साऊथच्या चंद्रमुखी या चित्रपटाचा रिमेक असलेल्या ‘भुलभुल्लैया’ या चित्रपटाचा पार्ट 2 लवकरच येणार आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच आता या नव्या भागात नेमका कोणता ट्विस्ट असणार ? स्टोरी प्लॉट आणि कलाकार कोणते असणार अशी चर्चा होत असतानाच आता यामध्ये एक वेगळा ट्विस्ट आल्याचे कळत आहे. या चित्रपटात तब्बू एक वेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. तसं तर या चित्रपटाची स्टारकास्ट सगळ्यानांच माहीत झाली आहे. पण तब्बू या चित्रपटातील ‘आमी जे तोमार’ या गाण्याच्या रिक्रिएशन व्हर्जनमध्ये दिसणार आहे. पण हे येण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे.
नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेंडला इशारा, ‘माझ्या नावाचा वापर करण्याचं धाडस नको करू’
तब्बूचा नृत्याविष्कार करणार घायाळ
तब्बूने आतापर्यंत अनेक वेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधुन’ या चित्रपटात निगेटीव्ह रोलमध्ये दिसली होती. पण आता ती वेगळ्या रुपात दिसणार आहे. तुम्हाला ‘आमी जे तोमार’ हे विद्या बालनचं गाणं आठवत असेल तर यामध्ये धुवांधार परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. याचं गाण्याचे रिमेक होणार असून या गाण्यावर आता तब्बू थिरकणार आहे. तब्बूनेही क्लासिकल नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे ती बेस्ट डान्स करणार यात काही शंका नाही.
भुलभुल्लैया 2 मध्ये दिसणार ही जोडी
भुलभुल्लैयामध्ये या आधी अक्षय कुमार, शायनी आहुजा, विद्या बालन, अमिषा पटेल हे कलाकार दिसले होते. आता या नव्या भुलभुल्लैया 2 मध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचे शुटींग सुरु आहे. राजस्थान जयपूर या ठिकाणी या चित्रपटाचे काही शुटींग करण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या भागाचे शुटींग पूर्ण झाले आहे. एप्रिलमध्ये या चित्रपटाचे शुटींग पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यानंतर लगेचच हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.
कार्तिक आर्यन उत्सुक
‘भुलभुल्लैया 2’ या चित्रपटाची घोषणा गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कार्तिक आर्यनने या चित्रपटाची घोषणा त्याच्या इन्स्टाग्रामवरुन केली होती. अक्षय कुमारप्रमाणेच त्याने भगवे कपडे घातलेला एक फोटो शेअर केला होता. यावेळीच त्याने या प्रोजेक्टमध्ये कोण कोण असणार यांची नावं सुद्धा सांगितली होती. त्यामध्ये तब्बू असल्याचेही कळाले होते. पण तब्बू कोणत्या भूमिकेत दिसणार हे कळले नव्हते. पण आता त्यावरुनही पडदा उठला आहे.
रणबीरसोबतच्या लग्नाच्या गॉसिप म्हणजे केवळ बातम्या- आलिया
कार्तिक आणि किआरा पहिल्यांदाच करणार स्क्रिन शेअर
कार्तिक आर्यन नुकताच ‘लव आज कल 2’मध्ये दिसला होता. सारासोबत त्याची केमिस्ट्री एकदम मस्त दिसली होती. त्यांच्या प्रमोशन दरम्यान त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर मात्र सगळ्यांना त्यांचे रिलेशनशीप कन्फर्म झाल्याच्या चर्चा केल्या होत्या पण आता हा नवा चित्रपट येणार म्हटल्यावर प्रमोशनसाठी कार्तिक किआरासोबत दिसणार का? हा प्रश्न आहे.
सध्या तरी भुलभुल्लैयाचा ‘आमी जे तोमार’ हा परफॉर्मन्स पाहण्यासाठी थोडे दिवस थांबा.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.