सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने अनेकांना धक्का दिला आहे. त्याचे काही सिनेमे अजूनही फ्लोअरवर येणे बाकी आहे. त्यातील एक ‘दिल बेचारा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेकांच्या भावनांना बांध फुटला आहे. चित्रपटातून कायमच एक पॉझिटिव्ह विचार देणारा सुशांत असा आयुष्य कसं संपवू शकतो यावर अनेकांचा विश्वास बसेनासा झाला आहे. त्यामुळे ‘दिल बेचारा’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला रडू नाही आले तर नवलचं
आरजे प्रीतमवर आली उपासमारीची वेळ, शेअर केली भावना
जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसते.
ट्रेलरमध्ये सुशांतच्या तोंडी असलेले हे वाक्य आज खरेच झाले आहे. कोणाचाही जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हाती नसतो. तर ते आयुष्य कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हाती असतं. दिल बेचारा ही एक कॅन्सर रुग्णाच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी गोष्ट आहे. किझी बासू (संजना सांघी) इम्यानुअल राजपाल ज्युनिअर म्हणजेच मॅनी ( सुशांत सिंह राजपूत) एका कॉलेजमध्ये शिकत असता. किझीला कॅन्सर झाला असतो अचानक त्याची भेट जीवन अगदी दिलखुलास जगणाऱ्या राजपालसोबत होते आणि त्यांच्यामध्ये जवळीक वाढते. कॅन्सरमुळे किझीचा मृत्यू अटळ असला तरी तिला सर्वतोपरी आनंद देण्याचा प्रयत्न यामध्ये मॅनी करतो. त्याचा तो खोडकर हसरा चेहरा आणि किझीसाठीची तळमळ या ट्रेलरमध्ये दिसून आली आहे. त्याच्याच तोंडी असलेलं एक वाक्य आज मनाला पुन्हा लागून गेलं ते म्हणजे जन्म कोणाच्याही हातात नाही आणि मृत्यूही.. पण आयुष्य कसे जगायचे हे आपल्या हातात असते.
या आहेत बॉलीवूडमधील स्टायलिश बहिणी, संपूर्ण जग करतं स्टाईल फॉलो
कादंबरीवर आधारीत चित्रपट
सुशांत सिंह राजपूतचा हा चित्रपट एका कादंबरीवर आधारीत आहे. जॉन ग्रीन यांच्या ‘ द फॉल्ट इन अवर स्टार’ या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट असून ही एक प्रेमकहाणी आहे. अशी प्रेमकहाणी जी कदाचित कधीच पूर्ण होणार नाही. पण तरीही या प्रेमकहाणीमध्ये एक मजा आहे. कदाचित हा चित्रपट सुशांत हयात असताना रिलीज झाला असता तर अनेकांना आनंद झाला असता पण आता सुशांतच्या अनुपस्थितीत त्याचा हा चित्रपट रिलीज करावा लागत आहे.
हॉटस्टारवर होणार चित्रपट रिलीज
देशातील सध्याची स्थिती पाहता अनेक चित्रपट निर्मात्यांनी नुकसान होण्यापेक्षा त्यांचा चित्रपट सोशल प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अनेक मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. 6 जुलैला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरची अनेक जण प्रतिक्षा करत होते. अवघ्या काहीच तासात कित्येक कोटी लोकांनी हा ट्रेलर पाहिला अनेकांनी हा ट्रेलर फारच भावुक करणारा असल्याचे म्हटले आहे. आता हा चित्रपट हॉटस्टारवर रिलीज होण्याची प्रतिक्षा आहे.
तुम्ही अद्याप सुशांतच्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला नसेल तर तुम्ही हा ट्रेलर नक्कीच पाहायला हवा.
जिया चौहानने देवी पार्वतीची भूमिका साकारण्यासाठी केले स्वतःमध्ये बदल