ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अशा लोकांना फाशीची शिक्षा द्या, #boyslockerroom वर चिडली स्वरा भास्कर

अशा लोकांना फाशीची शिक्षा द्या, #boyslockerroom वर चिडली स्वरा भास्कर

आपल्या प्रक्षोभक वक्तव्यावरुन स्वरा भास्कर नेहमीच चर्चेत असते. पण आता एका वेगळ्यात गोष्टीवरुन ती भलतीच चिडली आहे असे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर #boyslockroom ची चर्चा आहे. या अकाऊंटवरुन महिलांसंदर्भात. अल्पवयीन मुलींसंदर्भात अत्यंत वाईट गोष्टी बोलल्या जात आहे. त्यांच्या सेक्शुअॅलिटीवर बोलले आहे. आता साहजिकच या चर्चेमध्ये स्वरा भास्कर बोलणार नाही असे होणार नाही. तिने या अकाऊंटवरुन मुलींबद्दल बोलणाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. इतकेच नाही तर तिने चक्क अशा लोकांना फाशी द्या असेही म्हटले आहे.

मजुरांसाठी रितेश झाला भावनिक, मन हेलावणारा फोटो केला शेअर

काय आहे हे सगळे प्रकरण?

स्वरा भास्कर

Instagram

ADVERTISEMENT

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे की येथे दरदिवशी काहीतरी घडत असते. इन्स्टाग्रामवर  boyslockerroom नावाने एक चॅट सुरु करण्यात आले या चॅटमध्ये महिलांबद्दल अत्यंत वाईट शब्द वापरण्यात आले आहे. अल्पवयीन मुलींच्या शरीराबद्दल अत्यंत वाईट शब्दात चॅट सुरु होते. त्यामुळे अनेक चिडलेल्या मुलींनी आणि मुलांनी याबद्दल बोलायला सुरुवात केली.  या चॅटमध्ये इतक्या अश्लील गोष्टी बोलल्या जात होत्या आणि फोटो शेअर केले जात होते की, सगळी मुलं लहान असल्याचेही लक्षात येत होते. देशात अशी परिस्थिती असताना मुलांचे इतके वाईट विचार ऐकून स्वरा भास्करला अजिबात आवरता आले नाही. तिने ट्विटरवर लगेचच या बद्दल लोकांना माहिती देत अशा लोकांवर कोणतीही दया न दाखवता त्यांना थेट त्यांना फाशी द्या असे म्हटले आणि मग बघता बघता या सगळ्या कॅम्पेनमध्ये एक एक करुन सेलिब्रिटी सामील झाले.  रिचा चड्डाने मुलांना योग्य शिकवणुकीची गरज आहे.  हे चुकीच्या मार्गावरील जाणे अनेक जणांसाठी त्रासदायक आहे. मोफत इंटरनेटची सुविधा पुरवण्याच्या नादात असा नको त्या गोष्टीला खतपाणी घातले जात आहे, असे देखील ती म्हणाली आहे. 

#MatKarForward – खोट्या मेसेजपासून सावध राहण्यासाठी सेलेब सरसावले

अशा लोकांना व्हावी कडक शिक्षा

या सगळ्या प्रकरणाबाबत मुलीच बोलत नाहीत. तर अनेक अभिनेत्यांनीही असे करणाऱ्यांची चांगली कानउघडणी केली आहे. त्यांनी अशा प्रकारे सेक्शुअली बोलून मुलांना बिघडवणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

पोलिसांनी केली कारवाई

घडलेल्या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली पोलिसांनी याचा तपास तातडीने करायला सुरुवात केली. तपासाअंती ही मुलं कोण आहे आणि हे चॅट कुठून सुरु आहे याचा सोर्स पोलिसांनी शोधून काढला असून त्यांनी हा ग्रुप आणि हे चॅट सोशल मीडियावरुन हटवून टाकले आहे. या संदर्भात तब्बल 21 जणांना यासाठी अटक करण्यात आली आहे. अटक कऱण्यात आलेले सगळे हे अल्पवयीन असल्याची माहिती ANI कडून देण्यात आली आहे.  त्यामुळे सध्या तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी काही गोष्टींची काळजी पालकांना या दिवसात घेण्याची गरज आहे. 

ADVERTISEMENT

सध्या लॉकडाऊनमुळे घरी असलेली शालेय मुल मोबाईलवर काय करतात याकडे पालकांनी अधिक लक्ष द्यायला हवे. सध्याच्या घडीला स्वरा भास्करचा राग हा अगदी योग्य आहे.

शाहीद कपूर पुन्हा झाला दादा…पाहा शाहीदच्या छोट्या भावाचे फोटोज

05 May 2020
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT