हल्लीची लाईफस्टाईल पाहता कधी कोणाला कोणता त्रास सुरु होईल सांगता येत नाही. डाएबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल या समस्यांनी हल्ली अनेक तरुण देखील त्रासलेले आहेत. शरीरात असलेल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले किंवा त्याचे संतुलन बिघडले की, तुमच्या शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढते. Bad Cholestrol लाच LDL असे म्हटले जाते. याचे शरीरातील प्रमाण वाढले की, तुम्हाला अनेक त्रास होऊ शकतात. जे नियमितपणे तपासणी करतात. अशांना त्यांना होणारे त्रास सहज कळतात. पण जे शरीर तपासणी करत नाहीत. अशांना मात्र त्यांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण किती हे कळत नाही. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर तुम्हाला काही लक्षणे जाणवतील. जर असा त्रास तुम्हालाही होत असेल तर समजून जावे की, तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत चालले आहे.
कोलेस्ट्रॉलचे काम काय?
प्रत्येकाच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे असते. चांगले आणि वाईट असे दोन्ही कोलेस्ट्रॉल शरीरात असतात. त्यांना LDL ( Low Density Lipoprotein) आणि HDL ( High Density Lipoprotein). शरीरात HDL असेल तर ते शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्याचे काम करते. चांगले कोलेस्ट्रॉल हे वाईट कोलेस्ट्रॉलला लिव्हरपर्यंत नेऊन शरीरातून बाहेर फेकण्याचे काम करते. त्याच्या असण्यामुळे हार्ट अटॅकची संभावना कमी होते. ह्रदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते. ह्रदय निरोगी असेल तर तुम्ही निरोगी राहता.
कोलेस्ट्रॉल वाढण्याची लक्षणे
तुम्हाला कोलेस्ट्रॉलचा त्रास सुरु झाला आहे हे तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांवरुनही कळू शकते. ही लक्षणे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत असतील तर तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे जा.
- हातापायांना मुंग्या येणे- एका जागी बसून राहिल्यामुळे हातापायांना मुंग्या येणे अगदी स्वाभाविक आहे. पण या मुंग्या सतत येत असतील तर ते आरोग्यासाठी वाईट आहे. कारण कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या लक्षणांमध्ये याचा समावेश होतो. सतत मुंग्या येणे, टाचा दुखणे यामागे वाढलेले कोलेस्ट्रॉल असते.
- थकल्यासारखे वाटणे: काही काम केल्यामुळे थकवा येणे आणि काहीही कारण नसताना थकवा येेणे हे तुमच्या शरीरातील कमतरता दाखवत असते. सतत येणारा थकवा हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण आहे.
- वजन वाढणे: जर तुमचे वजन अचानक वाढत असेल. आहार घेत नसतानाही तुमच्या वजनाचा आकडा कमालीचा वाढत असेल तरी देखील कोलेस्ट्रॉलची चिंता तुम्हाला सतावू शकते.
- पिंपल्स : जर प्रमाणाहून जास्त पिंपल्सचा त्रास तुम्हाला होत असेल तरी देखील तुम्हाला कोलेस्ट्रॉल झालेेेले असू शकते. शरीरात हार्मोन्सचे बदलणे हे स्वाभाविक असले तरी देखील हा त्रास अचानक होऊ लागला की, कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.
- सेक्स करण्याची इच्छा नसणे: कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर जोडीदारासोबत सेक्स करणयाची इच्छा होत नाही. सेक्स झाले तरी त्यात तितके प्लेझर मिळत नाही. सेक्स करण्याची तुमचीही आवड कमी झाली असेल तर कोलेस्ट्रॉलची समस्या असू शकते.
ही काही लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही लगेचच तुमच्या रक्ताची तपासणी करायला हवी.