बॉलीवूडमध्ये कोण कधी लग्न करतं आणि कोण कधी वेगळं होतं हे तर आता अगदीच नियमित झालं आहे. बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा भाऊ राजीव आणि त्याची पत्नी अभिनेत्री चारू असोपाने वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत. वास्तविक दोघांनीही आपल्या इन्स्टाग्रामवरून लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत. त्यानंतरच आता ते दोघेही वेगळे झाले असल्याचा कयास बांधला जात आहे. लग्नाच्या एका वर्षातच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे आता समोर येत आहे. मात्र या दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्या दोन महिन्यापासून राजीव दिल्लीत असून चारू मुंबईत आहे. राजीवला एका वृत्तपत्राने लग्नाचा फोटो का डिलीट केला विचारले असता त्याने आपण याविषयी बोलू शकत नाही. मात्र मी सध्या खूपच आनंदी असल्याचे मात्र आवर्जून सांगितलं आहे. तर यावर चारूने मात्र आपल्याला या विषयावर काहीही बोलायचे नसल्याचे सांगितलं आहे.
बॉलीवूडवर होत आहेत एकावर एक आघात, पसरली आहे शोककळा
सोशल मीडियावर चारूने केले दुःख व्यक्त
चारूने सोशल मीडियावर आपले दुःख मात्र व्यक्त केले आहे. चारूने काही स्पष्ट केले नसले तरीही ती सध्या ज्या कविता शेअर करत आहे त्यावरून तरी तिच्या आणि राजीवच्या नात्यात दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. बुधवारी रात्री तिने शेअर केलेल्या कवितेमध्ये तुटलेल्या मनाबद्दल सांगतिले आहे. इतकेच नाही तर अशा ओळी तिने शेअर केल्या आहेत ज्यामुळे तिच्या मनाला खूपच त्रास झाला असल्याचे दिसून येत आहे. तर गुरूवारीदेखील चारूने कवयित्री सीमा वालिया यांची कविता आपल्या फोटोसह शेअर केली आहे. या कवितेच्या अर्थानुसार आयुष्यात येणारे चढउतार आणि स्वतःला समजून घेणं किती आवश्यक आहे याविषयी भाष्य आहे. त्यामुळे चारूला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत आहे. तिला या नात्यात खूपच त्रास झाला असावा असे या दोन्ही पोस्टवरून सध्या तिचे चाहते अंदाज काढत आहेत. मात्र दोघांनीही अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
सुशांत सिंह राजपूतनंतर या टीव्ही कलाकाराच्या आत्महत्येने सुन्न झाले सेलिब्रिटी
दोन महिन्यांपासून वेगळे राहात आहेत
राजीव सेन आणि चारू असोपा गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळे राहात आहेत. चारू मुंबईत असून राजीव दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र काही आठवड्यांपूर्वी राजीवला वेगळे झाल्याचे विचारण्यात आले तेव्हा राजीवने असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले होते. तसंच आपण काही कामानिमित्त दिल्लीला आलो आहोत असंही त्याने स्पष्ट केले होते. मागच्या वर्षी 8 जूनला रोजीव आणि चारूने कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर गोव्यात 16 जूनला दोघांनी पारंपरिक पद्धतीने लग्न केले होते. त्याआधी एक वर्ष दोघांनी एकमेकांना जाणून घेतले होते. मात्र आता एक वर्षातच दोघांच्या नात्यात दुरावा आला असून वेगळे होत असल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. पण नक्की या दोघांमध्ये काय बिघडले आहे हे मात्र अजूनही समोर आलेले नाही. चारूने आतापर्यंत ‘कर्ण संगिनी’, ‘देवों के देव महादेव’, ‘टशन-ए-इश्क’, ‘जीजी म ां’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘ये रिश्ता क्या कहलात है’, ‘अगले जनम मोहे बिटीया ही किजो’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तर राजीव सेन हा मॉडल आणि उद्योगपती आहे.
लॉकडाऊननंतर ‘सारेगमपा लिटल चॅम्प्स’च्या परिक्षकांमध्ये होणार बदल