तेजश्रीच्या वाढदिवसाच्या दिवशी अभिनेता आशुतोष पत्कीने शेअर केलेला एक फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. त्या फोटोमुळे सगळीकडे त्यांच्या अफेअर्सची चर्चा रंगली होती. पण आता या चर्चेला फुलस्टॉप देणारे विधान तेजश्रीने आता नव्याने केलं आहे. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाला एक वेगळेेच वळण मिळण्याची शक्यता आहे. आमच्यात तसं काहीही नाही म्हणत नेटीझन्सची बोलती तेजश्रीने बंद करुन टाकली आहे. दरम्यान तेजश्री काय म्हणाली ते जाणून घेऊया
तिसरे लग्न करणार आहेस का, श्वेता तिवारीला नेटीझन्सचा टोमणा
आमच्यात आहे निखळ मैत्री
2 जून रोजी तेजश्रीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील को- स्टार आशुतोष पत्की याने एक तेजश्रीचा फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या फोटोखालीच त्यांच्या अफेअर्सची चर्चा रंगली होती. पण आता तेजश्रीने एक नवा खुलासा करत या सगळ्या गोष्टीवर फुलस्टॉप दिला आहे. तिने या फोटोमध्ये छान मैत्रीचं नातं आहे. आशुतोष हा माझा चांगला मित्र आहे. त्यामुळेच त्याने हा फोटो खास माझ्या वाढदिवशी शेअर केला. अशा प्रकारे अफेअर्सच्या चर्चा रंगणे हे माझ्यासाठी काहीच नवे नाही कारण या आधीही माझ्या को-स्टार सोबत माझी नाव जोडली गेलेली आहेत. पण आशुतोष आणि माझे मैत्रीचे नाते आहे. असे तिने स्पष्ट केल्यामुळे आता या चर्चांना फुलस्टॉप द्यावा लागणार आहे.
बिग बॉस’ची तयारी सुरु, यंदा 6 महिने चालणार हा रिअॅलिटी शो
मालिकेत केले एकत्र काम
अग्गबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री आणि आशुतोष अशी फ्रेश जोडी दिसून आली होती. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची खूप जास्त पसंती मिळाली. या मालिकेत असतानाच या दोघांच्या अफेअर्सची चर्चा रंगत होती. पण या मालिकेनंतर ही चर्चा काही काळासाठी थांबली होती. तेजश्री आणि आशुतोष हे या मालिकेतनंतर एकमेकांच्या संपर्कात असतात ते कायम दिसून आले होते. त्यांनी अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे कायमच त्यांच्या या फोटोची चर्चा या आधीही होत होती. पण या वाढदिवसाच्या फोटोनंतर तर त्यांच्या अफेअरची चर्चा जोर धरु लागली.
मालिकेतून घेतला ब्रेक
‘अग्गंबाई सासूबाई’मालिका ही प्रेक्षकांच्या मोस्ट फेव्हरेट मालिकेतील मालिका होती. या मालिकेचा टीआरपी चांगला होता. सुन सासूच्या लग्नासाठी करणारे प्रयत्न यामध्ये दाखवण्यात आले होते. जे प्रेक्षकांना खूपच भावले होते. त्यामुळेच ही मालिका चांगलीच चालली होती. पण या मालिकेने योग्यवेळी लीप घेत ही मालिका पुढे नेली आहे. आता या मालिकेत शुभ्रा बदलली आहे. आधी सगळ्या गोष्ट अगदी खंबीरपणे करणारी शुभ्रा आता घाबरीघुबरी झाली आहे. असे दाखवण्यात आले आहे. या नव्या सीझनमध्ये तेेजश्री आणि आशुतोष ही जोडी नाही तर त्या जागी आता नवे चेहरे दिसले आहेत.
शंतनू – शर्वरी लग्नसोहळा, मालिकांमधील लग्नसोहळे ठरत आहेत टीआरपीसाठी फायदेशीर
तेजश्रीचे लग्न
तेजश्री या आधी को-स्टार असलेल्या शशांक केतकरसोबत लग्न झाले. पण तिचा संसार हा फार काळासाठी टिकला नाही. ते दोघंही वेगळे झाले. त्यामुळे या आधीही एकदा मालिकेच्या सेटवर प्रेमात पडून तेजश्रीने लग्न केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चुकी करु नये असे देखील अनेकांना वाटते.
आता या नव्या गोष्टीचा खुलासा केल्यामुळे तेजश्रीने काही गैरसमज नक्कीच दूर केले आहेत.