रोहमन शॉ सोबतच्या ब्रेकअपनंतर सुश्मिता सेन (Sushmita Sen) काही काळासाठी सिंगल होती. पण तिच्या आयुष्यात प्रेम पुन्हा परतले आहे. तिच्या आयुष्यातील ही व्यक्ती कोण असेल? याची उत्सुकता अनेकांना असेल. पण ललित मोदींच्या या पोस्टनंतर तिच्या रिलेशनशीप स्टेटसवरुन पडदा उठला आहे. माजी आयपीएल कमिशनर आणि अभिनेत्री सुश्मिता सेन हे एकमेकांना डेट करत असल्याची एक पोस्ट ललित मोदी (Lalit Modi) यांनी केली आणि ही पोस्ट संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाली. अनेकांना धक्का बसला तर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण असेही काही जण आहेत. ज्यांना हे नातं फारसं काही रुचलेलं दिसत नाही. त्यामुळेच त्यांना ट्रोल देखील करण्यात आले. पण अखेर कंटाळलेल्या ललित मोदी यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आनंद शोधायला शिका
ललित मोदी यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर सुश्मितासोबत असलेले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्यांची पूर्वपत्नी मीनल मोदी यांचा फोटो देखील आहे. त्यामुळे चुकीच्या अकाऊंटला टॅग करुन लोकांचा संभ्रम वाढवला असे अनेकांना वाटले. पण त्यावर खुलासा करताना ललित मोदी यांनी मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी यात म्हटले आहे की, मी कोणालाही चुकून टॅग केलेले नाही. मी योग्य त्याच व्यक्तीला टॅग केले आहे. यामध्ये असलेली माझी पत्नी लग्नाआधीही मैत्रीण होती. आता आम्ही वेगळे झालो तरी देखील आमच्यातील ती मैत्री टिकून आहे. पण मीडियावर या संदर्भात फिरणाऱ्या बातम्या आणि अफवा या सगळ्या खोट्या आहेत. यात काहीही तथ्य नाही. खरंतरं दुसऱ्याच्या आनंदात आनंद शोधा. या शिवाय ललित मोदी यांच्या संदर्भातील घोटाळ्याच्या बातम्या आणि BCCI दरम्यान झालेल्या सगळ्या गोष्टी मीडिया अत्यंत चुकीने सादर करत आहेत. असे सांगत त्यांनी मीडियावर शरसंधान साधले आहे.
अनेक महिन्यांपासून एकत्र
सुश्मिता सेन सिनेसृष्टीशी थोडी दुरावलीच आहे. तिने मध्यंतरीच्या काळात सीरिज केली. पण त्यानंतर ती फार काही दिसते असे नाही. पण तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉ हा तिच्याहून वयाने बराच लहान होता. इतकेच नाही तर त्यांच्या नात्यात अनेकदा दुरावा आला होता. तरीदेखील ते नाते बरेच वर्ष टिकले होते. सुश्मिता आणि त्याच्या वयातील अंतर पाहता अनेकांनी तिला ट्रोल देखील केले होते. मध्यंतरी त्यांच्या नात्यात आलेला दुरावा हा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुनही दिसला होता. पण पुन्हा ते दोघे अचानक एकत्र आल्यामुळे सगळे काही आलबेल असेल असे दिसत होते. पण अखेर ही दोघे वेगळी झाली. त्यानंतर सुश्मिताबाबत कोणतीही नवी माहिती समोर आली नव्हती. पण आता ललित मोदी यांच्यासोबत असल्याची बातमी समोर आल्यावर अनेकांना धक्का बसणे साहजिक आहे.
सुश्मितानेही दिले उत्तर
ललित मोदी यांनीच नाही तर सुश्मिता सेन हिला देखील मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत होते. तिला देखील गोल्ड डिगर असे म्हणून सतत बोलले जात आहे. पण तिने यावर चुप्पी तोडत उत्तर दिले आहे. तिने म्हटले की, मला सोन्याची आवड नाही. मी हिऱ्याची पारख करणारी आहे. अशांना बुद्धीजीवी म्हणतात. गोल्ड डिगर नाही. यामध्ये तुमची मानसिकता दिसते. अशी मानसिकता असणाऱ्यांव्यतिरिक्त अनेक शुभचिंतकांचे आशीर्वाद आहेत.
सध्या तरी काही दिवस सुश्मिताच्या नव्या लव्ह लाईफकडे अनेकांचे लक्ष असणार आहे यात काहीही शंका नाही.