बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू निर्माती म्हणून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. तापसीने तिच्या आगामी चित्रपट धकधकची घोषणा हटके स्टाईलने केली आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित करण्यासाठी तिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये फातिमा सेन, रत्ना पाठक, संजना गांधी आणि दीया मिर्झा या अभिनेत्री बुलेटवर स्वार झालेल्या दिसत आहेत. चित्रपटाचा हा फर्स्ट लुक असल्यामुळे या लुकमधून चित्रपटाच्या अंदाज प्रेक्षकांना घेता येईल. तापसीच्या चारही अभिनेत्रींचा हा अवतार नक्कीच महिलांना प्रभावित करणारा आहे. या चारजणींच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास अनेकींनी प्रेरीत करणारा असेल असा अंदाज यामुळे व्यक्त केला जात आहे.
अभिनेत्रींचा अनोखा स्वॅग
धकधकचं कथानक परिजत जोशीने लिहीलं आहे, शिवाय या चित्रपटाचं दिग्दर्शन तरूण डुडेजा करणार आहे. तापसी पन्नू या चित्रपटाची निर्मिती करत असून तिने या पोस्टसोबत शेअर केलं आहे की, धकधकसोबत लाईफटाईम प्रवासात सहभागी व्हा, कारण या चार महिला स्वतःचं अस्तित्व शोधत एका जगातील सर्वात उंच पर्वतरांगाचा रोमांचक प्रवास करण्यास निघाल्या आहेत. या पोस्टमध्ये फातिमा सेनने टॉप आणि शॉर्ट परिधान केली आहे, रत्ना पाठक यांनी सलवार सूट घातला आहे, संजना सांघीने जीन्स तर दीया मिर्झाने बुरखा परिधान केलेला आहे. अशा चार निरनिराळ्या व्यक्तिमत्त्वाच्या महिला बाईकवरून त्यांचा अनोखा अंदाज या चित्रपटातून दाखवण्याची शक्यता आहे. तापसीसोबतच आऊटसाडरर्स फिल्म्स, वायकॉम 18 स्टुडिओज, प्रांजल खंडडिया आणि आयुष महेश्वरी या चित्रपटाचे सह निर्माते असणार आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होण्याचा अंदाज आहे.
काय असेल धकधकचं कथानक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धकधक ही चार महिलांची, प्रेक्षकांच्या मनाला हळूवार स्पर्श करणारी कथा असेल. ज्या त्यांच्या जगातून बाहेर पडत एका प्रवासाला निघतात. या रोमांचक प्रवासात त्यांच्यामधील आत्मविश्वास वाढत जातो. स्वतःचं अस्तित्त्वाचा शोध त्यांना लागतो. चार दिग्गज अभिनेत्री आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळं असा अविस्मरणीय बाईक प्रवास या कथेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक