकून राहण्यास मदत करत नाहीत तर त्यात तेल शोषून घेणारे गुणधर्म देखील आहेत जे मेकअप टिकवून ठेवण्यात मदत करतात. त्वचा ताजीतवानी आणि हायड्रेट ठेवण्यासाठी फेस मिस्ट स्प्रेचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्ही जास्त वेळ उन्हात बाहेर असाल तर अधूनमधून फेस मिस्ट स्प्रे मारल्यास तुम्हाला फ्रेश वाटेल.
  • शक्यतोवर वॉटरप्रूफ आणि स्मजप्रूफ मेकअप उत्पादने वापरा. यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होऊ शकत नाही.
  • पार्टी मेकअप असो किंवा सामान्य मेकअप, ब्राइट ऐवजी हलक्या मेकअपला महत्त्व द्या, जो थोडासा खराब झाला तरी वाईट दिसत नाही.
  • उन्हाळ्यात ऑइल बेस्ड मेकअप उत्पादनांऐवजी वॉटर बेस्ड मेकअप उत्पादने खरेदी करा, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर तेलकट होणार नाही. 
  • जड मेकअप किंवा जड मेकअप उत्पादने वापरणे टाळा. असे केल्याने तुमचा चेहरा केकी होऊ शकतो. तसेच, हेवी मेकअप प्रोडक्ट्स दीर्घकाळ वापरल्याने तुमच्या त्वचेचे नुकसान होऊ शकते.
  • क्रिमी आणि चमकदार उत्पादने वापरू नका. उन्हाळ्यात जास्त घाम येणे आणि चेहेरा तेलकट होणे यामुळे तुमचा चेहरा खूप तेलकट आणि घामट दिसू शकतो.
  • जास्त प्रमाणात फेस पावडर लावल्याने तुमच्या चेहऱ्याला घाम येतो आणि तुमचा मेकअप निघून जातो. त्यामुळे जास्त प्रमाणात पावडर लावणे टाळा.तसेच कॉस्मेटिक्सचा वापर कमी करा.

अधिक वाचा – मेकअप करण्यासाठी सोप्या टिप्स आणि ट्रिक्स

समरसाठी खास स्किन केयर टिप्स

उन्हाळ्यात आपली त्वचा अतिरिक्त तेलकट, चिकट, निर्जीव होते. तसेच उष्णतेमुळे त्वचेचा दाह देखील होतो. अशावेळी प्रत्येकाची इच्छा असते की आपली त्वचा सुंदर, निरोगी व टवटवीत दिसावी. उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. तर या उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्याच्या काही टिप्स वाचा व त्या ट्राय करून बघा. 

ADVERTISEMENT
  • आठवड्यातून किमान एकदा तरी त्वचा स्क्रब करा. स्क्रबिंगमुळे त्वचेच्या मृतपेशी निघून जातात आणि चेहरा चमकदार होऊ शकतो.
  • आठवड्यातून एकदा चेहऱ्याचे डीप क्लीनिंग करा. त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही मुलतानी माती, चंदन आणि इतर अशा घरगुती वस्तू वापरून फेस पॅक तयार करू शकता. 
  • उन्हाळ्यात घामामुळे आपल्या शरीरातले पाणी कमी होते. त्यामुळे शक्य तितके पाणी प्या. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने त्वचा हायड्रेट राहील आणि निर्जीव दिसणार नाही.
  • तसे तर प्रत्येकच ऋतूमध्ये सनस्क्रीन लावले पाहिजे पण उन्हाळ्यात कमीत कमी  SPF 15 असलेले सनस्क्रीन वापरलेच पाहिजे. सनस्क्रीन आपल्या त्वचेचे टॅनिंग, सुरकुत्या आणि उन्हामुळे होणाऱ्या त्वचेशी संबंधित इतर समस्यांपासून रक्षण करू शकते.
  • उन्हाळ्यातही आंघोळीसाठी आणि चेहरा धुण्यासाठी फक्त कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी वापरा. खूप गरम आणि खूप थंड पाणी तुमच्या त्वचेला इजा करू शकते.
  • दररोज योग्य संतुलित आहार घ्या. भाज्या, फळे, संपूर्ण धान्य आणि इतर पौष्टिक घटक मुबलक प्रमाणात असलेला आहार आपल्या शरीरासाठी व त्वचेसाठीही फायदेशीर आहे. 

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमचीही त्वचा उन्हाळ्यात सुद्धा छान राहील.

उन्हाळ्यात मेकअप कसा करावा याबद्दल सामान्यपणे पडणारे प्रश्न – FAQs

प्र. उन्हाळ्यात मेकअप करणे योग्य आहे का?

उ.प्रेझेंटेबल दिसण्यासाठी आपल्याला मेकअपचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेऊन आपण उन्हाळ्यातही मेकअप करू शकतो. फक्त जड किंवा जास्त ब्राईट मेकअप करू नये कारण यामुळे त्वचा ठिसूळ दिसू शकते. उन्हाळ्यात हलका मेकअप करावा. 

प्र. उन्हाळ्यात मेकअप कसा करावा?

ADVERTISEMENT

.उन्हाळ्यात मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जसे की वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड उत्पादने वापरणे, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणे, फक्त मॅट लिपस्टिक वापरणे, जास्त शिमरी आणि ग्लिटरी लूक न निवडणे या गोष्टी लक्षात घेऊन वर दिल्याप्रमाणे तुम्ही उन्हाळ्यातही फ्रेश लूक येईल असा मेकअप करू शकता. 

प्र. उन्हाळ्यात फाउंडेशनची शेड कशी निवडावी?

.खरं तर उन्हाळ्यात फाउंडेशन लावणे टाळावे. त्याऐवजी BB क्रीम किंवा कन्सीलर लावावे. पण जर तुम्हाला फाउंडेशन लावायचेच असेल तर आपल्या त्वचेच्या शेड पेक्षा थोडी लाईट शेड निवडा. 

प्र. उन्हाळ्यात पावडर फाउंडेशन लावावे की  लिक्विड फाउंडेशन?

ADVERTISEMENT

.उन्हाळ्यात मेकअप करताना पावडर फाउंडेशन वापरणेच शहाणपणाचे आहे. कारण पावडर फाउंडेशन तुमच्या त्वचा तेलकट होण्यापासून रोखू शकते.  तसेच ते  त्वचेला चिकटून राहते त्यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो. 

प्र. उन्हात बाहेर जाण्यापूर्वी कसा मेकअप करावा?

.बाहेर उन्हात जायचे असेल तर शक्यतो हलका मेकअप करा आणि बाहेर निघण्याच्या 10-15 मिनिटे आधी सनस्क्रीन लावा. बाहेर उन्हात गेल्यावर घाम येणारच. त्यामुळे क्रीम बेस्ड उत्पादने वापरू नका. तसेच उन्हात दर काही तासांनी तुमच्या चेहऱ्यावर फेस मिस्ट स्प्रे करा, जेणेकरून तुमचा चेहरा ताजा व टवटवीत दिसेल.

उन्हाळ्यात मेकअप करणे व तो टिकवून ठेवणे अत्यंत जिकिरीचे काम असते. म्हणूनच उन्हाळ्यात कमीत कमी उत्पादने वापरून शक्यतोवर हलका मेकअप करावा. मेकअप करताना सनस्क्रीन वापरायला विसरू नये व क्रीम बेस्ड उत्पादनांऐवजी वॉटर बेस्ड उत्पादने वापरावीत. तसेच उन्हाळ्यात त्वचा निस्तेज व निर्जीव होते, त्यामुळे त्वचेचीही योग्य काळजी घ्यावी जेणे करून तुमचे सौंदर्य अबाधित राहील. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

Quick Makeup Tips In Marathi – 5 मिनिट्समध्ये सोप्या पद्धतीने करा झटपट मेकअप

07 Apr 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT