सध्या महाराष्ट्रात क्रेझ आहे ती ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ची. आता हा रिएलिटी शो अंतिम टप्प्यात आला असून विजेता कोण होणार?, याची उत्सुकता आहे.
‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ चा प्रवास
कोणत्याही रिऍलिटी शोचा पहिला दिवस आणि अंतिम फेरी हा प्रवास स्पर्धक असो प्रेक्षक असो वा जजेस असो सगळ्यांसाठीच अविस्मरणीय असतो. पहिल्या दिवशी शो कसा असेल याची उत्सुकता असते तर अंतिम फेरीमध्ये कोण जिंकणार याविषयी कुतुहल असतं. आत्तापर्यंत स्पर्धकांचे एकसे एक परफॉर्मन्स, त्यांच्यातली चुरस प्रेक्षकांना पाहिली. ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या मंचावर गेले कित्येक महिने प्रत्येक स्पर्धक एका पेक्षा एक सुपर परफॉर्मन्स देत आहेत आणि त्यांच्यातील युनिक टॅलेंट सर्वांनीच पाहिलं. आता या स्पर्धेत ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’चे टायटल कोण जिंकणार याकडेच सर्वांचे लक्ष आहे.
31 डिसेंबरला ग्रँड फिनाले
या रिएलिटी शो चा ग्रँड फिनाले 31 डिसेंबरला होणार असून त्यात पाहायला मिळणार आहेत दमदार आणि जबरदस्त परफॉर्मन्स.
या अंतिम सोहळ्यात स्पर्धकांच्या परफॉर्मन्सला दाद देण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सुपर परफॉर्मन्सचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी सामील होणार आहे. तसंच या शोमुळे बच्चेकंपनीची लाडकी झालेली अम्मू दीदी म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकरचाही खास परफॉर्मन्स या निमित्ताने पाहता येईल
31 डिसेंबरला हा अंतिम सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मग महाराष्ट्राच्या प्रेक्षकांचं मन जिंकून कोण ठरतं ‘सुपर डान्सर महाराष्ट्रा’चा.