पिरेड्स येण्याच्या आधी शरीरात अनेक बदल होऊ लागतात. पोटदुखी, डोकेदुखी, सतत काहीतरी खावेसे वाटणे किंवा एखाद्या आवडीच्या पदार्थावरुन इच्छा उडणे असा त्रास सर्वसाधारणपणे प्रत्येक महिलेला होतो. या व्यतिरिक्तही काही त्रास हमखास काही जणांना होत असतील. पण पिरेड्स दरम्यान काहींना त्यांच्यामध्ये आणखी एक बदल जाणवून यतो ते असा की, काही जणांना या काळात अंग सूजल्यासारखे वाटू लागते. इतरवेळी कधीही येत नाही. अशी सूज अंगाला या काळात येऊ लागते. तुम्हालाही पिरेड्सदरम्यान अंग सूजल्यासारखे वाटते का ? विशेषत: मांड्या या काळात अधिक सूजलेल्या वाटतात. जाणून घ्या या मागील नेमके कारण
मासिक पाळीमुळे वजनात वाढ होते का, काय आहे सत्य
पिरेड्समध्ये सूजतात मांड्या
पिरेड्स आल्यानंतर काही काळासाठी शरीरात खूप बदल होतात. त्यापैकी एक बदल म्हणजे या काळात अंगाला सूज आल्यासारखी वाटत राहते. अंगाला येणारी ही सूज मांड्या आणि पायांना येते. हे अगदी सर्वसाधारण आहे. इतरवेळच्या तुलनेत या दिवशी तुमच्या मांड्याच्या आकारामध्ये इतका फरक पडतो की, तुम्ही त्यामुळे थोडे जाड वाटू लागतात. मांड्याच्या ठिकाणी इतर दिवसांच्या तुलनेत पँट अधिक घट्ट वाटू लागते. पण हे रोज होतेच असे नाही. कारण मांड्या सूजण्याचा हा त्रास काहीच जणांना होतो. याचे कारण केवळ हार्मोन्समधील बदल असतात. ज्यावेळी तुमच्या शरीरामधील हार्मोन्स बदलू लागतात त्यावेळी शरीरातील काही फ्लुईड हे बदलतात आणि त्यामुळे शरीर सूजण्याचा त्रास हा होऊ लागतो.
तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?
आपोआप सूज होते कमी
जर फक्त पिरेड्सच्या काळात हा त्रास तुम्हाला होत असेल तर घाबरण्याचे काही कारण नाही. कारण पिरेड्स सुरु झाल्यानंतर अंगावरील ही सूज आपोआप कमी होऊ लागते. काहींना हा फरक अगदी पटकन जाणवतो. पिरेड्स आल्या आल्या शराराची सूज कमी होऊन मांड्या पूर्ववत होतात. त्यामुळे तुम्ही फार विचार करु नका. पण तुम्हाला काहीही कारण नसताना केवळ बसल्यावर मांड्याना सूज येत असेल तर अशी सूज येणे शरीरासाठी चांगले नाही.
पाय शेका
आता अगदीच तुम्हाला तुमची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही थोडासा आराम म्हणून पायांना छान गरम पिशवीचा शेक द्या. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. गरम पाणी किंवा तेलाची मालिश केल्यामुळे होणारी चिडचिड कमी होते. स्वत:ला पॅम्पर करण्याची एकही संधी तुम्ही सोडू नका.
व्हा रिलॅक्स
शरीराला सूज आल्यामुळे वजन वाढले, मी जाड झाले अशी भावना मनामध्ये येणे अगदी स्वाभाविक आहे. पण पिरेड्सचे हे दुखणे केवळ 5 दिवसांचे असते. त्यामुळे फार विचार करुन या दिवसात फार दमछाक करु नका. तुमचे वजन आणि सुजलेल्या मांड्या या काळात कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न करु नका. उगीचच कमी खाऊन शरीराला थकवण्यापेक्षा तुम्ही या काळात मस्त रिलॅक्स व्हा. थोडा आराम करा. मनाला जे वाटतं ते या दिवसात अगदी बिनधास्त खा. त्यामुळे तुम्ही या दिवसात छान आनंदी आणि मजेत राहाल.
पिरेड्समध्ये तुमच्या मांड्याना येत असेल अशी क्षणिक सूज तर आनंदी राहा आणि नको ती काळजी करणे सोडा