करण जोहरच्या ‘स्टुंडट ऑफ द ईअर 2’ मधील अभिनेत्री तारा सुतारिया आणि करिना कपूरचा आतेभाऊ आदर जैन एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्यांना आता बराच काळ लोटला आहे. मात्र दोघांनीही कधीच याबद्दल कोणतंही शिक्कामोर्तब केलं नव्हतं. या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिलं जातं. नुकतंच रक्षाबंधनाच्या दिवशीही कपूर खानदानच्या कौटुंबिक लंचमध्येही दोघे एकत्र होते. इतकंच नाही तर आदरचा मोठा भाऊ अरमान जैनच्या लग्नातही दोघांनी एकत्र डान्स केला होता. पण आता नुकतंच दोघांनी नात्यावर शिक्कामोर्तब केलं असून तारा आता कपूर खानदानाची सून होण्याची चिन्हं आहेत. खरं तर ताराचं करिअर नुकतंच सुरू झालं आहे. मात्र तरीही तारा आणि आदर या दोघांना बऱ्याचदा एकत्र पाहिल्यानंतर तारा जास्त काळ चित्रपटात काम करणार नाही अशाही चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
आदरच्या वाढदिवसाच्या दिवशी ताराचा सोशल मीडियावर मेसेज
Instagram / Tara Sutaria
आदर जैनचा 5 ऑगस्टला वाढदिवस होता आणि यादिवशी आदर 26 वर्षांचा झाला असून ताराने आदरबरोबरचा अगदी क्लोज फोटो पोस्ट करत त्याला ‘फेव्हरेट पर्सन’ असं कॅप्शन लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर ताराने आपल्या कॅप्शनमध्ये ‘कायमस्वरूपी माझा, कायमस्वरूपी आपण! @aadarjain माझ्या सर्वात आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असं म्हटलं आहे. इथपर्यंत तर सगळंच ठीक होतं पण बर्थडे बॉय आदरने त्यावर हार्ट इमोजी पोस्ट करत ‘आय लव्ह यू’ असा रिप्लायही दिला आहे. त्यामुळे आता दोघांच्याही नात्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याआधी दोघांनाही एकत्र फिरताना आणि अगदी व्हेकेशनवरही दोघांना पाहण्यात आलं आहे. दोघांचे फोटोही नेहमी व्हायरल होत असतात.
शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग
ताराच्या बहिणीनेही केला फोटो शेअर
ताराची बहीण पिया सुतारियादेखील आदरची मैत्रीण आहे आणि तिनेदेखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून आदरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये सुतारिया बहिणींच्यामध्ये आदरचं सँडविच झालं असं मजेशीर कॅप्शन देत तिने अगदी आनंदी फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये आदर आणि तारा दोघेही यामध्ये अत्यंत आनंदी दिसत असून एकमेकांबरोबर खूष दिसत आहेत.
मुझसे शादी करोगे’फेम अभिनेत्रीचा अपघात, फोटो व्हायरल
आदर आपल्यासाठी खास असल्याचे ताराने केले होते कबूल
मागच्या वर्षी मलायका अरोराच्या वाढदिवसाच्या पार्टीत आणि अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीपासून दोघांच्या एकत्र येण्याला सुरूवात झाली. तेव्हापासूनच दोघंही चर्चेत होते. मात्र आपण एकमेकांचे खूपच चांगले मित्र असून एकमेकांबरोबर वेळ घालवायला आवडतो असं ताराने सांगितलं होतं. तसंच आदर आपल्यासाठी खास मित्र असल्याचंही तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आम्ही दोघंही खादाड असून आम्हाला एकत्र राहायला आवडतं असं ताराने स्पष्ट केलं होतं. आम्ही पहिल्यांदा दिवाळी पार्टीमध्ये भेटलो आणि आमचे खूपच कॉमन फ्रेंड्स आहेत. त्यानंतर ताराने आदरबरोबर त्याच्या भावाच्या लग्नात संगीत पार्टीला खास परफॉर्मन्स दिल्याचे व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते. आदरच्या आईने वर्षाच्या सुरुवातीलाच या दोघांच्या नात्याला आपली काहीही हरकत नसल्याचे सांगितलं होतं. आदर जैन हा रिमा जैन यांचा मुलगा असून राज कपूर यांचा सर्वात लहान नातू आहे. आदरनेदेखील बॉलीवूडमध्ये एक चित्रपट केला असून सध्या तो आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे.
अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा