अभिनेत्री अंकिता लोखंडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अगदी कोणत्याही अभिनेत्रीशी सुशांतसिंह राजपुतचे नाव जोडले गेले नाही. पण आता मात्र त्याच्या चाहत्यांंना शंका येण्याची शक्यता आहे. कारण सुशांतसिंह राजपूत सध्या एका अभिनेत्रीसोबत आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. ही अभिनेत्री रेहा चक्रवर्ती असून लडाखमधील काही फोटो त्यांनी त्यांच्या इन्स्टा अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. सध्या या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दूर्बिण भी और पास भी
अंकितानंतर सुशांतचे नाव कित्येक अभिनेत्रींसोबत जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण लोकांना फार काही हाताला लागले नाही.पण रेहासोबत अनेकवेळा तो बाहेर फिरताना दिसल्यामुळे अनेकांचा संशय बळावला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या सिक्रेट डेटिंगच्या चर्चा बी टाऊनमध्ये सुरु आहेत. सध्या सुशांतसिंह लडाखमध्ये असून त्याने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत तो तिथल्या एका लहान मुलासोबत दिसत आहे. त्याच मुलासोबत रेहाचा एका फोटो तिने तिच्या अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामुळे हे दोघे या ठिकाणी एकत्र असल्याची खातरजमा झाली आहे. शिवाय सुशांतने एक आणखी फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने दूर्बिण… और पास भी असे म्हटले आहे.
super Dancers 3 मध्ये रुपसाने मारली बाजी
दोघं रिलेशनशीपमध्ये
आता लडाख टूर एकत्र करत आहेत म्हटल्यावर ही दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याचे सध्या तरी वाटत आहे. पण सुशांतने यावर कोणताही खुलासा केलेला नाही. त्यामुळे ही दोघं just friends की, त्यापेक्षा काही जास्त आहेत यावर आताच काही बोलता येणार नाही. पण दोघं सध्या लडाखचं मस्त वातावरण एन्जॉय करत आहेत हे नक्की
आराध्या बच्चनचा हा डान्स तुम्ही पाहिलात का?
कोण आहे रेहा चक्रवर्ती
रेहा ही मॉडेल आणि अभिनेत्री असून तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मेरी डॅड की मारुती (2013),सोनाली केबल (2014),बँक चोर (2017), जलेबी (2018)यांसारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत. या शिवाय ती हाफ गर्लफ्रेंड (2017), दोबारा (2017) या चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे बी टाऊनमध्ये तिचे नाव आहे. ती आगामी ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. तिने काहीच दिवसांपूर्वी तिचा फोटो शेअर केला होता.
लवकरच मराठीमध्ये येणार ‘सत्यशोधक’ चित्रपट
रेहा साराची चांगली मैत्रीण
आता जर तुम्हाला माहीत असेल तर केदारनाथ येण्याआधी सुशांतसिंह राजपूत आणि सारा अली खान यांच्या लिंकअपच्या चर्चा होत्या. पण तसे काही झाले नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेहा ही साराची खूप चांगली मैत्रीण आहे. या दोघी एकत्रच जीमला जातात. आधीच त्यांच्या लिंकअपच्या चर्चांना उधाण आलेले असल्यामुळे रेहा आणि सुशांत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्यास तयार नसल्याचे म्हटले जात आहे.
अंकितानंतर खचला सुशांत
अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत ‘ पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र होते. तेथूनच त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा होत्या. सगळे काही चांगले सुरु असताना सुशांतने अचानक अंकिताला सोडलं. त्याचा त्रास अंकितालासुद्धा झाला. 6 वर्ष चाललेले त्यांचे नाते अचानक तुटले. त्यानंतर या दोघांनीही काही काळ स्वत:ला एकमेकांपासून लांब ठेवले. आता ही दोघं वेगवेगळ्या मार्गाला असून अंकिता एका बिझनेसमनशी लवकरच विवाहबद्ध होणार आहे.