ADVERTISEMENT
home / मनोरंजन
tanvi-nachiket-got- engaged

मालिकेच्या सेटवर झाले प्रेम आणि मग गुपचूप केला साखरपुडा

मालिकेत काम करताना अनेकदा सहकलाकाराच्या प्रेमात पडणारे सेलिब्रिटी आपल्याला माहीत असतील. नुकतेच राणा दा- अंजली यांनी प्रेमाची कबुली देत साखरपुडा केला. आता आणखी एका मराठी मालिकेच्या सेटवर प्रेमकहाणी फुललेली दिसतेय. प्रेक्षकांना घाबरवणारी मालिका… ‘ती परत आलीये’.. या मालिकेतील अनेक पात्र चांगलीच गाजली. ही मालिका आता संपली असली तरी देखील अनेकांना ही मालिका आजही लक्षात आहे. या मालिकेतील एका जोडीने आता गुपचूप साखरपुडा उरकला आहे. असे सांगितले जात आहे की, सेटवरच या दोघांची जोडी जुळली होती. या नात्याला आता या जोडीने साखरपुड्याच्या ( Engaged) बंधनात बांधले आहे. दरम्यान या जोडीचे फोटोही खूपच सुंदर आले आहेत.

रोहिणी- विक्रांत प्रेमात

मालिकेतील रोहिणी आणि विक्रांत मालिका पाहणाऱ्यांना नक्कीच आठवत असेल. ही भूमिका साकारणारे कलाकार तन्वी कुलकर्णी (Tanvi Kulkarni )आणि नचिकेत देवस्थळी ( Nachiket Devsthali) या दोघांनी साखरपुडा केला आहे.  मालिकेच्या सेटवर यांची चांगलीच मैत्री होती. या मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले त्यांनाही कळले नाही. या नात्याला मूर्त रुप देत त्यांनी नुकताच साखरपुडा केला आहे. तन्वी आणि नचिकेत या दोघांनी त्यांचे हे साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये तन्वीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच सुंदर आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

जुळली चांगलीच मैत्री

तन्वीने या आधी मालिका, चित्रपट, शॉर्ट फिल्म अशा अनेक माध्यमांमधून काम केलेली आहेत. ती तिच्या इन्स्टाग्रामवर सतत ॲक्टिव्ह देखील असते. मालिकांच्या सेटवरील तिने अनेक फोटो शेअर केले आहे. पण  ती  परत आलीये या मालिकेच्या शेवटच्या भागानंतर तिने केलेली एक पोस्ट ही नक्कीच वाचण्यासारखी आहे. या मालिकेत अनेक कलाकार होते. त्या सगळ्यांच्या भूमिका या महत्वाच्या होत्या. या सेटवरील कलाकारसोबत तयार झालेला एक रॅपो आणि त्यांची मैत्री याबद्दल लिहायला तन्वी अजिबात विसरलेली नाही. तिने या मालिकेशी निगडीत सगळ्या टीमचे मनापासून आभार मानत त्यांना मिस करत असल्याचे देखील सांगितले आहे. 

या आधीही केले काम

तन्वीने या आधीही अनेक मालिकांमधून काम केले आहे. स्वराज्यरक्षक संभाजी,जुळता जुळता जुळलंय की, स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत ती महत्वपूर्ण अशा भूमिकेत झळकली आहे. तर दुसरीकडे नचिकेतलाही अनेक मालिका आणि जाहिरातीतून नक्कीच पाहिले असेल. ती परत आलीये या मालिकेआधी तो रात्रीस खेळ चाले या मालिकेत पोलीसाच्या भूमिकेत दिसला होता. या मालिकेत त्याची भूमिका ही अधिक मोठी होती. या शिवाय नचिकेतने नाटकातून देखील काम केले आहे. 

ADVERTISEMENT

सेटवर फुललेली ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. 

13 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT