ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
the-right-advice-from-experts-on-how-to-maintain-the-beauty-of-the-skin-in-the-summer-days-in-marathi

उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेचे सौंदर्य कसे जपाल, तज्ज्ञांकडून योग्य सल्ला

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश, सतत घाम येणे यामुळे त्वचेवर पुरळ येणे, सनबर्न होणे, त्वचेची जजळ होणे, त्वचा निस्तेज होणे आणि काळवंडणे यासारख्या समस्या उद्भवतात.  उन्हाळ्यातील त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे त्वचेची काळजी घेणे. याकरिता खास टिप्स दिल्या आहेत डॉ. रिंकी कपूर, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटो-सर्जन, द एस्थेटिक क्लिनिक्स यांनी. तुम्हीही या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या त्वचेची उन्हाळ्यात काळजी घ्या. 

त्वचेची उन्हाळ्यात घ्यायची काळजी 

फेशियल क्लिंन्झर बदला – उन्हाळ्यात खूप घाम येतो आणि उष्ण आणि दमट हवामानाचा सामना करण्यासाठी त्वचेद्वारे अधिक तेलग्रंथी जमा होतात. म्हणून, तुम्हाला दिवसातून दोनदा तुमचा चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे आणि योग्य जेल किंवा पाण्यावर आधारित फोमिंग (तुमची तेलकट त्वचा असल्यास) किंवा नॉन-फोमिंग (कोरड्या आणि मिश्र त्वचेसाठी) वापरणे आवश्यक आहे. तुमचे क्लिंन्झर अल्कोहोल मुक्त आणि पीएच पातळी संतुलित राखणारे असल्याची खात्री करा. फेशियल क्लिंन्झर वापरण्याचा योग्य मार्ग म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुण्यापूर्वी पूर्ण एक मिनिट चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करणे

टीपः चेहऱ्याला सतत साबण लावणे टाळा. त्याऐवजी चेहरा पाण्याने स्वच्छ धुऊन सुती कापडाने पुसून घ्या. 

इतर टिप्स  

  • सीरम आणि मॉइश्चरायझरच्या आधी फेस मिस्ट वापरा. हे त्वचेला ताजेतवाने करेल. फक्त चेहऱ्यापासून 8 इंच अंतरावर ठेवून ते संपूर्ण चेहऱ्यावर फवारा मारा 
  • टोनर आणि मॉईश्चरायझर वापरा. या उन्हाळ्यात तुमच्या त्वचेला तेलकट होऊ न देता सौम्य सीरम आणि मॉइश्चरायझरचा वापर करा. त्वचेला पोषण देण्यासाठी मॉईश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरते
  • अँटिऑक्सिडंट्सचा वापर करा. अँटिऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेट करतात आणि फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानाशी लढायला मदत करतात. व्हिटॅमिन सी सीरम किंवा क्रीम हे सूर्याच्या किरणाच्या नुकसानापासून लढण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. अँटिऑक्सिडंट्सदेखील कोलेजन वाढवतात आणि अकाली वृद्धत्व टाळतात. तुमच्या रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, लिंबूवर्गीय फळे आणि काजू यांचा समावेश करून करा हे अँटिऑक्सिडंट्सयुक्त स्रोत आहेत.
  • त्वचेला आतून हायड्रेट करणे ही मुबलक, निरोगी दिसण्याची, तरुण त्वचेची गुरुकिल्ली आहे. त्वचेवर आर्द्रता पुनर्संचयित करण्याचे अनेक मार्ग आहेत. यादीतील पहिले म्हणजे ठराविक अंतराने पाणी पिणे. इतर मार्ग म्हणजे दिवसा हायड्रेटिंग हायलुरॉनिक सीरम, त्वचेला रीहायड्रेट आणि शांत करण्यासाठी रात्री मॉइश्चरायझिंग किंवा जेल आधारित शीट मास्क वापरा.
  • नियमितपणे एक्सफोलिएट करायला विसरू नका. आठवड्यातून दोनदा हलका स्क्रब वापरा. त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी, छिद्र स्वच्छ करण्यासाठी, त्वचेवरील घाण निघून जाण्यासाठी आणि रक्त प्रवाह सुधारण्यासाठी हे आवश्यक आहे. एक्सफोलिएट करताना ओठ, मान आणि छातीचा वरचा भाग चुकवू नका. त्वचा जोरात घासू नका.
  • सनस्क्रीन वगळू नका. अतिनील किरण विशेषतः उन्हाळ्यात कठोर असतात. त्यांच्यापासून होणारे नुकसान केवळ टॅनचेच नाही तर ते रंगद्रव्य, असमान पोत, सुरकुत्या, डाग, निस्तेज त्वचेस कारणीभूत ठरतात. म्हणून, 40 एसपीएफ ब्रॉड स्पेक्ट्रमच्या सनस्क्रीनचा वापर करा. जेव्हा तुम्ही घरामध्ये असता तेव्हा देखील सनस्क्रीनची गरज असते. दर काही तासांनी सनस्क्रीन पुन्हा लावण्यासाठी विसरु नका.
  • मेकअपचा दाट थर लावल्याने त्वचेला श्वास अडथळा येतो. कारण आर्द्रता आणि उष्णतेचा त्वचेवर खूप परिणाम होतो. त्यामुळे, चेहऱ्यासाठी लाइट पॉवर आधारित उत्पादने किंवा टिंटेड बाम आणि मॉइश्चरायझर्सचा वापर करा.
  • रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी इसेन्शियल ॲाईल किंवा नाईट क्रीम वापरा. रात्रीच्या वेळी त्वचेच्या पेशींचे नुकसान भरून काढण्यासाठी तुम्ही रात्रभर चांगला मास्क देखील निवडू शकता.
  • डोळे, पाय आणि ओठांकडे दुर्लक्ष करु नका. पुरेशा संरक्षणासाठी चांगले आय जेल आणि सन प्रोटेक्शन लिप बाममध्ये गुंतवणूक करा. तुमच्या पायांवर सनस्क्रीन लावा आणि त्यांना एक्सफोलिएट आणि मॉइश्चराईझ करायला विसरू नका.

उन्हाळ्यात त्वचेची चांगली काळजी घ्या, जास्त एक्सपोजर टाळा आणि थंड राहण्याचा प्रयत्न करा आणि आर्द्रता टाळा. आपल्या त्वचेचे नैसर्गिक संतुलन आणि चांगले आरोग्य राखण्याता एकमेव मार्ग म्हणजे त्वचेची चांगली काळजी घेणे. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT