ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
जेवणात मिळवायचंय कौशल्य, तर मदत घ्या या साईट्स आणि अॅप्सची

जेवणात मिळवायचंय कौशल्य, तर मदत घ्या या साईट्स आणि अॅप्सची

सध्या घरात असल्यामुळे ऑफिसचं कामही घरातून चालू आहे. पण त्याशिवाय तुम्हाला तुमचं जेवणातील कौशल्य (cooking skills) वाढवायचं असेल तरीही चांगली संधी आहे. तुम्हाला जेवण बनवता येत नसेल तर रोज नव्या रेसिपी करणं हे नक्कीच सोपं नाही. पण त्यासाठी काही साईट्स आणि अॅप्स आहेत जे तुमची जेवणातील कौशल्य वाढवण्यास नक्कीच मदत करू शकतात. तुम्ही तुमच्या आवडीच्या रेसिपी यावरून शिकून जेवणातील तुमचं कौशल्य नक्कीच वाढवू शकता.  तुम्हाला अजिबातच जेवण येत नसेल तर तुम्ही युट्यूबवरील काही चॅनेल्सवरूनही मदत घेऊ शकता आण आपले जेवणातील कौशल्य अधिक चांगले करू शकता. जाणून घेऊया अशी कोणती अॅप्स आहेत ज्यवरून तुम्ही मदत घेऊन जेवणातील कौशल्य मिळवू शकता.

इपिक्यूरियस (Epicurious)

Shutterstock

हे अॅप त्या व्यक्तींसाठी ज्यांना  जेवणातील काहीही येत नाही. या साईटवर त्या सर्व रेसिपींची माहिती देण्यात आली आहे ज्या पटकन तयार होतात. यामध्ये क्विक अँड ईझी रेसिपीचे एक सेक्शन आहे ज्याचा वापर करून तुम्ही आपल्या आवडीचा पदार्थ तयार करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये नेहमी वेगवेगळ्या रेसिपी जोडल्या  जातात. तसंच रेसिपीची वेगवेगळी यादीही इथे देण्यात येते. तुम्हाला यातून शोधण्यासाठी अॅडव्हान्स सर्च टूलचाही वापर करण्यात येतो. तुम्हाला जर यापैकी काहीच समजत नसेल तर तुम्ही कोणता पदार्थ बनवायचा यासाठी फिल्टर्सचा वापरही करू शकता. त्यामुळे तुमच्या आवडत्या पदार्थांचा शोध घेणं सोपं होईल. तसंच तुमच्या डाएटनुसार यामध्ये रेसिपी देण्यात आल्या आहेत. तसंच तुम्हाला याच्या नोट्स आणि रिव्ह्यूसह आवडती रेसिपी जतन करून ठेवण्याची सुविधाही यात आहे. तुम्हाला जेवण अजिबातच येत नसेल तर तुम्हाला नक्की या साईटचा उपयोग होईल. नाश्ता, दुपारचे जेवण, गोड पदार्थ, ड्रिंक्स, हेल्दी आणि क्विक सोप्या रेसिपी तुम्हाला इथे सहज मिळतील. 

ADVERTISEMENT

ऑल रेसिपीज (Allrecipes)

या साईटवरूनही तुम्हाला जर जेवण बनवण्याची अगदी सुरूवात करायची असेल तर मदत मिळू शकते. जेवण बनवण्यासाठी तुम्ही नुकतीच सुरूवात केली असेल तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल. तुम्ही इथे फ्री अकाऊंट बनवू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीची रेसिपी नंतरही सेव्ह करून तयार करता येते. याचे वैशिष्ट्य हे आहे की तुमच्याकडे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये काय पदार्थ बनवता येतील याच्या रेसिपी यामध्ये देण्यात आल्या आहेत. तसंच तुम्हाला इथे मेन्यू प्लॅनरही मिळते. याच्या मदतीने तुम्ही आठवड्याचा मेन्यू निश्चित करू शकता. पदार्थ तयार करताना तुम्हाला किती साहित्य वापरायचे आहे याचाही संदर्भ इथे देण्यात आला आहे. तुम्ही तुमचा मील टाईप, डाएट आणि आरोग्य, डिश टाईप, साहित्य,  सीझनल, कुकिंग स्टाईल या सर्व आधारावर रेसिपी शोधू शकता. तुम्हाला अजिबातच जेवण येत नसेल तर इथे देण्यात आलेल्या व्हिडिओनुसार तुम्ही जेवण बनवू शकता. 

हाती जेवण जेवण्याचे फायदे करतील तुम्हाला थक्क

सिरीज ईट्स (Series Easts)

shutterstock

ADVERTISEMENT

याठिकाणी व्यवस्थित पारखलेल्या आणि तयार करून त्यावर अभ्यास करण्यात आलेल्या रेसिपी देण्यात आल्या आहेत. तसंच याचे योग्य टेक्निक आणि सायन्स याबद्दलही यामध्ये माहिती आहे. यामध्ये तुमच्या जेवणातील कौशल्याबद्दल कसे असायला हवे हेदेखील सांगितले जाते. तसेच पदार्थ कशा प्रकारे बनवायचे आहेत याची अगदी इत्यंभूत माहिती स्टेप बाय स्टेप यामधून देण्यात आली आहे. यामध्ये साहित्य, डिश टाईप, पद्धत आणि क्यूझीनच्या हिशेबाने रेसिपी तुम्ही शोधू शकता. तसंच यामध्ये फूड लॅबविषयी वेगवेगळी माहितीही तुम्हाला मिळू शकते. 

कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स

कुकपॅड (Cook Pad)

ज्या व्यक्तींना मुळातच कुकिंग अर्थात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला आवडतील तसे पदार्थ तुम्ही यामध्ये शोधू शकता. तसंच तुम्ही ज्या रेसिपी घरी बनवत आहात त्या तुम्ही यावर शेअरदेखील करू शकता. कोणतेही पदार्थ घरी कसे तयार करता येतील अथवा यामध्ये कोणते साहित्य लागते या सगळ्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. इतकंच नाही तर तुम्ही कुकिंग करत असताना तुमच्या आठवणी, फोटो,  प्रश्नोत्तर, रिअल टाईम चॅटचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही गुगल स्टोअरवरून हे अॅप डाऊनलोड करून घेऊ शकता. 

#StrengthOfAWoman : प्रत्येक महिलेच्या स्मार्टफोनमध्ये असल्याच पाहिजेत ‘या’ अॅप्स

ADVERTISEMENT

हेल्दी इटिंग (Healthy Eating)

आपल्याला चांगले पदार्थही हवे आहेत त्याशिवाय  आपल्याला वजनदेखील कमी करायचे आहे अथवा नियंत्रणात ठेवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला याचा उपयोग करून घेता येईल.  हे अॅप तुम्हाला केवळ कॅलरीच्या बाबतीत नाही तर बॅलेन्स्ड डाएट कसे फॉलो करायचे आहे याविषयी माहिती देते. यामध्ये तुम्ही जे खाता त्याचा फोटोग्राफ काढून तुम्हाला माहिती द्यायची आहे. याच्या आधारावर तुम्हाला काय खायला हवं आणि काय नाही याची माहिती देण्यात येते. तसंच तुम्हाला रोज न्यूट्रिशन्सकडून टिप्सदेखील मिळतात. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

10 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT