2020 हे वर्षही सुंदर आणि मधुर रोमँटिक गाण्यांनी भरलेलं वर्ष असेल. कारण दरवर्षी आपल्या म्युझिक इंडस्ट्रीत अनेक रोमँटिक गाणी रिलीज होतात. जी संगीत प्रेमींसाठी सांगितिक मेजवानी ठरतात आणि याच वर्षात सूर्यवीरने आपलं नवीन रोमँटिक गीत “तुम जो मिले” लाँच केलं आहे. या गाण्यामधील सूर्यवीरचा मधुर आवाज आणि त्या मागची सुंदर कथा तुम्हाला नक्कीच मोहित करणारी आहे. तुम्हीही ऐकलं का हे नवीन रोमँटिक गाणं “तुम जो मिले”.
तुम जो मिले
छानश्या रेस्टॉरंटमध्ये बसलेली ती आणि तिच्यासाठी गिटार वाजवणारा तो अगदी लव्ह एट फर्स्ट साईट. पण मधेच व्यत्यय येतो तो त्याच्या मित्रामुळे. त्याचा मित्र गप्पा मारू लागतो आणि तेवढ्यात ती निघून जाते. मग त्यांची भेट होते का, पुढे काय होतं ते. ते गाण्यात तुम्हाला पाहायला मिळेल. गोव्याच्या सिनिक लोकेशनवर हे गाणं शूट करण्यात आलं आहे. ज्याचा व्हिडिओही सुंदर आहे.
आपल्या म्युझिक व्हिडिओबद्दल सांगताना सूर्यवीर म्हणाला की, “मी हे गाणं 5 वर्षांपूर्वी लिहीलं होतं आणि आता मी ते सादर करत आहे. हे गाणं डेटिंग एप “हॅपन” बरोबर मिळून सादर करत आहे. कारण या एप आणि माझ्यामते आपल्या आयुष्यात जी व्यक्ती येते त्यामागे काही ना काही कारण असतंच आणि त्यांची भेट होणं हे विधीलिखित असतं. “तुम जो मिले” हे गाणंही आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अशाच खास लोकांबद्दल आहे.
सूर्यवीरने आधीही आपल्या चाहत्यांसाठी काही चांगली गाणी सादर केली आहेत. ज्यामध्ये त्यांना मिलिअन्स व्ह्यूज आहेत. शिबानी कश्यपबरोबर त्यांचं “अंखियान उडीक दिया आणि वे में चोरी चोरी” या गाण्यांसाठी सूर्यवीर खूप चर्चेत आला होता आणि प्रेक्षकांकडून सुद्धा त्याला खूप प्रेम मिळाले होते. “तुम जो मिले” या गाण्यात देविका सिंग सूर्यवीरसोबत रोमान्स करताना दिसत आहे आणि त्यांची केमेस्ट्री खूप सुंदर दिसत आहे.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.