मार्च महिन्यापासूनच उन्हामुळे अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. दिवसभरच नाही तर रात्री देखील काय कपडे घालावे असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या या दिवसात सकाळी उठल्या उठल्या तुम्हीही घामाने चिंब असे उठत असाल तर तुम्हाला तुमचे नाईटवेअर बदलण्याची गरज आहे.खास उन्हाळ्यासाठी तुम्ही असे नाईटवेअर वापरायला हवे जे तुम्हाला मस्त रिलॅक्स करतील आणि छान अशी झोप देण्यासही मदत करतील. आम्ही काही असे नाईटवेअर निवडले आहेत. जे तुम्हाला नक्कीच रिलॅक्स करु शकतील.
नाईट ड्रेस
खूप जणांना पँट किंवा अंगाला चिकटणारे असे कोणतेही कपडे घालायला आवडत नाही. अशांना जर काही मोकळे घालायचे असेल तर तुम्ही असे नाईट फ्रॉक ड्रेस निवडू शकता.असे ड्रेस हे खूप कम्फर्टेबल असतात. यामध्ये तुम्हाला स्लिव्हलेसचा पर्याय असल्यामुळे तुम्हाला गरम होत नाही. नाईट ड्रेसमध्ये तुम्हाला कॉटन आणि होजिअरी असे मटेरिअलमध्ये मिळतात. जे तुम्हाला आरामदायी वाटतात. शिवाय यामध्ये तुम्हाला अजिबात गरम होत नाही. हे नाईट ड्रेस धुवायला आणि स्वच्छतेसाठी खूपच सोपे असतात. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे नाईट ड्रेस घालायला काहीच हरकत नाही.
टॉप अँड शॉर्टस

खूप जणांची झोपण्याची पद्धत ही फारच वेगळी असते. म्हणजे सरळच्या सरळ काहीजणांना झोपताना येत नाही. अशांना ओपन नाईट ड्रेस किंवा फ्रॉक नाईट ड्रेस अजिबात घालता येत नाही. अशांसाठी आरामदायी असा पर्याय म्हणजे टॉप आणि शॉर्ट ड्रेस. हे तुम्हाला आरामदायी आणि कुल कुल फिलिंग देणारे असतात. असे कपडे तुम्हाला दिवसभऱही घालता येतात. आता यामध्ये तुम्हाला सिथेंटीक मटेरिअलमध्ये देखील मिळतात. पण तुम्हाला या दिवसात केवळ कॉटन आणि होजिअरी असाच पर्याय यामध्ये निवडायचा आहे.
टीप: पँट निवडताना तुम्ही हॉट शॉर्ट निवडू नका. कारण त्या खूप टाईट असतात. ज्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यात रॅशेश येऊ शकतात.
कॉटन टू पीस सेट

नाईटवेअर घालताना खूप जणांना घरात काहीही आणि कसेही कपडे घालता येत नाही. घरात वावरताना तुम्हाला काहीतरी चांगले असे हवे असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय खूपच उत्तम आहे. हे एखादया शॉर्ट कुडत्याप्रमाणे असतात. त्याखाली पँट असल्यामुळे ते घालून तुम्हाला कसेही वावरता येते. खूप जणांना असे कपडे हवे असतात. जे त्यांना झोपताना आणि इतरवेळीही आरामदायी वाटतील. हे असे कॉटनसेट तुम्हाला खूपच कम्फर्टेबल असतात. हल्ली तर यामध्ये अनेक डिझायनर पर्यायदेखील मिळतात. ते तुम्हाला नक्की ट्राय करता येतील.
कफ्तान
तुम्हाला काहीतरी स्टायलिश घालायचे असेल तर तुम्ही कफ्तान नावाचा प्रकारही ट्राय करु शकता. कफ्ताना हा सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. हा प्रकार खूपच स्टायलिश आणि सेक्सी दिसतो. तुम्हाला नाईटवेअरही हटके आवडत असेल तर तुम्ही नक्कीच असा प्रकार घालायला हवा. तुम्हाला यामध्ये लाँग आणि शॉर्ट असे दोन्ही प्रकार मिळतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही निवडायला हवा.
आता तुमचा उन्हाळा कुल कुल करण्यासाठी हे नाईटवेअर नक्की निवडू शकता.