ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
चाय कोट्स मराठी

50+ चहाप्रेमींसाठी कोट्स मराठीत  | Tea Quotes In Marathi

चहाप्रेमींसाठी चहा अमृत आहे. त्यांना कधीही चहा द्या ते त्याला नाही असे म्हणायची हिंमतही करणार नाही. जे सतत चहा पितात त्यांच्या नसांमधून रक्त नाही तर चहाच वाहत असेल असे त्यांना चिडवण्यासाठी म्हटले जाते. उत्तम चहा कोणता? याची व्याख्या जर चहा चाहत्यांना #Tealover ची व्याख्या विचारली तर त्यांची व्याख्या एकदा तरी नक्की ऐका. चहा परफेक्ट करण्यासाठी टिप्स फॉलो करणे गरजेचे असते. काही जणांचा चहा हा इतका फक्कड असतो की असा चहा सतत पिण्याची इच्छा होते. चहासोबत प्रत्येकाच्या काहीना काही आठवणी असतात. चहा बिस्कीटचा घेतलेला आनंद, टपरीवर मित्रांसोबत प्यायलेला गरम गरम चहा, कामाचा ताण घालवण्यासाठी प्यायलेला मस्त कडक चहा… काय हे वाचून चहा प्यायची इच्छा झाली ना? चहाचा हाच आनंद शब्दातून घेण्यासाठी शेअर करत आहोत Tea quotes in marathi  जे तुमच्या लाडक्या चहाची तुम्हाला आठवण करुन देतील. इतकेच नाही तर यासोबत Tea Lover Quotes In Marathi  सुद्धा शेअर करणार आहोत चला करुया सुरुवात 

Tea Quotes In Marathi | चहा कोट्स मराठीत

Tea Quotes In Marathi | चहा कोट्स मराठीत
Tea Quotes In Marathi

चहा कोट्स मराठीत पाठवून दिवसाची सुरुवात एकदम मस्त झुरक्याने करायची असेल तर तुमच्या खास मित्रांना तुम्ही  Tea Quotes In Marathi

  1.  कधीही विचारु नका मला कॉफीसाठी
    कारण मी आधीच चहाच्या प्रेमात आहे
  2. प्रेम होईलच ना जेव्हा समोर माझ्या आवडीचा चहा असेल
  3.  कॉफी म्हणजे प्रेम,
    पण चहा म्हणजे माझे आयुष्य
  4.  एक कप कडक चहा, चिंता दूर करतो
  5.  योग्य साखर आणि चहापूड असेल तर उत्तम चहा बनतो,
    तसेच योग्य संगत असेल तर मनही जुळते
  6.  कॉफीवर फक्त थोडेसे संस्कार केले जातात,
    पण चहावर नाती बांधली जातात
  7.  जगात अशी कोणतीही समस्या नाही,
    जी गरम आंघोळ आणि कडक चहा
    सोडवू शकत नाही
  8.  कोणत्याही गुलाबाच्या फुलाला
    जितका सुगंध नसतो,
    त्याहून अधिक सुगंध हा
    मी बनवलेल्या चहाला असतो
  9.  चहाला वेळ नसते,
    पण वेळेला चहा हवाच
  10.  ज्या देशात चहा नाही,
    त्या देशात राहण्यात मला काही रस नाही

Tea Lover Quotes In Marathi | चहा प्रेमींसाठी कोट्स मराठीत

Tea Lover Quotes In Marathi | चहा प्रेमींसाठी कोट्स मराठीत
चहा प्रेमींसाठी कोट्स मराठीत

चहा प्रेमींचे चहावर किती प्रेम असते ते शब्दात मांडता येणार नाही. यासाठी खास शेअर करत आहोत tea lover quotes in marathi. 

  1. चहा एक आनंद नाही
    तर तो जीवनाचा परमानंद आहे 
  2. चहा प्याल तर कळेल
    सुखाची खरी व्याख्या काय आहे 
  3. उगाचच नाही म्हणत चहाला
    अमृततुल्य
    कारण त्यामुळेच कळते जीवनाचे मूल्य 
  4.  चहा, चहा फक्त चहा दिवसभर मला तोच हवा
  5.  चहा नाही नुसते पेय… त्यामुळे होते
    विचारांची रेलचेल
  6.  विचार सुचत नसतील तर चहा प्या
    पटकन सुचतात
  7.  नशिबाने चांगला मित्र दिला नाही तर चांगला
    चहा दिला आहे तो प्या
  8. चहा चहा असतो तो ज्यांना कळतो
    तोच त्याच्या प्रेमात पडतो
     
  9.  आयु्ष्यात सगळे साथ सोडतील पण
    चहा कधीही सोडणार नाही 
  10. शत्रूच्या मैत्रीपेक्षा चहाशी मैत्री कधीही चांगली

विनोदी चहा कोट्स मराठी | Funny chai quotes marathi

विनोदी चहा कोट्स मराठी | Funny chai quotes marathi
Funny chai quotes marathi

काहीही म्हणा मित्रांसोबत टपरीवरचा चहा पिण्याचा आनंद हा एक वेगळाच असतो. अशा यारी दोस्तीतल्या त्या चहाच्या मस्त गरमागरम घोटासाठी Funny chai quotes marathi नक्की पाठवा. 

ADVERTISEMENT
  1. दुनिया बदलतेय साहेब
    आधी चहात बिस्किट बुडवायचे,
    आता बिस्किटाच्या कपात चहा बुडवतात
  2. साखरेशिवाय चहा म्हणजे प्रेमाशिवाय जीवन
  3. ज्या घरात चहा नाही, त्या घरात थांबण्यात काही अर्थ नाही
  4. एक कटींग जेव्हा घोट घोट पितो,
    तेव्हाच चहाचा खरा आनंद मिळतो
  5. झंडू हा डोकेदुखीचा बाम आहे,
    तर चहा हा थेट आत्म्याचा बाम आहे
  6.  जीवन खूप सुंदर आहे,
    पण सकाळचा चहा तुमच्या हातून मिळाला तर
  7.  खरे आयुष्य तेच जगतात
    जे रोज सकाळी उठून चहा पितात
  8.  डोक्याला करणार टेन्शन फ्री,
    फक्त प्या एक कप टी
  9.  या आधी एक्स माझी दुनिया होती,
    पण आता तिची जागा चहाने घेतली आहे,
    रोजच कडक अनुभव देते
  10.  भाव कोका-कोलाचे उतरतील
    पण चहाचे कधीच नाही

भावनिक चहा कोट्स मराठी | Emotional Chai Quotes Marathi

भावनिक चहा कोट्स मराठी | Emotional Chai Quotes Marathi

कधी कधी आपल्या आवडीच्या गोष्टी करताना आपल्याला भावना व्यक्त करण्याची संधी मिळते. चहाचा एक घोट अमृततुल्य असला तरी देखील तो तुमच्या दु:खांनाही वाट करुन देणारा आहे. भावनिक कोट्स हे मनाला आधार देणारे असतात.  त्यासाठीच भावनिक चहा कोट्स मराठी | Emotional chai quotes marathi. 

  1. जेव्हा येईल आठवण माझी,
    त्यावेळी एक काम करा
    जुन्या आठवणींचा अल्बम घेऊन
    चहा प्या
  2.  जीवन हे चहा बनवण्यासारखे आहे,
    अहंकाराला उकळून घ्या,
    चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या
    दुखणं विरघळून जाऊ द्या
    चुकांना गाळून घ्या
    आणि सुखाच्या आनंदाचे घोट घेत राहा
  3.  जाऊ दे झाले ते,
    चहाला आता ये आणि विसर सारे
  4. माझ्या प्रत्येक श्वासात आहेस तू,
    चहाच्या प्रत्येक घोटात आहेस तू
  5.  तुला जाऊन कितीही वर्ष झाली तरी
    चहा तुझी आठवण नक्कीच आणून देते
    त्यामुळे मी तुला विसरु शकत नाही
  6.  तुझी प्रत्येक आठवण मला दुखावते,
    पण चहाचा एक घोट त्यावर मलम लावण्याचे काम करतो
  7.  आता नाही येत मला तुझी आठवण,
    तुझ्या जागी मला मिळाले चहा नावाचे नवे प्रेम
  8.  आयुष्यात दु:ख हे सगळ्यांनाच आहे,
    फक्त ते चहासोबत आत ढकलता आले तर मन शांत होते,
  9.  मनाच्या गाभाऱ्यात तुझी एक जागा होती,
    पण आता ती जागा चहाने घेतली आहे
  10.  काळजीने तुझ्या मी थकून जायचो,
    आता चहानेच सगळे भागवून नेतो

मैत्री आणि चहाचे घट्ट नाते सांगणारे कोट्स | Friendship Chai Quotes Marathi

मैत्री आणि चहाचे घट्ट नाते सांगणारे कोट्स | Friendship Chai Quotes Marathi
Friendship Chai Quotes Marathi

ऑफिसची वेळ आणि मस्त चहा त्यामुळे मरगळलेल्या मनाला उभारी येते. अशावेळी चहासोबत येणारी व्यक्ती ही आपली खास मैत्री होते. चहा हे पेयच असे आहे जी वेगवेगळी नाती बांधते. असेच आहे मैत्रीचे नाते. या खास मैत्रीच्या नात्यासाठी  Friendship chai quotes marathi 

  1. जीवन आहे चहाच्या कपासारखे काठोकाठ भरण्यासाठी
    मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी
  2. मैत्री ही जर चहापर्यंतच असती,
    तर आज आम्ही एकमेकांना भेटलोच नसतो
  3.  घट्ट मैत्री आणि अतूट नाती बनवण्यासाठी
    मैत्रीचा चहा लागतोच
  4.  आपुलकी चहा पिण्यात नाही,
    तर चहा घेण्यात असते
  5.  चहाला बोलावून बघा,
    मैत्रीचे एकतरी नाते अगदी हमखास फुलते
  6.  मनाची मरगळ घालवून
    आयुष्यात नवे लोक आणणारा असतो तो म्हणजे ‘चहा’
  7.  कोणाशीही मैत्री टिकवायची असेल तर
    त्याला चहाला बोलवा
  8.  चहा हे असे पेय आहे जे दोन वेगळ्या लोकांना
    मैत्रीच्या धाग्यात बांधू शकते तो केवळ चहाच असतो
  9.  एक चहा नाती बनवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी
    खूपच फायद्याचा असतो
  10. नाती बिघडली असतील तर एक कप चहा
    बिघडलेल्या नात्यातही गोडवा आणतो

टपरी चहाच्या आठवणी सांगणारे कोट्स | Tapri Chai Quotes Marathi

टपरी चहाच्या आठवणी सांगणारे कोट्स | Tapri Chai Quotes Marathi
Tapri Chai Quotes Marathi

चहाची टपरी ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळी आठवण आहे. या चहाच्या टपरीवर आतापर्यंत तुम्ही अनेकांना हसताना, रडताना पाहिले असेल. नवीन नाती जुळताना आणि प्रेम उमलतानाही पाहिले असेल. चहाप्रेमींच्या आयुष्यात टपरीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. अशा चहाच्या टपरीसाठी टपरी चहाच्या आठवणी सांगणारे कोट्स | Tapri Chai Quotes Marathi

  1.  वाफळता चहा
    सर्वांची आवड
    पाऊस येताच होते याची निवड
  2.  जेवण नसेल तर चालेल,
    पण वेळेला चहा हवाच
  3.  दुधापेक्षाही चहाची आवड असणारे
    जास्त पाहिले आहेत
  4.  चहाचा एक घोट घेताना तुला पाहिले होते,
    त्यानंतर मी माझे ठिकाण टपरीवरच ठेवले होते
  5.  काचेच्या कपातून फुर्रर्र आवाज करण्याची मजा
    आणि यारी दोस्ती जपण्याची जागा म्हणजे टपरी चहा
  6.  आयुष्याच्या गर्दीत तुम्ही हरवला असाल
    तर स्वत:ला शोधायला एकदा तरी टपरीवर या
  7.  तुला पाहायला मी रोज इथे येतो,
    तू दिसली नाही की चहाचा एक घोट येतो
  8.  काय जादू आहे या चहामध्ये
    ही टपरीही महलासारखी मोठी भासते
  9. तिची गडबड आणि गोंधळ,
    पण सावरुन घेते चहाचा गरमगरम कप
    तिचे एक घोट घेणे घायाळ करते मला,
    तुझ्या त्या कपातूनच मला चहा रोज हवा
  10. मित्रांची पार्टी जी कायम लक्षात असेल
    ती म्हणजे टपरीवरील चहा आणि बन-मस्का

 प्रेम उमलवणारे चहा कोट्स | Love Chai Quotes Marathi

प्रेम उमलवणारे चहा कोट्स | Love Chai Quotes Marathi
 प्रेम उमलवणारे चहा कोट्स

चहा हे असे पेय आहे ज्याने आतापर्यंत अनेक नाती घडवली आहेत. प्रेम फुलवले आहे, विचारांना बांध मोकळा करुन दिला आहे. अशावेळी अगदी हमखास पाठवायला हवेत  प्रेम उमलवणारे चहा कोट्स | Love chai quotes marathi जे तुम्हाला नक्की आवडतील. या शिवाय खास प्रेमासाठी लव्ह शायरी पाठवा 

ADVERTISEMENT
  1. चहाची चव जिभेवर आली,
    मला तुझे नाव आठवते
    जे हरवले त्यासाठी रडत बसण्यापेक्षा चहाचा
    एक घोट समाधान देते
  2. मजबूत नाती आणि कडक चहा,
    यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो
  3. हा ऋतू आणि हा मस्त किनारा,
    दोन कप चहा आणि तुझी वाट पाहण्याचा
    नजारा
  4. प्रेम हे चहासारखे असावे
    ‘अमृततुल्य’
  5.   नातं हे कपबशीसारखं असावं
    एकानं सांडल तरी दुसऱ्याने
    सांभाळून घेणारं असावं
  6.  आठवता तुझे गुलाबी ओठ
    कडक होतो चहाचा प्रत्येक घोट
  7.  दररोज सकाळी आयता चहा
    करुन देणारी असावी
    तिच्या गोडव्याने बिनसाखरेचा
    चहाही गोड लागावा
    अशी मुलगी आयुष्यात हवी
  8.  चहा घेताना पाळल्या जात नाही जाती-पाती
    तिथेच तर जुळून येतात प्रेमाच्या अनोख्य नाती
  9.  कडकडत्या थंडीत एक चहा
    हवा, सोबत तुझा सहवास हवा
  10.  चहा आणि प्रेम एकच आहे,
    यामध्ये दूध, चहापत्ती, आलं मिसळून येते,
    तर प्रेमात दोन विभिन्न व्यक्ती एकत्र येतात
    त्यालाच प्रेम म्हणतात

तुमच्या चहाप्रेमी मित्रांना चाय कोट्स मराठी | chai quotes marathi ,impressive marathi tea quotes in marathi पाठवायला विसरु नका आणि हो…. आता मस्त चहाचा कप घेऊन आठवणीच्या हिंदोळ्यात बसायलाही विसरु नका… 

04 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT