मुलींना ओळखणं फार कठीण असतं, हे वाक्य आपण आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल… कदाचित अनुभवलंही असेल. काही प्रमाणात ही गोष्ट खरी देखील आहे. कारण बहुतांश वेळा मुली अतिशय छोट्याछोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधत असतात. आपल्या जोडीदाराचा पगार जास्त आहे किंवा कमी? याच्याशी त्यांना काहीही घेणेदेणे नसतं. पण त्याचं मन किती मोठं आहे, हे मुली अधिक निरखून पाहतात. जोडीदाराला माझ्या व्यक्त होण्याव्यतिरिक्त माझ्या मौनाचा देखील अर्थ कळतोय का? यावरच त्यांचा अधिक भर असतो. जोडीदाराकडून मिळालेली छोट्यातील छोटी भेटवस्तू तसंच अगदी कौतुकानंही मुलीच्या चेहऱ्यावर मोठं हास्य येऊ शकतं.
जोडीदारावर पूर्वीपेक्षा अधिक करते प्रेम
मुलींसाठी कित्येक छोट्याछोट्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. बारीकसारीक गोष्टींकडे मनापासून लक्ष दिल्यास तुमची गर्लंफ्रेड तुमच्यावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम करेल, यात शंकाच नाही. बऱ्याचदा बॉयफ्रेंड/पतीकडून त्यांच्या पार्टनरच्या लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं आणि मग महिलावर्गाकडून तक्रारींचा धो-धो पाऊस पाडला जातो. मग तुम्हाला वाटतं की एवढं चांगलं घर, पैसा आणि सोयीसुविधा असतानाही आपला पार्टनर खूश का नाहीय? किंवा मग आपल्या नात्यात आधीसारखं काहीच उरलेलं नाही का? असे विचार बॉयफ्रेंड/पतीच्या मनात घिरट्या घालू लागतात. पण जे आहे हे असंच आहे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा काय चुकतंय याचा सखोल विचार केल्यास तुमच्या फायद्याचं ठरेल. तुम्हालादेखील पूर्वीसारखं नातं हवंय ना… तर फिकर नॉट… आम्ही तुम्हाला सांगतो की महिलावर्गासाठी महत्त्वाच्या असलेल्या त्या ‘स्पेशल’ छोट्याछोट्या गोष्टींची यादी
(वाचा : पार्टनरचा हात पकडून चालण्याचे ‘हे’ हेल्दी फायदे आहेत माहिती)
ShutterStock
1. न सांगता दरवाजा उघडणे
आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडसाठी गाडीचा दरवाजा उघडणे किंवा एखाद्या ठिकाणी ती भेटल्यानंतर स्वतःहून तिच्यासाठी खुर्ची मागे घेऊन बसण्याचा आग्रह करा, या चांगल्या सवयी आहेत. बहुतांश वेळा मुलं या छोट्याछोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण या सवयी आत्मसात केल्यास जोडीदाराबाबत तुमच्या मनात असलेल्या आदाराचं दर्शन घडतं. कोणतीही मुलगी नात्यात प्रेमासहीत स्वतःसाठी आदर भावनादेखील अवश्य शोधत असते.
(वाचा : यंदा कर्तव्य आहे! मुंबईतील ‘या’ लई भारी बँक्वेट हॉलमध्ये थाटामाटात करा लग्न)
2. जेवणाचं कौतुक
ही देखील एक छोटीशीच गोष्टी आहे, जी बॉयफ्रेंड/पती हमखास दुर्लक्ष करतात. असं म्हणतात कोणत्याही पुरुषाच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो आणि जर एखादी स्त्री आपल्या पार्टनरसाठी काही विशेष स्वयंपाकाचा बेत करत असेल तर याचा अर्थ तिला तुमच्या हृदयापर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. पण समजा चुकून एखाद वेळेस जेवणात काही कमी-जास्त झाल्यास पार्टनरला लगेचच सर्वांसमोर काहीही ऐकवू नका. यामुळे तुमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. पण तेच जर तुम्ही परिस्थिती समजून घेतल्यास, तिच्या जेवणाचं कौतुक केल्यास पत्नी किंवा गर्लफ्रेंडला भावनिकरित्या अतिशय छान वाटते.
(वाचा : त्वचेच्या समस्यांपासून हवीय सुटका, मग तांदळाच्या पिठानं खुलवा सौंदर्य)
3. कुटुंबीयांसोबत ओळख करून द्या
तुम्ही दोघं अद्याप लग्नबंधनात अडकलेले नाही, पण तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडबाबत अतिशय गंभीर असाल तर तुम्ही तिची आपल्या कुटुंबीयांसोबत ओळख नक्कीच करून दिली पाहिजे. यामुळे तिला आपण अतिशय खास असल्याचे जाणीव होईल. एवढंच नाही तर मुलीच्या मनात तुमच्यासोबत असलेल्या नात्यासंदर्भात सुरक्षितता आणि वचनबद्ध असल्याची भावना निर्माण होईल.
ShutterStock
4. दोषांसहीत स्वीकार करा
सर्व गुणसंपन्न व्यक्तीवर कोणीही प्रेम करेल. पण एखाद्या व्यक्तीला दोषांसहीत, जशी आहे त्या स्वरुपात स्वीकारणं म्हणजे खरं प्रेम. प्रेमाच्या नात्यासाठी सर्व काही निस्वार्थी भावनेनं करावं. ‘तू माझ्यासाठी अतिशय स्पेशल आहेस’, या गोष्टी स्वतः पुरते मर्यादित न ठेवता तिला वेळोवेळी सांगा. तू रागात अतिशय सुंदर दिसतेस, तुझ्यातील बालिशपणा मला खूप आवडतो, यांसारख्या छोट्याछोट्या गोष्टी तिच्याकडे व्यक्त करायला शिका. एखाद्यानं आपण आहोत तसं आपल्याला स्वीकारावं, अशाच मुलासोबत आयुष्यभर राहणं कोणतीही मुलगी पसंत करते.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.