Advertisement

बिग बॉस

Bigg Boss 15: अनुषा दांडेकरचे चाहत्यांसाठी खुले पत्र, बिग बॉसच्या चर्चांना पूर्णविराम

Dipali NaphadeDipali Naphade  |  Oct 21, 2021
bigg boss 15 anusha dandekar

Advertisement

बिग बॉस (Bigg Boss 15) हा रियालिटी शो यावेळी अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. त्यातही विशेष चर्चा आहे ती म्हणजे करण कुंद्राची (Karan Kundrra). बाहेरदेखील करण कुंद्रा आपले सहा वर्षांचे नाते तुटल्यामुळे चर्चेत होता. मॉडेल अनुषा दांडेकर (Anusha Dandekar) याने करणने नात्यात आपल्याला धोका दिला आहे असा आरोप लावला होता. मात्र यानंतर यावर काहीही न बोलणेच करणने पसंत केले होते. तर काही दिवसांपासून वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून (Bigg Boss Wild Card Entry) अनुषा घरात येणार आहे अशा चर्चांनाही उधाण आले होते. यामुळे करणच्या अडचणीत वाढ होईल अशीही चर्चा रंगली होती. मात्र आता स्वतः अनुषाने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला असून तिने आपल्या चाहत्यांसाठी खुले पत्र लिहिले आहे. या शो साठी अनुषाला भरघोस पैसे दिले जाणार असून ती सहभागी होणार आहे असं म्हटलं जात होतं. अनुषा आणि करणचं ब्रेकअप झाल्यानंतर आता ती या शो मध्येदेखील येणार असं सांगण्यात येत असून अनुषा मात्र या वृत्तावर भडकली आहे.

अधिक वाचा – Bigg Boss 15: अनुषाच्या येण्याने करणला बसणार झटका की राकेशच्या येण्याने शमिता होणार आनंदी

कृपा करून हा मूर्खपणा थांबवा – अनुषा

बिग बॉसचा सीझन सुरू होण्यापूर्वीदेखील अनुषाला विचारणा झाली होती. त्यावेळीदेखील अनुषाने आपली नाराजी व्यक्त करत आपण या शो मध्ये सहभागी होत नसल्याचे स्पष्ट केले होते. आता पुन्हा एकदा अनुषाने आपलं मत व्यक्त केलं आहे. अनुषाने या संदर्भात एक पोस्ट शेअर केली असून आपले मत सांगितलं आहे. ‘हे माझं आयुष्य असून मी सध्या जिथे आहे तिथे अत्यंत आनंदी आहे. जर मला कुणी आनंदी ठेऊ शकत नाही हे मला कळलं आहे तर त्याठिकाणी मी थांबत नाही. सर्व विसरण्यासाठी मला वेळ लागतो आणि मी आता हळूहळू हे शिकतेय. जर एखादी व्यक्ती दिसते तशी नाही हे लक्षात आलं तर माझा प्रवास त्या व्यक्तीला सोडून मी चालू ठेवते’ आपल्या भावना व्यक्त करत अनुषाने अशी पोस्ट शेअर केली आहे. ‘मी माझ्या आयुष्याची बॉस आहे आणि हा मूर्खपणा बंद करा. मला माझ्या भूतकाळात अजिबात रमायला आवडत नाही. मी स्वतःच्या कर्तृत्वावर मोठी झाले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीबद्दल काहीही लिहिणे बंद करा. ही नाटकं करू नका. कोणत्याही गोष्टी सिद्ध करण्यासाठी मला बिग बॉसची गरज नाही. त्यामुळे जरा शांत राहा. ज्या व्यक्तींनी मला जगू दिलं आणि आयुष्यात आनंद दिला त्या सर्वांचे मनापासून आभार’ असेही अनुषाने खडसावून सांगितले आहे. 

अधिक वाचा – सुयश टिळकच्या घरी सुरु झाली लगीनघाई, पाहा फोटोज

सध्या सुपरमॉडेल रियालिटी शो मध्ये व्यग्र

अनुषा ही स्वतः सुपरमॉडेल होती आणि आता सध्या ती रियालिटी शो सुपरमॉडेलची जज आहे. यामध्ये तिच्यासह मिलिंद सोमण (Milind Soman) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) सह परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. अनुषा नेहमीच आपल्या प्रेमाबाबत आणि ब्रेकअपबाबत व्यक्त होत आली आहे. मात्र करणने कधीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. करणने सध्या बिग बॉसमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. इतकंच नाही तर सध्या #TejRan असा हॅशटॅग ट्रेंड होत असून करण आणि तेजस्वीचे नाव जोडले जात आहे. तर घरातील सर्व महिलांना करण अत्यंत चांगल्या पद्धतीने जपत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे करणच्या चाहत्यांमध्येही वाढ होत आहे. 

अधिक वाचा – रणवीर सिंहचा ‘सर्कस’ पुढच्या दिवाळीला होणार प्रदर्शित

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक