ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
summer-skin-care-cooling-tips-in-marathi

उन्हाळ्यात त्वचा जळजळत असेल तर वापरा सोप्या टिप्स

उन्हाळा खूपच त्रासदायक ठरताना दिसून येत आहे. येणारा घाम आणि प्रदूषण, धूळ – मातीमुळे त्वचेच्या अधिकाधिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अनेकदा उन्हामुळे रॅशेस, सनबर्न आणि अॅक्ने याचा त्रास अनेकांना होताना दिसून येतो. सर्वात जास्त त्रास होतो तो म्हणजे त्वचेची जळजळ होणे. अशावेळी तुम्ही तुमच्या आसपास थंड गोष्टी ठेवायला हव्यात, ज्या उन्हाळ्यापासून तुम्हाला त्रास कमी करण्यास मदत करू शकतात. त्वचेला थंडावा देणाऱ्या अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही तुमच्या आयुष्यात समावेश करून घेऊ शकता. तसंच याचा वापर करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. या नैसर्गिक गोष्टींमध्ये काकडी, कोरफड, खस, पिकलेली पपई, टरबूज, लिंबू, ताक, नारळाचे पाणी, नारळाचे दूध आणि पुदिना यांचा समावेश आहे. या नैसर्गिक गोष्टींचा वापर उन्हाची जळजळ त्वचेवर होत असेल तर कशा पद्धतीने करायचा याबाबत आम्ही माहिती देत आहोत. तुम्हीही याचा वापर करून पाहू शकता. 

गुलाबपाणी (Rose Water)

त्वचा आणि केसांसाठी गुलाबजल चे फायदे
Rose Water For Skin

गुलाबपाणी हे त्वचेला थंडावा देण्याचे काम करते. त्वचेसाठी हे एक टॉनिकच आहे. त्यामुळे त्वचेची जळजळ होण्यासाठी गुलाबपाणी एक चांगला पर्याय आहे. त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा एका बाऊलमध्ये गुलाबपाणी घ्या आणि थंड करून घ्या आणि मग त्यात कापूस भिजवून घ्या. त्यानंतर आपल्या त्वचेला टोन करण्यासाठी आणि रक्तप्रवाह चांगला होण्यासाठी थंड गुलाबपाण्याचा वापर आपल्या चेहऱ्यावर लावा. गुलाबपाणी रोज वापरल्याने त्वचेला अधिक आराम मिळतो आणि त्वचेची जळजळ होत नाही. तसंच त्वचा अधिक उजळलेली दिसून येईल. 

काकडी (Cucumber)

Cucumber For Skin

काकडी उन्हाळ्यात सौंदर्यासाठी एक उत्तम साहित्य आहे. आपल्या त्वचेवर आलेले तेल कमी करण्यासाठी काकडीचा वापर करणे अधिक चांगले आहे. याशिवाय काकडीचा वापर हा आपल्या स्किन टोनला थंडावा देण्यासाठी होतो. टॅन हटविण्यासाठी याचा वापर करता येतो. काकडीचा रस हा त्वचेवरील जळजळ आणि काही काळे डाग काढण्यासाठी उत्तम ठरतो आणि त्वचा अधिक चमकदार होण्यासाठीही याचा उपयोग होतो. तुम्ही तुमच्या डोळ्याजवळ रोज हे लावा आणि 15 मिनिट्स तसंच ठेवा. नंतर पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्वचेला यामुळे अधिक चमकदारपणा येतो. 

आईस क्युब्स (Ice Cubes)

Ice Cubes for Skin

तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्वचेची काळजी घेण्यासाठी आईस क्युब्सचा देखील समावेश करून घेऊ शकता. यासाठी तुम्ही सर्वात पहिले ग्रीन टी अथवा काकडीचा रस तयार करा आणि आईस ट्रे मध्ये घाला आणि फ्रिजरमध्ये बर्फाचे तुकडे जमवा. जेव्हा बर्फ संपूर्ण सेट होईल तेव्हा त्वचेवर त्याचा वापर करा. हे आईस क्युब तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. काकडीच्या रसाने बनलेले बर्फाचे तुकडे हे तुमच्या चेहऱ्यावरील तेल काढण्यासाठी आणि पोर्स बंद करण्याचे काम करते. तुम्हाला हवं असेल तर कोरफडासह बर्फाचे तुकडे तयार करा. हे बर्फाचे तुकडे तुमची त्वचा उन्हाळ्यात जळजळण्यापासून आराम मिळतो. आयुर्वेदानुसार, आंबट पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात मिळतात. यामध्ये कडुलिंब आणि कारल्यासारखे नैसर्गिक पदार्थ समाविष्ट असतात. 

ADVERTISEMENT

टरबूज आणि अंड्याच्या मदतीने फेसपॅक 

  • अंड्याच्या मदतीने फेसपॅक बनविण्यासाठी सर्वात पहिल्यांदा काकडीचा रस आणि टरबूज घ्या 
  • त्यात 2 चमचे दुधाची पावडर मिक्स करा
  • त्यानंतर अंड्याचा सफेद भाग घ्या आणि मिक्स करून हे मिश्रण तयार करा 
  • हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण अर्धा तास ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा 

दह्याचा फेसपॅक 

चमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा दह्याचे फेशियल
  • टरबूज त्वचेला थंडवा आणि मुलायमपणा देतो
  • यामध्ये तुम्ही दही मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला 20-30 मिनिट्स लाऊन ठेवा 
  • वेळ पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा मदतीने तुम्ही चेहरा स्वच्छ धुवा 

ग्रीन टी च्या मदतीने बनवा स्क्रब

green-tea
Green Tea Face Pack
  • स्क्रब तयार करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्ही ग्रीन टी च्या पानांची पावडर बनवून घ्या
  • या पावडरमध्ये दही आणि कोरफड जेल मिक्स करून मिश्रण तयार करा
  • हे मिश्रण काही वेळानंतर चेहरा आणि मानेवर लावा 
  • काही मिनिट्स तसंच राहू द्या
  • सुकल्यानंतर स्क्रब हलक्या हाताने रगडून तुम्ही काढा आणि पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा 

मुलतानी मातीचा फेसपॅक 

Multani Mati
  • मुलतानी मातीमध्ये एक चमचा गुलाबपामी मिक्स करा 
  • हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि साधारण 10 मिनिट्स सुकू द्या 
  • सुकल्यावर पाण्याने स्वच्छ धुवा. तुमच्या चेहऱ्याला थंडावा मिळेल

नारळाच्या पाण्याचा आणि नारळाच्या दुधाचा फेसपॅक 

how to check quality of coconut oil in Marathi
Coconut Water and Coconut Milk
  • उन्हाळ्यात त्वचा जळजळत असेल तर थंड राखण्यासाठी तुम्ही नारळ पाणी आणि नारळाच्या दुधाचा वापर करू शकता. हे तुम्हाला टॅन हटविण्यासाठीही मदत करते, तसंच तुमच्या चेहऱ्याला अधिक चमकदार बनवते 
  • नारळाचे दूध आणि नारळाचे पाणी एकत्र करून साधारण अर्धा तास चेहऱ्याला लावा 
  • त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा

उन्हाळ्याच्या दिवसात जर त्वचा जळजळत असेल तर तुम्ही या सोप्या टिप्स वापरून तुमच्या त्वचेला थंडावा देऊ शकता. मात्र कोणत्याही गोष्टीचा वापर करण्यापूर्वी पॅच टेस्ट करून पाहा 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT