ADVERTISEMENT
home / आरोग्य
monkeypox

झपाट्याने पसरतोय मंकीपॉक्स व्हायरस, काय आहेत लक्षणे

सध्या जगात सगळीकडे मंकीपॉक्स हा आजार सगळ्यांचे लक्ष वेधून घेतो आहे. मंकीपॉक्स हा दुर्मिळ आजार आहे. जो मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो. यामुळे पुरळ आणि फ्लू सारखी लक्षणे दिसतात. मंकीपॉक्स विषाणू ऑर्थोपॉक्स विषाणूंच्या फॅमिलीतील आहे. हा विषाणूंच्या स्मॉल पॉक्स फॅमिलीतला विषाणू आहे. तज्ज्ञांच्या मते, मंकीपॉक्सची लक्षणे कांजिण्यांपेक्षा कमी गंभीर असतात. मंकीपॉक्स सामान्यतः फ्लू सारख्या आजाराने आणि लिम्फ नोड्सच्या जळजळीने सुरू होतो. चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ उठते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालात असे म्हटले आहे की दरवर्षी सुमारे डझनभर आफ्रिकन देश मंकीपॉक्सने प्रभावित होतात. यापैकी बहुतेक केसेस काँगोमधून नोंदवली गेली आहेत. 2003 मध्ये, अमेरिकेत मंकीपॉक्सची 47 प्रकरणे नोंदवली गेली. अलीकडेच जगभरात मंकीपॉक्सच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, यूएस, यूके, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड, फ्रान्स, इटली यासह 19 देशांमध्ये सध्या मंकीपॉक्सच्या 131 केसेसची पुष्टी झाली आहे, तर 106 प्रकरणे संशयित आहेत. कोरोनाव्हायरससोबतच आता मंकीपॉक्सच्या वाढत्या केसेसने जगभरात चिंता वाढवली आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय?

मंकीपॉक्स हा एक विषाणू आहे जो सामान्यतः वन्य प्राण्यांमध्ये आढळतो. परंतु काही प्रकरणे मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील लोकांमध्ये देखील दिसून आली आहेत. हा रोग प्रथम 1958 मध्ये ओळखला गेला. त्यावेळी संशोधन करताना माकडांमध्ये स्मॉलपॉक्ससारखा आजार आढळून आला होता, म्हणून त्याला मंकीपॉक्स असे म्हणतात. 1970 मध्ये काँगोमधील 9 वर्षांच्या मुलाद्वारे पहिल्यांदा मानवांमध्ये प्रसारित झाला होता. मंकीपॉक्स हा आजार प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याच्या रक्ताला किंवा फरला स्पर्श केल्याने मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतो. हा आजार उंदीर आणि खारींद्वारे पसरत असल्याचे मानले जाते.

Monkeypox
Monkeypox

मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्सच्या लक्षणांमध्ये ताप, अंगदुखी, थंडी वाजणे आणि थकवा यांचा समावेश होतो. अधिक गंभीर आजार असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आणि हातावर पुरळ आणि फोड येऊ शकतात जे शरीराच्या इतर भागांमध्ये देखील पसरू शकतात.हा आजार सहसा 5 ते 20 दिवसात बरा होते. बहुतेक लोकांना यासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. पण मंकीपॉक्स हा  10 पैकी एका व्यक्तीसाठी घातक ठरू शकतो आणि लहान मुलांच्या बाबतीत तो गंभीर मानला जातो. स्मॉलपॉक्सच्या लसींचा मंकीपॉक्सवरही परिणाम होतो. मंकीपॉक्ससाठी अँटीव्हायरल औषधे देखील विकसित केली जात आहेत.

Monkeypox
Monkeypox

कोव्हीड -19 आणि मंकीपॉक्समध्ये काही साम्य आहे का 

हे दोन्ही रोग विषाणूंमुळे होतात.  तज्ज्ञांच्या मते, COVID-19 आणि मंकीपॉक्स या दोन्हीमुळे त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे पुरळ सारखी लक्षणे दिसू शकतात. नोवेल कोरोनाव्हायरस किंवा कोविड -19 हा कोरोनाव्हायरसमुळे होणारा श्वसनाचा आजार आहे. त्यामुळे व्यक्तीला अनेकदा श्वास घेण्यास त्रास होतो आणि ऑक्सिजनचीही गरज भासू शकते. याउलट, मंकीपॉक्स पॉक्सविरिडे कुटुंबातील ऑर्थोपॉक्सव्हायरस जीनसशी संबंधित आहे. या आजारामुळे श्वसन प्रणालीवर कोणताही नकारात्मक प्रभाव होत नाही.

ADVERTISEMENT

कोरोनाव्हायरस संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये थेट संपर्काद्वारे पसरतो तर, मंकीपॉक्स शरीरातील द्रवपदार्थ, त्वचेवर फोड किंवा श्लेष्मल त्वचा यांच्या जवळच्या संपर्कातून पसरू शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा मंकीपॉक्सने पीडित व्यक्तीच्या शरीरातून संक्रमित द्रवपदार्थ बाहेर पडतो आणि ती व्यक्ती त्याच्या संपर्कात येते तेव्हा हा आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. 

कोविड-19 आणि मंकीपॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पुरळ दिसून येते. परंतु याशिवाय, त्यांच्या इतर वैशिष्ट्यांच्या आधारे त्यांच्यामध्ये फरक केला जाऊ शकतो. सामान्य COVID-19 च्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे, खोकला, थकवा, नाक वाहणे, सांधेदुखी, डोकेदुखी, श्वास लागणे, छातीत दुखणे, वास आणि चव कमी होणे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या यांचा समावेश होतो तर मंकीपॉक्सची लक्षणे कांजिण्यांसारखी असतात. डब्ल्यूएचओच्या मते या आजारात डोकेदुखी, ताप, थंडी वाजणे, घसा खवखवणे, अस्वस्थता, थकवा इत्यादी लक्षणे दिसतात.

या दोन्ही आजारांची लाट येण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्वतःची व घरातील लहान मुलांची काळजी घ्या.

Photo Credit – istockphoto

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT