ADVERTISEMENT
home / आरोग्य
साखरेशिवाय चहाही हानिकारक

साखरेशिवाय चहा पिणेही मधुमेहींसाठी हानिकारक

 मधुमेहींसाठी साखर म्हणजे शत्रूच. कितीही मोह झाला तरी ज्यांना मधुमेह जास्त आहे अशांना काहीही केल्या साखर ही अगदी मोजून मापून खावीच लागते. चहा हा त्यातल्या त्यात अनेकांच्या आवडीचे पेय.. खूप जणांच्या दिनचर्येत चहाचे प्रमाण हे खूप असते. मधुमेह असेल आणि तुम्ही चहाचे सेवन करत असाल तर चहातून केवळ साखर वगळून चहा पिणे हे देखील आरोग्यासाठी चांगले नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे जर तुम्हाला मधुमेह आहे आणि तरी देखील तुम्ही साखरेशिवाय चहा घेत असाल तर त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मधुमेंहीसाठी साखरेशिवाय चहा हा कसा हानिकारक आहे चला घेऊया जाणून

साखर आणि डाएबिटीझ

चहा- साखर आणि मधुमेह

ज्या रुग्णांना मधुमेह असतो. अशांच्या शरीरात साखरेची पातळी ही वाढलेली असते. शरीरात साखर वाढली की, त्याचे वेगवेगळे परिणाम शरीरावर दिसू लागतात. मधुमेह झाला की, अशांचे वजन झपाट्याने वाढणे किंवा कमी होणे असे दिसून येते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असेल तर कधी कधी चक्कर देखील येऊ शकते. म्हणूनच मधुमेह झालेल्या लोकांना त्याच्या आहारातून साखर हा घटक वगळण्यास सांगितला जातो. पण बरेचदा असे होते की, खूप जण साखर वगळतात. पण इतर घटक हे त्यांच्यासाठी त्याहून जास्त हानिकारक ठरु शकतात. याचा विचार आपण नक्कीच करायला हवा. 

या कारणांसाठी साखरेशिवाय चहा पिणे मधुमेहींसाठी ठरते घातक

फोटो प्रातिनिधीक आहे

मधुमेह झाला म्हणून साखरेशिवाय चहा तुम्ही घेत असाल तर ते देखील तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरते. याचे नेमके कारण काय? चला घेऊया जाणून

  1. जरी तुम्ही चहामध्ये साखर घातली नाही तरी देखील चहामध्ये असलेले दूध हे उकळल्यामुळे त्याचा गोडवा वाढत असतो. अर्थात त्यामधील साखर वाढत असते. त्यामुळेच तुम्हाला त्याचा फायदा होतोच असे नाही. मधुमेहींना जर चहात दूध घालून प्यायला आवडत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की त्यामध्येही मोठ्या प्रमाणात साखर असते जी तुम्हाला फुल फॅट दुधामुळे मिळू शकते.
  2. चहामध्ये टॅलिन आणि पॉलिफेनॉल नावाचे घटक असतात शरीरातील लोह शोषण्यासाठी ते अडथळा निर्माण करतात. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन कमी होण्याची शक्यता अधिक असते.  शरीरातील लोह शोषले न जाणे हे देखील आरोग्यासाठी घातक असते.
  3. अनेक जण साखरेला पर्याय म्हणून गुळाचा वापर करुन चहा पितात. गुळ हा चहापेक्षा चांगला असला तरी मधुमेहींसाठी तो चांगला आहे हे अद्याप सिद्ध झालेले नाही. कारण त्यामुळेही रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते असे दिसून आले आहे. शिवाय गुळ हा उष्ण प्रवृत्तीचा आहे त्यामुळेही अन्य काही त्रास होऊ शकतो. 
  4. वातावरण बदलले थोडासा थंडावा आला की, चहा प्यायची खूप इच्छा होते पण अशी इच्छा होणे आणि सतत चहा पिणे यामुळे साखर वाढू शकते.

आता डाएबिटिज किंवा मधुमेह असणाऱ्यांनी साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चहा पिताना तो हर्बल पिणे केव्हाही चांगले त्यामुळे तुमची साखरं नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत मिळेल. 

ADVERTISEMENT
03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT