आपल्या लहान सहान सवयी नकळतपणे आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करत असतात. ज्यावेळी व्यक्ती लग्न करते आणि त्यानंतर बाळासाठी प्रयत्न करते तेव्हा जर स्वतःमध्ये काही दोष आढळले तर त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावरही याचा भयंकर परिणाम होतो. भारतात अजूनही वंध्यत्वासाठी बाईलाच जबाबदार ठरले जाते पण काही वेळा पुरुषांच्या काही सवयींमुळे शुक्राणूंची संख्या कमी होते, किंवा स्पर्म क्वालिटीवर देखील परिणाम होतो. परिणामी बाळ होण्यामध्ये अडचणी येतात. बहुतांश पुरुषांना पँटच्या खिशात सतत मोबाईल ठेवण्याची सवय असते. तुम्हाला माहित आहे का की यामुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकते? याशिवाय, अशा अनेक सवयी आहेत, ज्यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणू (स्पर्म) कमी होतात आणि शुक्राणूंची संख्या कमी होते. यामुळे जोडपी अपत्यसुखापासून वंचित राहू शकतात. जर तुम्ही शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या समस्येने त्रस्त असाल, तर या सवयी नक्कीच सुधारा ज्या शुक्राणूंची संख्या कमी करण्यासाठी तसेच शुक्राणूंची क्वालिटी बिघडवण्यासाठी कारणीभूत आहेत.
संशोधन काय सांगते
पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी असणे, शुक्राणूंची कमी गती असणे, किंवा सदोष किंवा मृत शुक्राणू असणे ही पुरुषांमधील नपुंसकत्वाची प्रमुख कारणे आहेत. एका संशोधनानुसार, 40 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजच्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता 60 टक्क्यांनी कमी आहे. व्यस्त जीवनशैली, ताणतणाव, नैराश्य, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, धूम्रपान, प्रदूषण इत्यादी घटक यासाठी कारणीभूत आहेत.
खिशात मोबाईल ठेवणे
बहुतेक लोक त्यांचा मोबाईल फोन त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवतात. पण ही सवय चांगली नाही. मोबाईल फोनमधून उत्सर्जित होणारे हानिकारक रेडिएशन शुक्राणूंचे उत्पादन कमी करते. जे पुरुष सतत मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या नऊ टक्क्यांपर्यंत कमी होते. म्हणूनच मोबाईल फोन पॅन्टच्या खिशात ठेवण्याची सवय सोडा.
खूप घट्ट पँट आणि Underpants घालणे
पुरुषांच्या वृषणांचे तापमान हे शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते. जेव्हा त्या भागाचे तापमान शरीराच्या तापमानापेक्षा कमी असते तेव्हाच वृषणांमध्ये निरोगी शुक्राणू तयार होतात. म्हणूनच हा अवयव पुरुषांच्या शरीराच्या बाहेरील स्किन सॅकमध्ये असतो. फॅशन आणि स्टाईलमुळे अनेक पुरुष घट्ट जीन्स, पॅन्ट आणि घट्ट अंडरवेअर घालू लागले आहेत. यामुळे त्यांच्या त्या भागात जळजळ होणे आणि खाज येणे हे त्रास तर होतातच, शिवाय त्यामुळे स्पर्म क्वालिटीवर देखील परिणाम होतो, यामुळे शुक्राणूंची संख्या देखील कमी होते. अधिक घट्ट कपडे परिधान केल्याने शरीराच्या तापमानाइतकेच वृषणांच्या भागाचेही तापमान वाढते, ज्यामुळे शुक्राणूंची निर्मिती थांबते. अगदी कमी प्रमाणात तयार होणारे शुक्राणू सदोष किंवा निष्क्रिय असतात. जास्त घट्ट कपडे परिधान केल्यामुळे पुरुषांमध्ये नपुंसकत्वाची समस्या वाढते आहे. म्हणूनच विशेषतः उन्हाळ्यात तरी सुती आणि सैल-फिटिंगचे कपडे घालावेत.
लठ्ठपणा व वाढते वजन
संशोधनानुसार, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे लठ्ठपणा हे सर्वात मोठे कारण आहे. लठ्ठपणामुळे पुरुषांमध्ये तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर थेट परिणाम होतो. यामुळे पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते. यासोबतच लठ्ठ लोकांमध्ये शुक्राणूंची गतिशीलताही हळूहळू कमी होते. लठ्ठपणामुळे पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्याही वाढते. याचे कारण म्हणजे लठ्ठपणामुळे रक्तदाब पूर्वीपेक्षा जास्त वाढतो. ज्याचा पुरुषाच्या प्रायव्हेट पार्टमधील रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे शारीरिक संबंधांदरम्यान पुरुषांमध्ये इरेक्शन येण्यात मोठी समस्या निर्माण होते.
तसेच जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिणे देखील घातक आहे. या दोन्हीमध्ये कॅफिन असते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते. हे शुक्राणूंची क्वालिटी देखील खराब करते. यासोबतच बिडी-सिगारेट ओढण्याचा थेट परिणाम वीर्यावर होतो. त्यामुळे वीर्यामध्ये तयार होणारे शुक्राणू कमी होऊ लागतात.
या सवयींमुळे पुरुषांच्या स्पर्म क्वालिटीवर थेट परिणाम होतो म्हणूनच पुरुषांनी या सवयी सोडणे आवश्यक आहे.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक