एका चांगल्या कलाकाराचे अचानक जाणे सगळ्यांना किती त्रास देऊन जाते याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांत सारखा मुलगा कधी आत्महत्या करेल असा विश्वासही कोणाला बसणार नाही. पण घरात गळफास लावत त्याने आपले जीवन संपवले. त्याच्या जाण्याने अनेकांना धक्का बसला. त्याच्या निधनानंतर त्याचे अनेक जुने फोटो समोर येत आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने वायरल होत आहे. हा फोटो त्याच्या भाचीसोबतचा असून सुशांतचा फोटोमधील निरागस चेहरा अनेकांना भावुक करुन गेला आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने हा निर्णय घ्यायला नको होता असे अनेकांना त्यामुळे नक्कीच वाटले असेल.
होम डिलिव्हरी झालेल्या भाज्या पाहून अभिनेत्री जुही चावला संभ्रमात
हा फोटो पाहून सुशांत आता हवा होता असेच वाटेल
सुशांतची अमेरिकेत राहणारी बहीण श्वेता सिंह किर्तीने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे.या फोटोमध्ये सुशांत तिच्या भाचीला जवळ घेऊन बसला आहे. त्यांचा हा गोड फोटो आणि दोघांच्या चेहऱ्यावरील निरागस भाव पाहता तिच्या बहिणीनेही या फोटोसाठी भावुक अशी कॅप्शन लिहिली आहे. हा फोटो पाहून सुशांत आज सुशांत येथे हवा होता असे वाटत आहे. सुशांतच्या या फोटोवर अनेकांनी भावुक कमेंटही केल्या आहेत.
सुशांतच्या आत्महत्येचे गूढ कायम
सुशांत सिंहने आत्महत्या केली हे आधी अनेकांना पटतच नव्हते. त्याच्या मृत शरीराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या फोटोला पाहून ही आत्महत्या असू शकत नाही असा दावा केला. सुशांतचा खून झाला असावा असे अनेकांचे म्हणणे होते. सुशांतच्या मृतदेहाशेजारी किंवा कोणत्याही खोलीत त्याने आत्महत्या का केली याचा खुलासा करणारी कोणतीही सुसाईट नोट पोलिसांना सापडली नाही. त्यामुळे अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.
#WomenisPower – निर्माता विकास गुप्ताने केली पहिली #pride पोस्ट
सुशांत घेत होता मानसिक उपचार
सुशांतच्या मृत्यूसंदर्भात अनेक गूढ निर्माण झाले असले तरी देखील काही कारणामुळे सुशांत हा तणावाखाली असल्याचेदेखील समोर आले आहे. गेल्या 6 महिन्यांपासून त्याचे उपचार सुरु होते. त्याला अनेक खाजगी कारणांमुळे तणाव होता. त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असावे असे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे त्याचा पोस्टमार्टम रिपोर्टही आत्महत्येकडेच इशारा देत आहे. त्यामुळे अनेक शंकांचे निरसन काही बाबतीत अजूनही झालेले नाही. शिवाय त्याने आत्महत्येपूर्वी त्याच्या इन्स्टाग्रामवरुन अनेक फोटोही डिलीट करुन टाकले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज येत आहे. त्याच्या आत्महत्येनंतर अनेकांची चौकशी करण्यात आली पण त्यातून फार काही माहिती मिळाली असेही वाटत नाही.
अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा वादात, अभिनवने केले गंभीर आरोप
पुन्हा एकदा नेपोटिझम वाद
‘नेपोटिझम’ हा शब्द आता काही नवा राहिला नाही. चित्रपटसृष्टीत स्टार किडलाच नेहमी चित्रपटांच्या ऑफर्स दिल्या जातात. सर्वसामान्यांना चित्रपट मिळवण्यासाठी धडपड करावी लागते. शिवाय आऊटसाईडर अशी वागणूक गॉडफादर नसलेल्या कलाकारांना दिली जाते. सुशांतच्या बाबतीतही असे झाले असा दावा अनेकांनी केला आहे. कंगना रणौतने देखील पुन्हा एकदा हा वादाचा विषय उकरुन काढत करण जोहर, सलमान खान यांना खडेबोल सुनावले आहे. अनेकांचे करीअर यांनी बरबाद केले असा आरोपही केला आहे. तिच्यानंतर अनेकांनी त्यांच्या अनुभवाचे आणि बॉलीवूडच्या अशा दुजेभाव वृत्तीचे कथन त्यांच्या सोशल मीडियातून केले आहे.
आता राहिला प्रश्न सुशांतचा तर त्याचे जाणे आजही अनेकांना चटका लावून गेले आहे आणि हा फोटो पाहून अनेकांना नक्कीच दु:ख झाले असेल.