ADVERTISEMENT
home / मनोरंजन
the kapil sharma show

कपिलच्या शो मध्ये पुन्हा दिसणार प्रेक्षक, दिला संकेत

लवकरच कपिल शर्मा आपला कॉमेडी शो घेऊन परत येत आहे. पुन्हा एकदा कपिल शर्मा आणि त्याची टीम प्रेक्षकांना खळखळून हसविण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढच्या महिन्यात हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सर्वच प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहेत. पण कोरोनामुळे दुसऱ्या सीझनमध्ये काही काळ प्रेक्षकांना येणे शक्य नव्हते. मात्र आता यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. या शो मधील सर्व कलाकार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पहिला टीझर शेअर केला आहे. ज्याला प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद लाभला आहे. 

लग्नानंतर पहिल्यांदाच मिस्टर अँड मिसेस चांदेकर दिसणार एकत्र

शो मध्ये प्रेक्षक दिसणार, दिले संकेत

‘द कपिल शर्मा शो’ हा प्रेक्षकांचा सर्वात आवडता रियालिटी शो आहे. नुकताचा या शो चा टीझर लाँच करण्यात आला आहे. काही बदल करत पुन्हा एकदा हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्टुडिओमध्ये प्रेक्षक असताना धमाल येते. त्यामुळे आता नुकताच पहिला टीझर प्रसारित करण्यात आला. ज्यामध्ये ‘आपल्या सर्वांची सीट कन्फर्म झाली आहे…आम्ही सर्वांनी कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्या आहेत..तुम्हीदेखील लस घ्या आणि आमच्या शो मध्ये सीट कन्फर्म करा’ असा ही टीझर आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा या शो चा भाग होणं शक्य होणार आहे याचेच हे संकेत आहे. प्रेक्षकही त्यामुळे आनंदित झाले आहेत. #thekapilsharmashow चा नवा सीझन लवकरच भेटीला येत आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही @sonyofficial शी संपर्कात राहा. #tkss #happiness अशी कॅप्शन देत लवकरच कपिल शर्मा शो येत आहे हे सांगण्यात आले आहे. हा टीझर शेअर केल्यावर शो मधील सर्व कलाकारांनीदेखील आपल्या व्यक्तीगत सोशल मीडिया अकाऊंटवर हे शेअर केले आहे. तसंच सर्व जण आपल्या जुन्या सहकलाकारांबरोबर काम करण्यास सज्ज झाले आहेत. मात्र यावेळी कपिलबरोबर सुमोना चक्रवर्ती दिसणार नाही. पण इतर सर्व कलाकार या शो मध्ये दिसून येणार आहेत. 

आणि त्यासाठी साकारणार पाण्याखाली राहून गायनाचा अद्भुत असा लाईव्ह सोहळा

ADVERTISEMENT

ऑगस्ट महिन्यापासून होणार शो ला सुरूवात

द कपिल शर्मा शो पुन्हा एकदा ऑगस्ट महिन्यापासून सुरू होत आहे. टीझर पाहून प्रेक्षकांना यामध्ये स्थान मिळणार असं कळलं असलं तरीही अजून प्रेक्षकांना या शो मध्ये निमंत्रित करण्यात येणार की नाही याचे उत्तर निर्मात्यांकडून अजून मिळालेले नाही. अजूनही कोरोना संपलेला नाही. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र काम आता थांबवू शकत नाही. पण तरीही कोणतीही जोखीम न घेता, सर्वांच्या तब्बेतीची काळजी घेऊन लसीकरण करून शो ला सुरूवात करण्यात येत आहे. तसंच सर्व कलाकार तितक्याच जोषात काम करण्यास उत्सुक आहेत. केवळ कलाकराच नाही तर प्रेक्षकही पुन्हा एकदा शो साठी तितकेच उत्सुक आहेत. कारण सतत ड्रामा आणि अन्य मालिका पाहूनही प्रेक्षक कंटाळले आहेत. त्याशिवाय सतत काही ना काही त्रास आणि येणाऱ्या संकटातून बाहेर येण्यासाठी विरंगुळा म्हणून नक्कीच कपिल शर्माचा हा शो प्रेक्षकांना गुंतवून ठेवेल अशीही आशा आहे. त्यामुळेच आता कधी हा शो प्रसारित करण्यात येणार आहे याच्याच प्रतिक्षेत चाहते आहेत. 

तारक मेहता मधील बबीता अफवांमुळे झालीय नाराज, शो सोडण्याबाबत केला खुलासा

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT