ADVERTISEMENT
home / मनोरंजन
तेलुगु अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणात दोघांना अटक

तेलुगु अभिनेत्री श्रावणी आत्महत्या प्रकरणात दोघांना अटक

लॉकडाऊनच्या या काळामध्ये अनेक वाईट बातम्या या मनोरंजन विश्वातून आल्या आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणानंतर अन्य काही कलाकारांनीही आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला तेलुगु टीव्ही अभिनेत्री श्रावणी हिच्या आत्महत्येची बातमी आली आणि अनेकांना धक्का बसला.सगळे काही चांगले असताना तिने आत्महत्या का केली असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण चौकशीअंती काही गोष्टी समोर आल्यामुळे श्रावणी हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचे लक्षात आले. त्यामुळेच या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय ते आता जाणून घेऊया.

नवाझुद्दीन सिद्दीकीच्या विरोधात पत्नीची पोलिसात तक्रार

दोघांना अटक

श्रावणी आत्महत्या प्रकरणात कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार आणि तपासाअंती देवराज रेड्डी आणि साईकृष्ण रेड्डी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. देवराज रेड्डी हा तिला त्रास देत होता. त्याने तिच्याशी लग्न करण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळेच या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात देवराजसोबतचा रेकॉर्ड केलेल्या कॉलमुळेही तो दोषी असल्याचे सिद्ध झाले. तर साई कृष्ण रेड्डी याने या सगळ्या प्रकरणाला भडकवण्याचे काम केले असा आरोप केला त्यामुळे त्या दोघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणात RX100 निर्माता अशोक रेड्डी हाही या प्रकरणात दोषी असल्याचे आढळून आले आहे. पण तो सध्या फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. 

कुटुंबाने केला आरोप

अभिनेत्री श्रावणी

ADVERTISEMENT

Instagram

श्रावणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले जात असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काकीनाडा परीसरातील एक व्यक्ति तिला सतत त्रास देत होता. 8 सप्टेंबरच्या रात्री ती फोनवर बोलत होती. अचानक आत येऊन ती तिच्या खोलीत निघून गेली. दरवाजा लावून घेतला. त्यानंतर ती बराचवेळ बाहेर आली नाही म्हणून तिच्या पालकांनी दरवाजा ठोठावला. पण तिने दरवाजा उघडला नाही. पालकांना अनुचित प्रकार वाटला म्हणून त्यांनी दरवाजा तोडला त्यावेळी ती फासावर लटकलेली त्यांना दिसली

या’ कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे टीआरपी झाला कमी

फोन रेकॉर्डमुळे उलगडले प्रकरण

 श्रावणीचे फोन रेकॉर्ड सापडल्यामुळे या प्रकरणातील दोषींना शोधणे पोलिसांसाठी अधिक सोपे झाले. त्यांनी तिच्या कॉलरेकॉर्डसवरुन आणि कुटुंबाच्या तक्रारीवरुन या सगळ्या प्रकरणावरुन पडदा उठवला,. 

ADVERTISEMENT

सारा अली खानचे नाव का येत आहे ड्रग्ज प्रकरणात, काय म्हणाली रिया

तेलुगुमधील नावाजलेला चेहरा

 श्रावणी हा तेलुगुमधील नावाजलेला चेहरा होता. तिने अनेक मालिकांमध्ये लीड रोलमध्ये काम केले होते. ‘मौनरागम’ आणि ‘मनसु ममता’ या तिच्या गाजलेल्या मालिका. मूळची आंध्रप्रदेश येथील श्रावणी मालिकांमधून काम करु लागल्यानंतर हैदराबाद येथे राहू लागली होती. तिच्या आत्महत्येने अनेकांना धक्का दिला होता. 

14 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT