ADVERTISEMENT
home / Uncategorized
कतरिना कैफ लग्नानंतर सासरी जाताना ही गोष्ट आणली, दिराने केलं कौतुक

कतरिना कैफ लग्नानंतर सासरी जाताना ही गोष्ट आणली, दिराने केलं कौतुक

बॉलीवूड स्टार विकी कौशल आणि कतरिनाने अचानक लग्न करून सर्व चाहत्यांना धक्का दिला होता. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता कतरिना विकीच्या कुटुंबाचाच एक भाग झाली आहे. कतरिनाला सासरी अॅडजस्ट करण्यास जास्त वेळ लागला नाही. कारण ती फार कमी वेळातच सर्वांसोबत मिसळून गेली. विकीच्या घरचेदेखील कतरिनावर खूपच खूश आहेत. एका मुलाखतीत विकीचा भाऊ सनी कौशलने त्याच्या वहिनीचं कौतुकही केलं आहे.

सनी कौशलने केलं वहिनीचं कौतुक

सनी कौशलही लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सनी त्याच्या आगामी चित्रपट हुडदंगमधून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.ज्यामध्ये त्याच्यासोबत नुसरत भरूच्या मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात सनी एका कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या भूमिकेत असेल. या चित्रपटासाठी झालेल्या एका मुलाखतीत सनीला त्याची वहिनी कतरिनाबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. ज्यामध्ये सनीने कतरिनाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. त्याच्या मते, ” कतरिना सासरी येता भरपूर सकारात्मक ऊर्जा घेऊन आली आहे. ती एक चांगली व्यक्ती आहे. घरात ती तिच्या कामाविषयी मुळीच बोलत नाही. तिला ती एक मोठी अभिनेत्री असल्याचा गर्व नाही. एवढं यश मिळवूनही तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. तिच्या येण्याने आमच्या घरात आनंदी आनंद निर्माण झाला आहे.”

सनीला आवडला कतरिनाच्या हातचा शिरा

विकी आणि कैतरिनाच्या नात्याबद्दलही सनीने अनेक गोष्टी मुलाखतीत सांगितल्या आहेत. ते लग्नाआधी डेट करत होते ही गोष्ट त्याच्या मते अफवा आहे. पण लग्नानंतर कतरिनाचं वागणं कौशल कुंटुबाला सुखावणारं आहे असं त्याने व्यक्त केलं. शिवाय त्याने कतरिनाच्या हातचा शिरा त्याला आवडत्याचं ही आवर्जून सांगितलं. लग्नानंतर पहिल्यांदा सासरी कतरिनाने शिरा केला होता. ज्याची मीडियामध्ये खूप चर्चा झाली होती. त्यावेळी सनी घरी नव्हता मात्र त्याच्या आईने त्याच्यासाठी वहिनीने केलेला शिरा राखून ठेवला होता. घरी आल्यावर सनीने तो शिरा खाल्ला आणि त्याला तो खूप आवडला होता. 

विकी आणि कतरिनाची जोडी

विकी आणि कतरिनाने मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये लग्न केलं होतं. जास्त गाजावाजा न करता त्यांनी राजस्थानमधील पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केलं. आता कतरिना त्याच्या कुटुंबात समरस झाली आहे. कतरिना लवकरच टायगर 3, फोन भूत, जी ले जरा आणि मेरी ख्रिसमस या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तर विकी लवकरचट गोविंदा मेरा नाम, दी ग्रेट इंडियन फॅमिली या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सध्या दोघंही त्यांच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

31 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT