पावसाचं मस्त वातावरण झालं की, काहीतरी चमचमीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होऊ लागते. पण तळणीचे पदार्थ खाताना वजन वाढण्याची भीतीही खूप जणांना असते. पण मौसम मस्ताना आणि आपण फक्त डाएटमुळे काहीही खात नसताना खूपच वाईट वाटते. म्हणूनच आम्ही असे काही स्नॅक्सचे पदार्थ निवडले आहेत जे खाल्ल्यानंतर त्याची चव तुमच्या जीभेवर रेंगाळेल पण तुमचे वजन मुळीच वाढणार नाही. जाणून घेऊया असेच काही पदार्थ ज्यावर तुम्ही ताव मारु शकता. पण ते तुमचे वजन मुळीच वाढवणार नाही
मका

सौजन्य : Instagram
पावसाळा म्हटलं की, भुट्टा खाण्याची मजा ही काही औरच असते. वर्षभऱ मका उपलब्ध असला तरी देखील पावसाळ्यात तो खाण्याची एक वेगळीच मजा असते. मका हा तुमच्या आरोग्यासाठी फारच फायद्याचा आहे. जर तुम्ही मका कसाही चटपटीत करुन खाल्ला तरी त्याच्या कॅलरीज या कमीच असतात. मक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्यामुळे तुम्हाला फायबर खाण्याची गरज नाही. एक अख्खा मकाही तुमच्यासाठी फारच फायद्याचा ठरतो. मका भाजून किंवा उकडून तुम्ही खाल्ला तरी देखील तुम्हाला तो खाता येईल. आता जर काही चटपटीत खायची इच्छा झाली तरी तुम्ही मका हवा तेव्हा खाऊ शकता.
भेळ

भेळ ही आरोग्यासाठीच नेहमीच चांगली. तोंडाची चव गेली तर तुम्ही भेळ खाऊ शकता. भेळ हा असा चटपटीत पदार्थ आहे. ज्यामध्ये तुम्ही बरेच प्रयोग करु शकता. कुरमुऱ्यापासून बनवलेली भेळ ही चवीला फारच छान लागते. मस्त पाऊस आणि भेळ सोबत चहा किंवा कॉफी प्यायला फारच मजा येते. जर तुम्ही पावसाचे फॅन असाल तर दिवसातून एकदा तरी तुम्ही हे कॉम्बिनेशन ट्राय करायला हवे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. भेळ ही हलकी फुलकी असते. शिवाय त्यामध्ये शेंगदाणे-चणे, कांदा टोमॅटो असल्यामुळे तुमच्या तोंडामध्ये लाळ तयार होते. जर तुम्हाला वजन वाढवायचे नसेल तर तुम्ही अगदी हमखास भेळ खायला हवी.
सँडवीच

सँडवीच हा असा पदार्थ आहे जो कधीही खाल्ला तरी तोंडाची चव वाढते. सँडवीचचे इतके वेगवेगळ प्रकार आहेत की ते खायला खूपच मजा येते. तुम्हाला सँडवीच खायचे असेल तर त्याला हेल्दी बनवू शकता. सँडवीचमध्ये भरपूर भाज्या असतात. ज्या भाज्या तुम्ही खात नाही त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये घालून खाऊ शकता. सँडवीचसाठी तुम्ही ब्राऊन ब्रड वापरला तर तो आणखीनच उत्तम! सँडवीचमध्ये जास्तीत जास्त भाज्या घाला. या भाज्या पोटात गेल्यामुळे तुम्हाला जास्त फायबर खाण्याची काहीही गरज नाही. तुम्ही टोस्ट किंवा साधे सँडवीच थोडेसे चीझ किसून खाल्ले तरी ते छानच लागते.
पॉपकॉर्न

फक्त चित्रपट पाहतानाच पॉपकॉर्न खायला हवेत असा काहीही नियम नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल त्यावेळी तुम्ही पॉपकॉर्न खाऊ शकतात. पॉपकॉर्नमध्ये फारच कमी कॅलरीज असतात ज्या तुमचे वजन मुळीच वाढवत नाही. शिवाय तोंडाला चव आणण्यासाठी हा पदार्थ एकदम मस्त आहे. तुम्ही मस्त कॉफीचा कप आणि गरम गरम पॉपकॉर्न खाल्ले तर तुम्हाला काहीतरी मस्त खाल्यासारखे नक्की वाटेल.
आता पावसाळ्यात या पदार्थांवर बिनधास्त ताव मारा. यापदार्थांमुळे तुमच्या तोंडाची चव वाढेल पण वजन मुळीच नाही.