ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
मोरिंगा (Moringa)

सुपरफूड मोरिंगाचे सौंदर्यवर्धक फायदे करतील आश्चर्यचकित

 हल्ली आपण बरेचदा आपण सुपरफुड असे ऐकले आहे. शरीराची कमतरता भरुन काढण्यासाठी हे सुपरफूड मदत करतात हे आता सगळ्यांना माहीत झाले आहे. जे लोक डाएट करतात त्यांना सध्या सुपरफुड म्हणजे काय? ते नक्कीच माहीत असेल. सुपरफुड्सच्या या यादीमध्ये मोरिंगाचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. मोरिंगा म्हणजे काय? आणि त्याचे सौंदर्यासाठी नेमके काय फायदे आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला करुया सुरुवात 

मोरिंगा म्हणजे काय? (What is Moringa)

Moringa

मोरिंगाला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावे आहेत. याची पाने ही फारच औषधी असतात. गोलाकार असलेली पाने कुटून किंवा वाळवून त्याची पावडर केली जाते. मोरिंगा म्हणजे अन्य काही नाही तर शेवग्याच्या शेंगाची पाने (Drumstick )आहेत. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसला असेल ना? पण शेवग्याचा पाला यालाच मोरिंगा असे म्हणतात झाडाची पाने, फुले, फळे, बिया सर्वकाही चांगल्या गुणधर्मांनी युक्त असे आहे. त्यामुळे त्याचा वापर  वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. एका लिंबाच्या तुलनेत सातपटीने जास्त असे विटामीन सी मोरिंगामध्ये असते. त्यामुळे त्याचे त्वचेवर अनेक फायदे होण्यास मदत मिळते.  याशिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणात एँटी ऑक्सिडंट आणि इतर घटक असतात जे त्वचेसाठी फायदेशीर ठरणारे असतात. 

मोरिंगाचा उपयोग अनेक उत्पादनांमध्ये केला जातो. हल्ली अनेक उत्पादनांमध्ये तुम्हाला त्याचा वापर केलेला दिसेल. या शिवाय आर्युवेदिक दुकानात मोरिंगाची पावडर देखील मिळते ती सुद्धा तुम्ही वापरु शकता. 

असा करा मोरिंगाचा वापर आणि मिळवा फायदे

तुम्ही मोरिंगाची पावडर, मोरिंगाचे तेल आणले असेल तर तिचा उपयोग कसा करायचा ते जाणून घेऊया. 

ADVERTISEMENT

सुकलेल्या ओठांसाठी : हल्ली थंडीतच नाही तर खूप जणांचे अपुऱ्या हायड्रेशनमुळे ओठ सुकतात. तुमचे ओठही सतत ड्राय होत असतील तर तुम्ही मोरिंगाचे तेल लावू शकता. त्यामुळे तुमचे ओठ कोमल होतात. त्यावरील डेट स्किन निघून जाण्यास मदत मिळते. 

कोलॅजन वाढवण्यास करते मदत : त्वचेसाठी कोलॅजन हे फारच जास्त महत्वाचे असते. तुमच्या त्वचेखाली असलेले कोलॅजन वाढवायचे असेल तर मोरिंगा मदत करते. त्वचेवर त्याचा पॅक लावल्यामुळे त्वचेवर असलेली छिद्र कमी होण्यास मदत मिळते आणि त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते. 

पिंपल्सचे डाग करते कमी: पिंपल्स आल्यानंतर ते आपले डाग त्वचेवर ठेवून जातात. हे असे डाग नकोसे होतात. अशा डागांवर मोरिंगा हे उत्तम आयुर्वेदिक उपाय आहे. मोरिगांची पावडर घेऊन त्याचा पॅक बनवून तुम्ही त्या डागांवर लावले तर तुमची त्वचा चांगली होण्यास मदत मिळते. डाग कमी होण्यास मदत मिळते. 

त्वचेच्या समस्या करते कमी: त्वचेसंदर्भात पिंपल्स अशी एक समस्या नाही. त्या व्यतिरिक्तही अनेक समस्या असतात. अशा सगळ्या त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी मोरिंगा मदत करते. मोरिंगाची पेस्ट करुन ती त्वचेवर लावा. असे केल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. रक्तशुद्धीकरणाचे काम मोरिंगा करते. त्यामुळे तुम्ही त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी याचा वापर करायला हवा. 

ADVERTISEMENT

आता त्वचेसाठी एकदा तरी सुपरफूड म्हणून प्रसिद्ध असलेले मोरिंगा नक्की वापरा

05 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT