ADVERTISEMENT
home / आरोग्य
Symptoms Of Tuberculosis In Marathi

जाणून घ्या क्षयरोगाची लक्षणे आणि वेळीच करा उपचार | Symptoms Of Tuberculosis In Marathi)

क्षयरोग (Tuberculosis In Marathi) हा एक संसर्गजन्य विकार आहे. क्षयरोग अथवा टीबी ट्यूबरक्युलोसिस या विषाणूमुळे होतो. विशेष म्हणजे क्षयरोगाचा परिणाम रूग्णाच्या फुफ्फुसांवर जास्त होतो. ज्यामुळे त्याला भयंकर खोकला, श्वास घेण्यास त्रास होतो. फुफ्फुसांप्रमाणेच क्षयरोगामुळे मेंदू, तोंड, घसा, यकृत, किडनी हे अवयवही संक्रमित होतात. क्षयरोग संसर्गजन्य असल्यामुळे श्वासामधून तो इतर व्यक्तीला संक्रमित करू शकतो. अशा रूग्णांच्या खोकला आणि शिंकण्यातून विषाणू हवेत पसरतात. या आजारावर वेळीच उपचार केले  गेले नाहीत तर रूग्णाची अवस्था गंभीर होऊ शकते. यासाठीच क्षयरोगाची लक्षणे (Symptoms Of Tuberculosis In Marathi) वेळीच ओळखून त्यावर क्षयरोगावर उपचार (Tb Treatment In Marathi) करणं अतिशय गरजेचं आहे. यासाठीच जाणून घ्या ही माहिती.

तीन आठवड्यांपेक्षा जास्त वेळ खोकला

Symptoms Of Tuberculosis In Marathi

Symptoms Of Tuberculosis In Marathi

क्षयरोगामुळे रूग्णाच्या फुफ्फुसांवर परिणाम होतो. फुफ्फुसांमध्ये विषाणूचे संक्रमण झाल्यामुळे रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो आणि सतत खोकला येतो. अशा रूग्णांना लागोपाठ तीन आठवडे सुका खोकला जाणवतो मात्र तीन आठवड्यानंतर खोकल्याचे प्रमाण अधिक तीव्र होत जाते. यासाठीच दोन ते तीन आठवडे जर एखाद्याला सतत खोकला असेल तर त्या व्यक्तीने क्षयरोगाची तपासणी करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा नॉर्मल खोकलाही दोन ते तीन आठवडे असू शकतो. मात्र क्षयरोगाचे लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi)  समजल्यास आणि वेळीच तपासणी झाल्यास त्यावर निदान करणे सोपे होते यासाठी खोकला असलेल्या रूग्णांनी याबाबत दक्ष राहून योग्य ती तपासणी अवश्य करावी.

खोकल्यामधून कफ आणि रक्त येणे

क्षयरोगाचे प्रमुख लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi)  म्हणजे लागोपाठ दोन ते तीन आठवडे खोकला येणे. पहिल्यांद्या अशा रूग्णांना फक्त सुका खोकला जाणवतो मात्र या खोकल्यावर वेळीच योग्य उपचार न झाल्यास तो बळावत जातो. फुफ्फुसांमधील संक्रमण वाढत गेल्याने पुढे खोकल्यासोबत अशा रूग्णांना सतत कफल बाहेर पडणे आणि खोकल्यावाटे रक्त येण्याचा त्रास होतो. अती प्रमाणात खोकल्यामुळे आणि संक्रमित भागावर योग्य  उपचार न मिळाल्यामुळे ही लक्षणे जाणवू शकतात. यासाठी खोकला जास्त काळ असेल तर अशा व्यक्तीने त्वरीत स्वतःची क्षयरोगाची चाचणी करणे गरजेचं आहे. यासाठी करा सर्दी खोकला वर घरगुती उपाय (Cold And Cough Home Remedies In Marathi)

ADVERTISEMENT

छातीत दुखणे अथवा श्वास घेताना त्रास होणे

छातीत दुखणे हे क्षयरोग झालेल्या रूग्णांमधील सामान्य लक्षण आहे. बऱ्याचदा लोकांना कळत असतं की त्यांच्या छातीत दुखत आहे. मात्र या लक्षणाकडे दुर्लक्ष केलं जातं. अॅसिडिटी अथवा खोकल्यामुळे छातीत दुखत असेल असा विचार करून त्यावर योग्य ते उपचार केले जात नाहीत. मात्र याचे गंभीर परिणाम अशा लोकांना पुढे भोगावे लागतात. कारण क्षयरोगाचे प्रमाण वाढल्यास अशा लोकांना इतर आरोग्य समस्यांनाही तोंड द्यावे लागते. यासाठीच जर खोकल्यासोबत छातीत दुखणे अथवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर वेळीच उपचार घ्या. यासाठीच जाणून घ्या क्षयरोगाची आणखी काही लक्षणे (Symptoms Of Tuberculosis In Marathi).

ताप

Symptoms Of Tuberculosis In Marathi

क्षयरोगाची लक्षणे

क्षयरोगाचा आणि तापाचा काय संबध असं तुम्हाला वाटु शकतं. मात्र ताप येणे हे क्षयरोगाचे लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi) असू शकते. ज्या लोकांना टीबी होतो त्यांना सतत ताप जाणवू शकतो. सुरूवातीला अशा लोकांना ताप कमी असतो मात्र जर योग्य उपचार घेतले नाहीत तर संक्रमण वाढते आणि तीव्र ताप येण्याची शक्यता असते. म्हणून खोकला, छातीत दुखणे आणि तापाची लक्षणे दिसत असतील तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.यासोबतच जाणून घ्या ताप कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Fever Home Remedies In Marathi)

अचानक वजन कमी होणे

वजन वाढणे आणि ते कमी करण्यासाठी प्रयत्न करणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. आज जगातील  अनेकांना चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणातून जावे वजन कमी करण्यासाठी सर्वजण अनेक प्रयत्न करताना दिसतात. मात्र जर तुमचे अचानक काही कारण नसताना आणि कोणतेही प्रयत्न न करता खूप वजन कमी झाले असेल तर याबाबत आनंदी न होता सावधपणे विचार करा. कारण अचानक वजन कमी होणे हे क्षयरोग म्हणजेच टीबी होण्याचे एक लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi) असू शकते. त्यामुळे इतर लक्षणांसोबत झपाट्याने वजन कमी झाल्यास तुमची टीबीची चाचणी अवश्य करून घ्या.

ADVERTISEMENT

थंडी वाजणे

वातावरण उष्ण असताना अथवा उन्हाळ्याच्या दिवसांमध्येही क्षयरोग झालेल्या रूग्णांना थंडी वाजू शकते. त्यामुळे जर तुम्हाला अचानक थंडी वाजून ताप येणे अथवा अंगातून खूप प्रमाणात घाम येणे अशी लक्षणे जाणवत असतील तर तुम्ही तुमची क्षयरोगाची तपासणी वेळीच करून घ्यायला हवी. कारण अचानक थंडी वाजणे हे क्षयरोग असण्याचे प्रमुख लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi) असू शकते. ज्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.

थकवा

Tuberculosis In Marathi

Tuberculosis In Marathi

टीबीच्या रूग्णांना भूक न लागणे, वजन कमी होणे यामुळे अती प्रमाणात अशक्तपणा जाणवू शकतो. ज्यामुळे त्यांना सतत थकल्यासारखे वाटते. कोणतेही काम करण्याचा उत्साह अशा लोकांना वाटत नाही. अंगामध्ये शक्ती कमी असल्यामुळे निरूत्साही वाटते आणि सतत झोपून राहावे असे वाटते. जर तुम्हाला खूप दिवसांपासून असे एखादे लक्षण जाणवत असेल तर वेळीच तुमची क्षयरोगाची चाचणी करून घ्या. जाणून घ्या प्रतिकार शक्ती कमी आहे हे ओळखण्याची लक्षणे (Signs Of A Weak Immune System In Marathi).

भूक कमी लागणे

क्षयरोग झालेल्या रूग्णांचे वजन कमी होण्याचे आणि अशक्तपणाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची जेवणाची इच्छा कमी होते. भूक न लागण्यामुळे त्यांना खाण्याची इच्छा होत नाही. भूक कमी लागणे हे क्षयरोगाचे आणखी एक लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi) आहे. जर तुम्हाला काही दिवसांपासून भूक लागत नसेल किंवा वेळेनुसार योग्य जेवण घेऊनही तुमचे वजन झपाट्याने कमी होत असेल तर तुम्हाला क्षयरोगाची  चाचणी करण्याची नक्कीच गरज आहे. मात्र या संदर्भात तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन मगच याबाबत चाचणी करण्याचा निर्णय घ्यावा. 

ADVERTISEMENT

रात्री अंगातून घाम येणे

क्षयरोग झालेल्या रूग्णांच्या अंगातून सतत घाम येतो. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी अशा रूग्णांना खूप घाम येण्याचा त्रास जाणवू शकतो. जरी वातावरणात थंडी अथवा पावसाचे प्रमाण जास्त असले तरी क्षयरोग झालेल्या रूग्णांना अशा थंड वातावरणात घाम येऊ शकतो. एसी लावूनही जर तुम्हाला सतत घाम येत असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या या लक्षणाकडे गंभीरतेने पाहायला हवे. कारण हे क्षयरोगाचे एक प्रमुख लक्षण (Symptoms Of Tuberculosis In Marathi) आहे. 

क्षयरोगाची लक्षणे आणि काही निवडक प्रश्न – FAQ’s

1. क्षयरोग पूर्ण बरा होतो का ?

क्षयरोगात फुफ्फुसांना संक्रमण होते. ज्यामुळे या रोगाचे संक्रमण इतरांनादेखील पटकन होते. जर या आरोग्य समस्येवर वेळीच उपचार केले तर संक्रमण आटोक्यात येणं शक्य असतं. यासाठी अॅंटि बायोटिक्सचा कोर्स रूग्णाला देण्यात येतो. मात्र वेळीच उपचार न केल्यास मात्र हा रोग बरा होण्याची शाश्वती देता येत नाही.

2. क्षयरोग होण्याचा पहिला टप्पा कोणता ?

क्षयरोगाचे सौम्य, मध्यम आणि गंभीर अशा तीन टप्प्यांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे सौम्य लक्षणे जाणवताच उपचार करून तुम्ही पहिल्या स्टेजमध्येच क्षयरोगापासून बरे होऊ शकता.

3. क्षयरोगावर कोणते घरगुती उपाय करावे ?

क्षयरोग झाल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातील इतर मंडळींपासून दूर राहा. योग्य औषधे घ्या आणि पोषक आहार आणि पुरेशी झोप घ्या. आलं, लसणाचा रस, आवळ्याचा रस, काळीमिरीची पावडर, पुदिना, ग्रीन टी, आल्याचा चहा, कोमट पाणी असे घरगुती उपचार तुम्ही नक्कीच करू शकता.

4. क्षयरोगावर उपचार (Tb Treatment In Marathi) कोणते करावे ?

क्षयरोग झाल्यास सुरूवातीच्या काळात डॉक्टर रूग्णाला अॅंटि बॉडीज गोळ्यांचा कोर्स देतात. शिवाय अशा रूग्णांचे एक्स- रे काढून त्याचे फुफ्फुसांमधील संक्रमण तपासले जाते. ज्यावर त्याच्या समस्येनुसार उपचार करण्यात येतात. रूग्णावर क्षयरोगासाठी उपचार (tb treatment in marathi) कोणते करावे हे त्या रुग्णाच्या आरोग्य स्थितीवर अवलंबून असते. बऱ्याचदा आरोग्य स्थिती सौैम्य स्वरूपाची असेल तर या समस्येवर घरगुती, आयुर्वेदिक आणि होमियोपॅथी उपचारही केले जातात.

20 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT