ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
#Metoo नंतर आता तनुश्री दत्ताचे पुनरागमन, 15 किलो वजन केले कमी

#Metoo नंतर आता तनुश्री दत्ताचे पुनरागमन, 15 किलो वजन केले कमी

बॉलीवूडमध्ये 2018 मध्ये #MeToo प्रकरण पहिल्यांदाच घेऊन येणारी तनुश्री दत्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 2010 पासून तनुश्रीने बॉलीवूडमध्ये कोणतेही काम केलेले नाही. पण आता सोशल मीडियावर एका फोटोसह मोठी पोस्ट तनुश्रीने दिली आहे. या फोटोमध्ये तनुश्रीचा पूर्ण मेकओव्हर झालेला दिसून येत आहे. तिने वजन कमी केल्याचेही जाणवत आहे. तनुश्री लवकरच कमबॅक करत असल्याचे तिने सांगितले आहे.

पवित्रा पुनियाचे हॉट बॅकलेस ब्लाऊज डिझाईन्स, तुम्हालाही पाडतील भुरळ

कमबॅकसाठी केले वजन कमी

तनुश्रीने यासंदर्भात सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. ‘मीडियामध्ये काही जुन्या बातम्या पसरत आहेत की मी लॉस एंजेलिसमध्ये IT क्षेत्रात काम  करत आहे. मी IT चे प्रशिक्षण घेत होते आणि US शासनच्या डिफेन्स सेक्टरमध्ये मला चांगल्या नोकरीची संधीही होती पण मी माझे आर्टिस्टिक करिअर सोडून  ही नोकरी करू शकले नाही. मी मनापासून कलाकार आहे आणि काही लोकांना मी या कामापासून दूर झाले याचे वाईट वाटले होते. माझे करिअर घाईने निर्णय घेऊन बदलू नये आणि बॉलीवूडमध्ये काही पर्यायांवर पुन्हा विचार करू असा मी विचार केला. बॉलीवूड आणि मुंबई या दोन्हीवर माझे प्रेम आहे आणि मी इथेच राहणार असून आता काही प्रोजेक्टवर काम करणार आहे’

तनुश्रीने पुढे म्हटले की, ‘मला काही चित्रपट आणि वेबसिरीजच्या ऑफर्स येत आहेत आणि मला वाटतं माझ्या शत्रूंशिवाय इंडस्ट्रीमध्ये मला काम देण्यासाठी अनेक लोक आहेत. सध्या मी 3  दाक्षिणात्य चित्रपटांचे व्यवस्थापक आणि मुंबईमध्ये 12 कास्टिंग ऑफिसशीशी चर्चा करत आहे, जे मला सध्या काही प्रोजेक्ट्सच्या बाबतीत माहिती देत आहेत. इंडस्ट्रीतील काही जण मला गपचूप पाठिंबा देत आहेत कारण त्यांना खरं काय आहे त्याची कल्पना आहे आणि माझे शुभचिंतक आहेत. काही मोठ्या प्रॉडक्शन हाऊससहदेखील सध्या माझी चर्चा चालू आहे. कोरोनामुळे चित्रिकरणाच्या बाबतीत अजूनही अनिश्चितता आहे. त्यामुळे कोणतीही घोषणा करता येत नाही. काही दिवसांपूर्वीच मी एका ब्युटी ब्रँडसाठी जाहिरात केली असून मी  लवकरच परत येत असल्याची घोषणा केली आहे. त्यासाठी 15 किलो वजन मी कमी केलं आहे आणि सध्या माझ्या नावाची चर्चा इंडस्ट्रीमध्ये आहे की मी परत येत आहे.’

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या शीतल पवारने मिसेस इंडिया स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक

नोव्हेंबर 2018 गाजवले #Metoo आरोपांनी

नोव्हेंबर 2018 मध्ये तनुश्री दत्ताने नाना पाटेकर यांच्यावर ‘हॉर्न ओके प्लीज’ च्या सेटवर 2008 मध्ये चुकीचा स्पर्श करून छेड काढण्याचा आरोप लावला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांना ‘हाऊसफुल’ चित्रपटातून काढून टाकण्यात आलं होतं. पोलिसांनी नाना पाटेकर यांच्या विरोधात तक्रारही नोंदवून घेतली. पण 2019 मध्ये नाना पाटेकर यांना क्लिन चीट मिळाली. आरोप करून तनुश्री पुन्हा अमेरिकेत गेली. तनुश्री 36 वर्षाची असून तिने आतापर्यंत ‘आशिक बनाया आपने’, ‘हॉर्न ओके प्लीज’, ‘ढोल’ सारखे चित्रपट केले आहेत. आता तनुश्री कोणत्या चित्रपटातून पुनरागमन करतेय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याशिवाय इतकं सगळं झाल्यानंतर आता तनुश्रीला किती आणि कसे प्रोजेक्ट्स मिळत आहेत याचीही चर्चा चालू झाली आहे.  

Laxmii:अक्षय कुमार आणि शरदच्या अभिनयाचा उत्तम मेळ, तरीही साथऊथला दिली नाही टक्कर

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
10 Nov 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT