ADVERTISEMENT
home / Weight Loss
नियमित व्यायाम करूनही वजन होत नाही कमी, मग असू शकतं हे कारण

नियमित व्यायाम करूनही वजन होत नाही कमी, मग असू शकतं हे कारण

वजन कमी करणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नक्कीच नाही. मात्र काही गोष्टी नियमित पाळल्या तर वजन कमी करणं फार कठीणदेखील नक्कीच नाही. काही लोकांच्या अशा तक्रारी असतात की ते कठीण डाएट करतात, नियमित व्यायाम करतात तरिही त्यांचं वजन हवं तसं कमी होत नाही. असे लोक वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करतात मात्र त्यांची जीवनशैली अशी असते की त्यामुळे त्यांच्या वजनावर फार फरक पडत नाही. यासाठीच जाणून घेऊ या डाएट आणि व्यायाम व्यतिरिक्त अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं वजन कमी होऊ शकतं. ज्यामुळे त्या गोष्टींवर लक्ष देऊन तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचे ध्येय पूर्ण करू शकता.

पोटाच्या समस्या –

ज्या लोकांना अपचन अथवा पोटाच्या समस्या आहेत त्यांचे वजन झटपट कमी होत नाही. कारण वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे चयापचय क्रिया सुरळीत होणं. मात्र अपचनामुळे तुमची चयापचय क्रिया नीट होत नाही आणि शरीरात फॅट साठून राहते. याचाच परिणाम तुमच्या वजनावर होतो  आणि तुमचे वजन काही केल्या कमी होत नाही. यासाठी पोटाच्या म्हणजेच आतड्यांच्या आरोग्याविषयी विशेष काळजी घ्या. आहारात प्रोबायोटिकचे प्रमाण वाढवा. दही, ताक, प्रोबायोटिक ड्रिंक्स, आल्याचा रस, फायबरयुक्त पदार्थ, फळं अशा पदार्थांचा समावेश करा. ज्यामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळेल आणि तुमचे वजन कमी होऊ शकेल.

Shutterstock

ADVERTISEMENT

अनुवंशिकता –

ज्या लोकांच्या अनुवंशिकतेमुळे लठ्ठपणा येतो त्यांचे वजन डाएट आणि व्यायामामुळे कमी होईलच असं नाही. जर तुमच्या कुटुंबातील मंडळी लठ्ठ असतील तर तुमचे वजन त्यांच्याप्रमाणेच असू शकते. मधुमेह, हाडांचे विकार अशा अनुवंशिक आजारांमुळेही तुमचे वजन वाढू शकते. एवंढच नाही तर यामुळे तुमच्या पुढच्या पिढीतही अती वजन वाढण्याच्या समस्या जाणवू शकतात. यासाठी जर तुमच्या आईवडिल, बहीणभाऊ यांचे वजन जास्त असेल तर वेळीच सावध व्हा आणि वजनावर नियंत्रण ठेवा. 

अपुरी झोप –

ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांचे वजन झटपट कमी होत नाही. कारण शांत आणि पुरेशी झोप तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची निर्मिती, चयापचय, न्युरोएंडोक्राइन या व्यवस्था नियंत्रित करत असते. अपुरी झोप झाल्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलीनचे कार्य बिघडते. शरीरात झालेल्या बदलांमुळे तुमची भुक वाढते आणि तुम्ही जास्त अन्न खाता. यामुळे तुमचे वजन तर कमी होत नाही उलट वजन वाढू लागते. 

Shutterstock

ADVERTISEMENT

थायरॉईड ग्रंथीचे अनियंत्रण –

आजकाल अनेक महिलांमध्ये थायरॉईड ग्रंथीचे कार्य अनियमित होण्याच्या समस्या जाणवतात. थायरॉईड ग्रंथी तुमच्या शरीरातील चयापचयाची महत्त्वाची क्रिया निभावत असते. हा ग्रंथीतून टीथ्री, टीफोर आणि कॅल्सीटोनिन या हॉर्मोन्सची निर्मिती होत असते. टीथ्री आणि टीफोरची निर्मिती कमी होते तेव्हा हायपोथायरॉयडिझम होण्याची शक्यता असते आणि हायपोथायरॉडिझम मुळे तुमचे वजन अचानक वाढू लागते. कारण या परिस्थितीत तुमचे चयापचय कमी होते. जर सर्व काही करूनही तुमचे वजन वाढत असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्लाने थायरॉईड टेस्ट करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या वाढत्या वजनाचे कारण कळू शकेल.

डिप्रेशन –

वजन वाढण्यामागे ताणतणाव हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. काही संशोधनानुसार डिप्रेशनमध्ये असलेल्या लोकांचे वजन अचानक वाढू लागते. कारण या लोकांना जी औषधे दिली जातात त्या औषधांमुळे वजन वाढू शकते. मात्र यावर डॉक्टर असा सल्ला  देतात की अशा लोकांनी आधी नैराश्यातून बाहेर पडावे मग वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा. 

Shutterstock

ADVERTISEMENT

डाएट आणि व्यायाम करून वजन वाढण्यामागे तुमची जीवनशैली कारणीभूत असू शकते. जीवनशैलीमुळे होणारे आजार अथवा आरोग्य समस्या तुमच्या वजन वाढण्याचं एक कारण असू शकतात. यासाठीच वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योग्य आहार, नियमित व्यायाम, मानसिक आणि शारीरिक आरोग्य या सर्व गोष्टींची गरज आहे. सतुंलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या, व्यसनांपासून दूर राहा आणि आनंदी राहा हा वजन कमी करण्याचा सोपा मार्ग आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

हिवाळ्यात दुधात खारीक टाकून पिण्याचे आहेत फायदे, जाणून घ्या कोणते

ADVERTISEMENT

अबब! बदाम पीठाच्या सेवनाने झपाट्याने कमी होईल वजन, असा करा वापर

सतत होत असेल पोटाची समस्या तर प्या हे ज्युस, होईल पोट साफ

13 Jan 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT