‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली बबिता म्हणजेच मुनमुन दत्ता अडचणीत सापडली आहे. बोलायचं होतं एक आणि बोलली काहीतरी वेगळचं यामुळे तिने सोशल मीडियावर तिची टीका व्हायला सुरुवात झाली आहे. चाहत्यांशी संवाद साधण्याच्या नादात पोस्ट केलेला तिचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला आहे की, तिने उल्लेख केलेल्या समाजातील लोकांची मन दुखावली गेली आहे. एक अभिनेत्री म्हणून मुनमुन कितीही चांगली असली तरी देखील तिने केलेल्या या विधानानंतर तिला अटक व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. सध्या ट्विटरवर ##ArrestMunmunDutta नावाचा हा हॅशटॅग चांगलाच दिसत आहे. समाजातील ज्या लोकांविषयी ती अनावधानाने वाईट अर्थी बोलली आहे. त्यांची बाजू ट्विटवरील लोकांनी धरुन मुनमुनला चांगलेच टार्गेट केले आहे. मुनमुनने नेमकं काय केलं आहे ते जाणून घेऊया.
ट्विटरनंतर आता कंगनाच्या इन्स्टाग्रामवर डोळा, पोस्ट झाली डिलीट
नेमकं प्रकरण काय?
'भंगी की तरह नही दिखना चाहती हु अच्छी दिखना चाहती हूं': @moonstar4u मुनमुन दत्ता (तारक मेहता का उल्टा का चश्मा की ऐक्ट्रेस बबिता उर्फ मुनमुन दत्ता) अब इस जातिवाद लडक़ी को कानून का पाठ पढ़ाना होगा।
— Sunil Astay (@SunilAstay) May 10, 2021
बहुजन समाज का अपमानबर्दाश्त नही, आखिर इनके मन मे आज भी जातिवाद कितना भरा हुआ है। pic.twitter.com/VYGEJnoxeN
These people are covid warriors….
— Mayank singh 🇮🇳 (@Mayank_singh189) May 10, 2021
How dare you……to abuse these Peoples…#ArrestMunmunDutta pic.twitter.com/OW2uePDpAg
मुनमुन दत्ता ही इतर कोणत्याही सेलिब्रिटीप्रमाणे आपले युट्युब चॅनेल घेऊन येत आहे. त्यासाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या या नव्या चॅनेलविषयी सगळ्यांना सांगत आहे. युट्युबवर मला खूप सुंदर दिसायचे आहे. मला ‘भंगी’ दिसायचे नाही. असे ती यामध्ये म्हणत आहे. बस्सं तिचे हे असे बोलणे समाजातील महत्वपूर्ण घटकांना न्यूनत्तम दर्जा दाखवण्यासारखे आहे. समाजातील हा घटक आहे. म्हणूनच देश स्वच्छ राहण्यास मदत होत आहे. ती तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत. जसे तुम्ही काम करता तसेच ती देखील काम करतात. त्यामुळे भंगी सारखे दिसणे हे बोलणे किती चुकिचे आहे हे मुनमुनला ट्रोल झाल्यानंतर चांगलेच कळले असेल. अनेकांनी सफाईकामगारांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत हे खरे वॉरिअर्स असे म्हणत त्यांना गौरविले आहे. असे करताना मुनमुनला त्यांनी चांगलेच फटकारले आहे. भंगीसारखे दिसणे म्हणजे काय असा प्रश्न करत हे फारच अपमानकारक असल्याचे देखील त्यांनी तिला उत्तरादाखल सांगितले आहे. मुनमुनचा हाच व्हिडिओ सध्या खूप ठिकाणी व्हायरल होत आहे.
सेन्सॉर बोर्ड नाही खुद्द सलमाननेच कापले राधे चित्रपटातील ‘हे’ सीन्स
मिळाली प्रसिद्धी
सध्या अनेक सेलिब्रिटी आपले रोजचे जीवन कळण्यासाठी युट्युबच्या माध्यमातून व्लाॅग करत बसतात. आपण दिवसभर काय करतो? काय खातो? कशी काळजी घेतो हे सगळे ते व्हिडिओमधून दाखवत असतात. आता यामध्ये मुनमुनची भर पडली आहे. पण चॅनेलवर काही हालचाली सुरु होण्याआधीच तिच्यावर अनेकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. याचा नाहक फायदा तिला होणार आहे. युट्युबवर तिचे आधीपासूनच युट्युब चॅनेल आहे. पण ती यावर सतत व्हिडिओ टाकत नाही. पण या पुढे ती असे व्हिडओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळेच तिने हा नवा व्हिडिओ टाकताना अशी काय ओळ वापरली की, त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि तिच्या अटकेची मागणी चांगलीच जोर धरु लागली. सध्या युट्युबवरील तिच्या व्हिडिओमध्ये ही ओळ दिसून येत नाही. तिने हा व्हिडिओ एडिट करुन पुन्हा एकदा टाकला आहे.
गोव्यातील मालिकांचं चित्रीकरण रखडलं,मालिकांना बसणार फटका
तारक मेहतामुळे मिळाली प्रसिद्धी
गेली कित्येक वर्ष सुरु असलेल्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने खऱ्या अर्थाने मुनमुनला प्रसिद्धी मिळवून दिली. तिला या मालिकेमुळे खूप फॅनबेसही मिळाला. मुनमुनने इतर काम केली असली तरी या मालिकेमुळे बबिता भाभी नावाने ती अधिक प्रसिद्ध झाली.
पण बोलताना सेलिब्रिटी असो वा नसो काहीतरी चाड ठेवणे गरजेचे असते. हे मुनमुनला चांगलेच कळले असेल.