दयाबेन मालिकेत परत येईल याच्या प्रतिक्षेत असताना आता या मालिकेतील आणखी एक चेहरा लवकरच या मालिकेत दिसायचा बंद होणार आहे असे कळत आहे. आता कोण? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. गेली कित्येक वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात जाऊन बसली आहे. यातील एक एक पात्र हे प्रेक्षकांसाठी खूपच जास्त महत्वाचे आणि जवळचे झाले आहे. अशातच आता या पात्र बदलाच्या बातमीमुळे प्रेक्षकही विचारात पडले आहेत. मालिकेतून नेमका कोणता मोठा चेहरा बाहेर पडणार असा विचार करत असाल तर तो तारक मेहताचा आहे. तारक मेहता यांची भूमिका साकारणारा अभिनेत्याने ही मालिका सोडली असल्याचे सांगितले जात आहे.
शैलेश लोढा मालिकेतून होणार बाहेर
मालिकेत अचानक तारक मेहताचे पात्र साकारणारा अभिनेता शैलेश लोढा दिसेनासा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मालिकेच्या सेटवरही फिरकला नाही. इतकेच नाही तर तो गेल्या महिन्याभरापासून मालिकेतही दिसत नाही. त्यामुळे त्याने मालिका सोडली यावर अनेकांनी शिक्कामोर्तब केले आहे. शिवाय आता तो पुन्हा मालिकेत कधीही येणार नाही असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. मालिकेत पात्रांचे येणे- जाणे सुरुच असते. पण काही पात्र ही अगदी पहिल्या दिवसापासून बदललेली नाहीत त्यामुळे खूप जणांना धक्का लागणे अगदी स्वाभाविक आहे.
दयाबेन अका दिशा वकानीच्या येण्याचीही होत होती चर्चा
मालिकेचा जीव अशी ओळख असलेली अभिनेत्री दिशा वकानी ही देखील प्रेग्नंसीसाठी मालिकेतून गेली. ती पुन्हा परतली नाही. ती परत येईल असे अनेकांना वाटत होते. तिने तसे संकेतही दिले होते. पण बाळाचे संगोपन तिला जास्त महत्वाचे वाटल्यामुळे तिने मालिकेत न येणेच पसंत केले आहे. त्यावरुनही अनेकदा गदारोळ उठला होता.तिला अनेकदा नोटीस देखील देण्यात आल्या होत्या. पण तरीही त्याला न जुमानता तिने मालिकेला राम राम ठोकणेच अधिक जवळचे समजले.त्यामुळे या मालिकेला आधीच एक झळ पोहोचली आहे. आता आणखी एक चेहरा या मालिकेतून एक्झिट घेणार म्हटल्यावर प्रेक्षक नाराज होणे स्वाभाविक आहे.
जेठालाल अजूनही मालिकेत
मालिकेत अगदी पहिल्यापासून दिसणारा एक आवडीचा चेहरा आहे. या मालिकेत कितीही वादळ आली तरी देखील जेठालाला अका दिलीप जोशी यांनी मात्र या मालिकेत अजूनही आहे. ज्या मालिकेने त्यांना एवढी ओळख मिळवून दिली त्या मालिकेसाठी ते कायम ऋणी असलेले दिसतात. मालिकेत दयाबेनच्या एक्झिटनंतरही त्यांनी ती मालिका अगदी योग्य पद्धतीने सांभाळली आहे. त्यामुळेच मालिकेत अजूनही लोकांना रस वाटत आहे.
प्रेक्षकांच्या मनात जवळजवळ एक दशकाहून अधिक काळ राज्य करणारी ही मालिका आणि यातील पात्रे कालांतराने बदलतील देखील. पण हास्याचा फवारा कधीही थांबता कामा नये असे प्रेक्षकांना वाटते. त्यामुळे मालिकेत होणाऱ्या बदलांना प्रेक्षकांनी नक्कीच सामोरे जाणे खूप गरजेचे आहे.
मालिकेतून बाहेर पडणाऱ्या कलाकारांबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.