ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
टेरेस गार्डन मराठी

जाणून घ्या टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (Terrace Gardening Tips In Marathi)

पर्यावरणपूरक घरांची संकल्पना हल्ली सगळीकडे अधिक रुढ होऊ लागली आहे. घराचे शुशोभिकरण करताना घरात ऑक्सिजन वाढवणारी झाडं असावी असा सगळ्यांचा हट्ट असतो. त्यामुळेच हल्ली ‘टेरेस गार्डन’ ही संकल्पना रुढ होऊ लागली आहे. घरी उपलब्ध असलेल्या जागेमध्ये खूप जण झाडं लावून सुशोभित करण्याचा प्रयत्न करतात. टेरेस गार्डन ही संकल्पना केवळ घरातच नाही तर हल्ली ऑफिसमध्येही रुढ होऊ लागली आहे. अनेक जण आपला जास्तीत जास्त काळ हा कामाच्या ठिकाणी घालवत असतात. सिमेंटच्या वाढलेल्या या जंगलात झाडं अशी आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी  सगळ्यांना फ्रेश वाटावे यासाठी टेरेस गार्डन ही संकल्पना ही ऑफिसमध्ये देखील रुढ होऊ लागली आहे. तुमच्या घरातही तुम्ही टेरेस गार्डन मराठी (terrace garden in marathi) घरी किंवा कामाच्या ठिकाणी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी टेेरेस गार्डन संदर्भातील माहिती आणि टेरेस गार्डनिंग मराठी टिप्स (gardening tips in marathi)

टेरेस गार्डनिंग म्हणजे काय? (What Is Terrace Gardening)

What is Terrace Gardening In Marathi
Instagram

टेरेस गार्डनिंग या शब्दाचा अर्थ जाणून घेणे तसे फार कठीण नाही. पूर्वी घरांना टेरेस किंवा बाल्कनी अगदी सर्रास असायची. बाल्कनी हा घरातील असा भाग आहे. जिकडे सुशोभित कण्याची जास्त संधी असते. पूर्वीच्या काळी बाल्कनीमध्ये जास्तीत जास्त झाडे लावली जायची. पण आता टेरेस गार्डन ही संकल्पना खूपच कमी होऊ लालगी आहे. अपुरी जागा, छोटी घर यामुळे लोकं टेरेस गार्डनिंग करत नव्हते. पण पुन्हा एकदा निसर्गाकडे चला म्हणत टेरेस गार्डन सगळेच करु लागले आहेत. त्यामुळे टेरेस गार्डन हा प्रकार घरातील बाल्कनी किंवा खिडकीच्या बाहेर उपलब्ध असलेल्या ठिकाणी केला जातो. यालाच टेरेस गार्डनिंग असे म्हणतात.

टेरेस गार्डन मराठी फायदे (Benefits Of Terrace Garden In Marathi)

Benefits Of Terrace Garden In Marathi
सौजन्य: Instagram

टेरेस गार्डन म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर त्याचे फायदे जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. हे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला टेरेस गार्डन करायची इच्छा नक्की होईल. 

  1. टेरेस गार्डनमध्ये घरात मुबलक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. 
  2. घरात प्रसन्न असे वातावरण राहते. 
  3. निसर्गातील सजीव घटक म्हणजे पक्षी, पाखरं यांचे घरी येणे हे फार शुभ मानले जाते. घरात झाडं असली की,पक्षी, पाखरं सतत येत राहतात.ज्यामुळे प्रसन्न वाटते. 
  4. घरात सकारात्मक उर्जा हवी असेल झाडं उत्तम असतात. एखादी नकारात्मक उर्जा काढून वातावरण सकारात्मक करण्यास ती मदत करतात.

घरात झाडं असली की, घरातील वातावरण हे आनंदी राहते. त्यामुळे झाडं ही घरात असायलाच हवीत.

ADVERTISEMENT

टेरेस गार्डनिंगसाठी आवश्यक उपकरणं आणि माती (Equipment And Soil Required For Terrace Gardening)

Equipment And Soil Required For Terrace Gardening
सौजन्य : Instagram

टेरेस गार्डनिंग करायचा तुम्ही निर्णय घेतला असेल तर तुम्हाला काही पूर्वतयारी करणे देखील गरजेचे असते. टेरेस गार्डन करण्यासाठी किंवा कोणतेही बेसिक गार्डनिंग करण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी या असायलाच हव्या असतात. त्यामुळे तुम्ही कोणती उपकरणं तुमच्याकडे ठेवायला हवीत ते जाणून घेऊयात.
खुरपं : टेरेस गार्डनच्या झाडांच्या कामांसाठी उपयोगी पडणारे पहिले टुल म्हणजे खुरपं. खुरपी ही वेगवेगळ्या आकाराची असतात. घरगुती कामांसाठी लहान किंवा मध्यम आकाराचे खुरपे हे पुरेसे असते. माती खाली-वर करण्यासाठी खुरपे कामाला येते.
फावडा : फावडा हा बागकामासाठी फारच महत्वाचा असतो. जर तुम्ही कुंडीतील माती काढून पुन्हा झाडं लावण्याचा विचार करत असाल तर अशावेळी तुम्हाला फावडे लागतेच. त्यामुळे माती खाली-वर करायला किंवा एकत्र करायला मदत मिळते.
कात्री : झांडाची छाटणी करण्यासाठी एका खास कात्रीची गरज असते. जी तुम्हाला खास शेतीकामाच्या दुकानात मिळते.
सेंद्रिय खत :
खत हे कोणत्याही झाडांसाठी फारच महत्वाचे असते. त्यामुळे झाडांसाठी खत हे असायलाच हवे. झाडांसाठी कोणते खत घ्यायचे हे देखील माहीत असायला हवे. झाडांवर येणाऱ्या पोषक अळी किंवा त्रासदायक किडे कोणते याची माहिती घेऊन त्याची फवारणी करणे गरजेचे असते. झाडांना कीड लागली तर खत कामी येतात
माती :  झाडांसाठी सगळ्यात महत्वाची असते ती म्हणजे माती. झाडांसाठी वेगवेगळ्या प्रकारची माती हल्ली मिळते. जर तुम्हाला प्रत्यक्ष माती नको असेल तर कोकोपीठचा उपयोग करुन तुम्ही गार्डनिंग करु शकता. 

टेरेस गार्डनसाठी मराठी टिप्स (Gardening Tips In Marathi)

टेरेस गार्डन करणे आता तुम्ही निश्चित केले असेल तर टेरेस गार्डन नेमके कोणत्या प्रकारे करता येईल किंवा कोणत्या संकल्पना वापरता येतील आणि कशापद्धतीने टेरेस गार्डन करता येतील ते पाहुया.

प्लास्टिक बॉटल प्लँट वॉल (Plastic Bottle Plant Wall)

Plastic Bottle Plant Wall
सौजन्य: Instagram

घरी आपण मिनरल वॉटर असलेल्या प्लास्टिकच्या बॉटल आणतो. या बॉटल तशाच फेकून दिल्या जातात. पण याचा उपयोग करुन तुम्हाला प्लास्टिक बॉटल प्लँट वॉल तयार करु शकता. हल्ली अनेक ठिकाणी तुम्हाला असे केलेले दिसू शकते.

साहित्य:  प्लास्टिक बॉटल, रस्सी, कटर, कोकोपीठ, पेट्रा
असे करा डेकोर : तुम्हाला यासाठी भरपूर प्लास्टिकच्या बॉटल लागतील. आता तुम्ही कोणत्या भिंतीला हे गार्डन करणार आहे त्यावर हे अवलंबून असते.
आता तुम्ही तुमची भिंत आणि तुम्हाला किती अंतर ठेवून गार्डन करता येईल म्हणजे तुम्हाला त्यानुसार तुम्हाला बॉटलची संख्या निवडायची आहे.
बॉटल घेऊन त्याला आडवी करुन आयताकृती कापा. असे सगळ्या बॉटलचे करुन घ्या. आता तुमहाला यासाठी खास हलकी माती लागते. त्यामुळे कोकोपीठचा वापर करा.

याझाडांना खूप जास्त पाणी लागत नाही. त्यामुळे त्याची निगा राखणे खूप सोपे जाते.

झाडांची निवड (Plants ):  पेट्रा फुलांची झाडे, फर्नस, गोल्डन पोटास

कशी घ्यावी काळजी ( How To Take Care) :वॉल हँगिग अशा टेरेस गार्डनला फार काळजी करण्याची गरज नसते. या झाडांना फारसे पाणी लागत नाही. त्यामुळे त्याची फार काळजी घ्यावी लागत नाही.

ऑरगॅनिक प्लॅंट टेरेस गार्डन (Organic Plant Garden)

Organic Plant Garden
सौजन्य : Instagram

हल्ली सगळ्यांना ऑरगॅनिक शेती करायला सगळ्यात जास्त आवडते. याची क्रेझ गेल्या काही दिवसात वाढू लागली आहे. तुमच्याकडेही जागा असेल तर तुम्ही अशी काही ऑरगॅनिक झाडं लावू शकता आणि त्याचा फायदा मिळवू शकता. घरी बाल्कनीत कोथिंबीर उगवणे ही आहे सोपे


साहित्य: माती, कुंडी, सेंद्रिय खत
असे करा डेकोर (How To Decor): टेरेस गार्डनिंसाठी ऑरगनिक प्लँटचा पर्याय निवडणे हा तसा सोपा आहे. कारण तुम्हाला यासाठी चांगली माती आणि कुंडी लागते.
चांगल्या मोठ्या कुंड्या घेऊन त्यामध्ये माती, दगड आणि खत घालून  त्यामध्ये तुम्हाला हवे असलेले झाडं किंवा भाजीच्या बिया पेरा आणि छान शेती करा.

झाडांची निवड (Plants ): हळद, आलं, कडीपत्ता, कोथिंबीर, मिरची,भेंडी किंवा कोणतीही आवडीची भाजी
कशी घ्यावी काळजी ( How To Take Care) :आता भाज्या किंवा अशी झाडं म्हटल्यावर त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. रोजच्या रोज पाणी, झाडांची झटाई ही करणे फार गरजेचे असते. त्यामुळे दर दोन दिवसांनी का असेना झाडांकडे लक्ष द्यायलाच हवे. ही झाडं तुम्हाला फळं देणारी असतात. त्यामुळे त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. 

ADVERTISEMENT

फ्लॉवर प्लँट टेरेस गार्डन (Flower Plant Terrace Garden)

Flower Plant Terrace Garden
सौजन्य: Instagram

फुलं ही कोणत्याही बोअरींग जागेची शोभा वाढवतात. जर तुम्हाला फुल झाडं लावून जर टेरेस गार्डनिंग करायचे असेल तर तुम्हाला सुगंधित आणि सुगंधित नसलेली अशी दोन्ही प्रकारातील फुलं लावायला काहीच हरकत नाही. अशी फुलं घराची आणि टेरेस दोन्हीची शोभा वाढवतात.

साहित्य: तुमच्या आवडीच्या आणि रंगाच्या कुंड्या, खत, माती (कोकोपीठही चालेल)
असे करा डेकोर (How To Decor): तुमच्या आवडीची कोणतीही झाडं घेऊन या. वेगवेगळ्या रंगाच्या कुंड्या (थोड्या मध्यम आकाराच्या)
कुंड्यामध्ये माती भरुन त्यामध्ये खत घाला आणि झाडं लावा. हे सगळ्यात सोपे असे गार्डन आहे.
झाडांची निवड (Plants ): मोगरा, जाई, चमेली, गुलाब, जुई, जास्वंद, शेवंती आणि असुंगधित कोणतीही झाडं
कशी घ्यावी काळजी ( How To Take Care) : फुलझाडांची काळजी घेताना त्यांची योग्य छटाई करणे गरजेचे असते. झाडांवर किटकनाशक फवारणी मारणे गरजेचे असते. एवढेच नाही तर सुकी पानं काढून टाकणे गरजेचे असते. 

हँगिंग टेरेस गार्डन (Hanging Terrace Garden)

Hanging Terrace Garden
सौजन्य : Instagram

जर तुमच्याकडे जागा जास्त नसेल तर तुम्ही हँगिंग टेरेस गार्डन करु शकता. याला जागा कमी लागते पण यासाठी तुम्हाला हलकी अशी झाडं निवडावी लागतात. अशी झाडं ज्यांना पाणी कमी लागते.
असे करा डेकोर (How To Decor): बाजारात खास हँगिंग कुंड्या मिळतात. त्या कुंड्या आणून तुम्ही त्यामध्ये कोकोपीठ घालून त्यात झाडं लावा. ती तुमच्या खिडकी किंवा गॅलरीत लावा.
झाडांची निवड (Plants ): चीनी गुलाब, हेलिकोनिया, ऑफिससटाईम, गुडलक प्लान्ट
कशी घ्यावी काळजी ( How To Take Care) : या झाडांना योग्य आणि कमी पाणी घाला. सूर्यप्रकाराशात झाडं ठेवा. म्हणजे ती वाढण्यास मदत मिळते.

कशी कराल टेरेस गार्डनची देखभाल (How To Take Care Of Terrace Garden in Marathi)

गार्डनची देखभाल करणे देखील गरजेचे असते. गार्डनची देखभाल नेमकी कशी करावी ते जाणून घेऊया. झाड पटकन वाढावी म्हणून झाडांना खूप पाणी घालणे अजिबात चांगले नाही. झाडांची योग्य माहिती घेऊन झाडांना पाणी घालायला हवे. झाडांची छाटणी ही योग्यवेळी व्हायला हवी. माती ही बदलणे देखील गरजेचे असते ते शक्य नसेल तर तुम्ही माती काढून पुन्हा एकदा प्लांटिंग करणे गरजेचे असते. झाडांवर प्रेम करणे गरजेचे असते झाडांना तुम्ही किती काळजी घेता ते समजते त्यानुसार त्यांची वाढ होते. त्यामुळे गार्डनवर प्रेम करा. झाडांना योग्यवेळी खत घाला. त्याचे प्रमाणही योग्य असू द्या. घरातील झाडांची काळजी घेणे हे फारच महत्वाचे असते.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. टेरेस गार्डनसाठी झाडांची निवड कशी करायला हवी?

कोणत्या प्रकारचे टेरेस गार्डन तुम्ही निवडले आहे. त्यानुसार तुम्ही झाडांची निवड करणे गरजेचे असते. खूप जणांना टेरेस गार्डनची थीम ठरवलेली असते. पण असे असले तरी देखील टेरेसवर असणारा सूर्यप्रकाश आणि तुम्हाला असलेला वेळ यानुसार तुम्हाला झाडांची निवड करायची असते. काही झाडं अशी असतात. ज्यांच्याकडे लक्ष देण्याची फार गरज नसते. अशा झाडांकडे तुम्ही कमी लक्ष दिले तरी चालते. पण काही झाडांकडे मात्र तुम्हाला दररोज लक्ष द्यावे लागतात.तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या काळजीवर तुमच्या झाडांची निवड अवलंबून असते.

ADVERTISEMENT

2. टेरेस गार्डनला किती वेळा पाणी देणे गरजेचे असते?

टेरेस गार्डनमधील झाडांवर त्यांची देखभाल ही अवलंबून असते. तुम्ही कोणत्या प्रकारातील झाडे निवडली आहेत त्यावर झाडांना किती पाणी घालायचे ते अवलंबून असते. त्यामुळे टेरेस गार्डनला किती पाणी द्यायचे हे असे सांगता येणार नाही. तुम्ही झाडांची योग्य माहिती घेऊनच झाडांना पाणी घालायचे असते.

3. टेरेस गार्डनसाठी उत्तम असे  झाड कोणते?

भारतीय आणि पाश्चिमात्य अशा अनेक प्रकारातील झाडे तुम्ही टेरेस गार्डनसाठी निवडून शकता. भारतीय झाडांमध्ये झेंडू, मोगरा, पानसी, अॅलोवेरा, हळद, आलं, लसूण, गुलाब, जाई, जुई अशी काही झाडे आहेत. तर पाश्चिमात्य झाडांमध्ये आर्किना, पाल्म, जेड प्लॅँट अशा काही झाडांचा समावेश होतो. 

26 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT