सुश्मिता सेन आणि रोहमन शॉल हे सध्याचं एक लोकप्रिय आणि हॉट कपल आहे. दोघं नेहमी एकमेकांवरील प्रेम अशा पद्धतीने व्यक्त करतात की त्यामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. नुकतंच रोहमनने त्याच्या हातावर सुश्मिताच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे. या टॅटूचा फोटो त्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे आणि त्याला कॅप्शन दिली आहे की, “शाई कायम राहणार नाही पण प्रेम कायम असेल” या इन्स्टा स्टोरीवर त्याने सुश्मिताला टॅग केलं होतं आणि हार्ट इमोजी शेअर केली होती. सुश्मितानेही रोहमनचं प्रेम स्वीकारत त्याला रोमॅंन्स अशी रोमॅंटिक कंमेट दिली आहे.
सुश्मिता आणि रोहमन जवळजवळ दोन वर्षांपासून एकत्र आहेत. ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असून एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले आहेत. सुश्मिताची आतापर्यंत अनेक लव्ह रिलेशनशिप झालेल्या आहेत. मात्र ती रोहमनच्या बाबत जास्तच सिरिअस आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांनी त्यांची लव्ह अॅनिर्व्हसरी सेलिब्रेट केली होती. तेव्हा सुश्मिताने शेअर केलं होतं की, “जेव्हा सुशची भेट रोहशी झाली तेव्हा तिच्या जीवनात रोमॅन्स आला. हॅप्पी अॅनिव्हर्सरी जान रोहमन. आम्ही आमच्या नात्याची दोन वर्षे पूर्ण केली आहेत आणि पुढची मोजणी सुरू आहे. बेबी आय लव्ह यु” रोहमनने त्याच्या हातावर इनफिनिटी सिम्बॉंल काढला असून त्यामध्ये त्याने Sush असं लिहीलं आहे. इनफिनिटीचा अर्थ अनंत असा होतो. ज्यातून त्याने सुश्मितावरील त्याचं प्रेम दिसून येत आहे.
कसे भेटले सुश आणि रोहमन
तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की सुश्मिता आणि रोहमन हे कोणत्याही पार्टीत अथवा सेटवर भेटलेले नसून ते एकमेकांना पहिल्यांदा सोशल मीडियावर भेटले होते. रोहमन हा सुश्मिताचा एक सामान्य फॅन होता आणि तो तिला सतत तिच्या इन्स्टाग्रामवर मेसेज करत असे. एकदा चुकून रोहमनचा मेसेज सुश्मिताकडून क्लिक झाला आणि पुढे त्यांचे चॅटिंग सुरू झाले. त्यानंतर ते दोघं एका फॅशन इव्हेंटमध्ये प्रत्यक्ष भेटले. रोहमन हा सुश्मितापेक्षा जवळजवळ सोळा वर्षांनी लहान आहे. मुळचा काश्मिरी असलेला रोहमन मॉडेल आहे. वयाने लहान असूनही रोहमन आणि सुश्मिताच्या नात्यात कोणताही फरक पडलेला नाही. उलट त्यांनी त्यांच्या नात्याचा हा प्रवास गेली दोन वर्ष यशस्वीपणे केलेला आहे. ज्यातून त्यांचा हा रिलेशनशिपचा बॉंड दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. दोघांची केमिस्ट्रि खूप छान वाटत असून रोहमनने आता सुश्मिताच्या नावाचा टॅटू काढून या नात्यावर जणू शिक्कामोर्तबच केलं आहे. लवकरच या दोघांच्या लग्नाची बातमीदेखील समोर येण्याची शक्यता आहे.
सुश्मिता झळकणार आर्याच्या दुसऱ्या सीझममध्येही
सुश्मिता सध्या मोस्ट अवेडेट वेब सिरीज आर्यामधून प्रेक्षकांसमोर आली होती. या क्राईम वेब सिरिजद्वारे तिने डिजिटल डेब्यू केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुश्मिता या वेबसिरिजच्या दुसऱ्या सीझनमध्येही झळकणार आहे. सुश्मितानेही ही बातमी तिच्या इन्स्टा अकाऊंटद्वारे मान्य केली आहे. त्यामुळे ती लवकरच पुन्हा तिच्या सौंदर्य आणि अभिनयाची कमाल दाखवायला सज्ज झाली आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात
रूबिना दिलैकचा अभिनवसह नात्याबद्दल धक्कादायक खुलासा, घटस्फोट घेण्याचा केला होता विचार
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन