ADVERTISEMENT
home / मनोरंजन
‘तेजस नेरुरकर’च्या कॅमेऱ्याने टिपली मराठी अभिनेत्रींची ही अनोखी रुपं…

‘तेजस नेरुरकर’च्या कॅमेऱ्याने टिपली मराठी अभिनेत्रींची ही अनोखी रुपं…

नववर्षात काहीतरी हटके करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत असतो. आपण करत असलेल्या कामातून जगाला  काहीतरी वेगळं देण्याचा आनंदच और असतो. लोकप्रिय सिनेफोटोग्राफर तेजस नेरुरकरचं एक ‘फ्रेश’ फोटोशूट यंदा चर्चेचा विषय ठरत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी तेजसनं एक ‘मराठमोठं फोटोशूट’ केलं आहे. नववर्षाच्या एका कॅलेंडरसाठी या फोटोसेशनच्या माध्यमातून तेजसने मराठीतील काही लोकप्रिय अभिनेत्रींची निराळी रुपं जगासमोर आणली आहेत. नुकतच तेजसने या फोटोसेशनमधील काही फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. महडच्या गणेश संस्थानचं हे कॅंलेडर आहे असं या पोस्टवरुन वाटत आहे.

एखाद्या अभिनेत्रींचं मनमोहक रुप आपल्या कॅमेऱ्यात टिपून तिचं अनोखं सौंदर्य जगासमोर आणणं ही एक अदभूत कला’ आहे. सिनेफोटोग्राफर तेजस नेरुरकर अनेक वर्षांपासून आपल्या याच कौशल्यामुळे लोकप्रिय होत आहे. तेजसने आतापर्यंत अनेक हिंदी आणि मराठी कलाकारांचं फोटोशूट केलं आहे.

ज्ञानयोगीनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करून.. असं तेजने या फोटोसोबत शेअर केलं आहे.या पोस्टमध्ये सई ताम्हणकरला त्याने टॅग केलं आहे पण फोटो स्पष्ट दिसत नाही आहे. हे या कॅंलेडरचं कव्हर पेज आहे असं वाटतंय.

या फोटोमध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या नृत्यकलेतून गणेशवंदना करताना दिसत आहे. या फोटोमधील तिचे खूपच सुंदर भाव तेजसने टिपले आहेत.

ADVERTISEMENT

‘दगडीचाळ’ फेम पूजा सावंतचा हा शिल्पकलेची पुजा करतानाचा फोटो  तुम्ही पाहिला का? गणेशमूर्ती साकारातानाचा हा पूजाचा फोटो किती अप्रतिम वाटत आहे.

‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडे लेखन कलेची साधना करताना दिसत आहे. चला हवा येऊ द्या मध्ये तिच्या अप्रतिम अभिनयाने ती अनेकांना भुरळ घालत असते. मात्र या फोटोमधून तेजसने तिचे वैचारिक भावदेखील खूप छान टिपले आहेत.

अभिनेत्री  नेहा महाजनचं अभिनय कौशल्य नुकतच आपल्याला सिम्बा या सूपरहिट चित्रपटातून पाहायला मिळालं. आता या फोटोत मात्र नेहा वादनकलेत तल्लीन झालेली दिसत आहे. त्यामुळे तिचं एक अनोखं रुप यातून प्रगट होत आहे.

आपल्या अप्रतिम सौंदर्याने आणि नृत्यकलेने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच सर्वांना  भुरळ घालत असते. या फोटोत मात्र तिचं चित्रकलेवरचं प्रेम तेजसने अचूक क्लीक केलं आहे.

ADVERTISEMENT

आतापर्यंत गायिका प्रियांका बर्वेच्या आवाजाची मोहिनी अनेकांवर पडली असेल.पण या फोटोतील सरस्वती मातेची साधना करतानाचे प्रियांकाचे भावदेखील मनाला नक्कीच मोहवणारे आहेत.

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

03 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT